'हा' आहे जगातील सर्वात श्रीमंत भिकारी; मुंबईत 2 कोटींचा फ्लॅट, 8 कोटींची मालमत्ता; महिन्याची कमाई ऐकून चाट पडाल...
रस्ते असोत की फुटपाथ किंवा मग रेल्वे स्थानके अशा अनेक ठिकाणी तुम्ही अनेक भिकारी पहिले असतील. मात्र, कधी तुम्ही विचार केलाय का? की एखादा भिकारी हा करोडपती असू शकतो. मात्र, आज आम्ही तुम्हाला मुंबईमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीबाबत सांगणार आहोत. जे भिकारी आहेत. मात्र, त्यांची एकूण संपत्ती ऐकून तुम्हीही चाट पडल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे ते जगातील सर्वात श्रीमंत भिकारी म्हणून समोर आले आहे. चला तर मग जाणून घेऊया… नेमका कोण आहे हा भिकारी. ज्याने जमवलीये कोट्यवधींची संपत्ती…
किती आहे भरत जैन यांची संपत्ती?
भरत जैन असे या बिकाऱ्याचे नाव असून, ते जगातील सर्वात मोठे भिकारी आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांची एकूण संपत्ती ही ८ कोटी इतकी आहे. इतकेच नाही तर मुंबईत त्यांचे फ्लॅट आणि काही दुकाने देखील आहेत. ज्याद्वारे ते महिन्याला ८० रुपये इतकी कमाई करतात. जी एखाद्या कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यापेक्षाही अधिक आहे. तर ते मुंबईत दररोज भीक मागतात. त्यातून त्यांना दररोज 3 हजार रुपये इतकी कमाई होते.
किती आहे फ्लॅटची किंमत?
भिकारी भरत जैन यांच्या मुंबईतील फ्लॅटची किंमत तब्बल २ कोटी रुपये आहे. तर त्यांच्या दुकानांच्या माध्यमातून त्यांना महिन्याला जवळपास ३० ते ४० हजार रुपये इतकी कमाई होते. विशेष म्हणजे भरत जैन यांना दोन मुले असून, ते कॉन्व्हेंट स्कुलमधून शिकले आहेत. तर उपलब्ध माहितीनुसार, भरत जैन यांनीअनेक ठिकाणी आपली गुंतवणूक केली आहे. त्यातून देखील त्यांना कमाई होते.
परळ भागात राहतात
इतकी सारी संपत्ती असून देखील, भरत जैन भिख मागतात. ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि आझाद मैदान परिसरात भिख मागतात. भरत यांचे कुटुंब स्टेशनरीचे दुकान चालवते. त्यातून देखील त्यांना कमाई होते. त्यांचे कुटुंब मुंबईतील सर्वात महागड्या परळ भागात राहते. त्यांच्या कुटुंबाकडून त्यांना भिख मागण्यास नको बोलले जाते. मात्र, तरी देखील त्यांनी आपले जन्मजात काम म्हणून सोडलेला नाही.
हेही वाचा : मुकेश अंबानींची बादशाहत थांबणार, ‘हा’ भारतीय होणार आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती!
‘हे’ आहेत जगातील सर्वात श्रीमंत भिकारी?
भरत यांच्याशिवाय देशात असे अनेक भिकारी आहेत. ज्यांची संपत्ती लाखोंच्या घरात आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी आलेल्या एका अहवालानुसार हे करोडपती भिकारी आहेत. मात्र, सध्या ते जिवंत आहेत की नाही? याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
१. सरवतीया देवी : जगातील सर्वात श्रीमंत भिकाऱ्यांच्या यादीत सरवतीया देवी यांचा देखील समावेश होतो. भीक मागून त्या महिन्याला सुमारे ५० हजार रुपये कमवतात. एका माहितीनुसार, त्यांनी जीवन विमाही काढला आहे. ज्यासाठी त्या 36 हजार रुपये वार्षिक प्रीमियम भरतात.
२. लक्ष्मी दास : लक्ष्मी दास यांनी वयाच्या १६ व्या वर्षी भीक मागायला सुरुवात केली. भीक मागून त्या दरमहा ३० हजार रुपये कमवतात.
३. संभाजी काळे : संभाजी काळे हे देखील मुंबईत भीक मागतात. ते खारजवळ भीक मागताना दिसतात. एका माहितीनुसार, त्यांच्या बँक खात्यात सुमारे दोन लाख रुपये जमा झाले होते. ते प्रॉपर्टीशी संबंधित व्यवसायही करतो.
४. कृष्णकुमार गिते : कृष्णकुमार गिते हे जगातील सर्वात श्रीमंत भिकाऱ्यांच्या यादीत समाविष्ट आहेत. त्यांच्याकडे 5 लाखांहून अधिक किमतीचे अपार्टमेंट आहे. ते मुंबईत देखील भीक मागतात.