मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांना सल्ला दिला आहे (Banks have been advised) की लोक 2,000 (2ooo Currency Notes) रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी (Exchang) किंवा जमा करण्यासाठी (Deposite) येतात तेव्हा उन्हापासून संरक्षण करण्यासाठी ‘शेड्स’ची व्यवस्था करावी (Arrangement Of Shades). यासोबतच रांगेतील लोकांसाठी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात यावी. विशेष म्हणजे 2016 मध्ये नोटाबंदीच्या काळात नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये रांगा लागल्या होत्या आणि या काळात अनेक ग्राहकांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
शुक्रवारी 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याची घोषणा होऊनही ती कायदेशीर चलनातच राहणार आहे. 2016 मध्ये नोटाबंदीच्या घोषणेनंतर अशी स्थिती नव्हती. त्यावेळी लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. रिझर्व्ह बँकेने सोमवारी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, “बँकांना त्यांच्या शाखांमध्ये वाट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी शेड आणि पाण्याची व्यवस्था करण्याची सूचना देण्यात आली आहे. बँकांना नेहमीच्या पद्धतीने काउंटरवर नोट बदलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय बँकांना 2000 रुपयांच्या नोटा जमा आणि दररोज बदलून ठेवण्यास सांगितले आहे.
[read_also content=”साप्ताहिक राशीभविष्य : 21 May To 27 May 2023, कसा जाईल हा आठवडा; वाचा https://www.navarashtra.com/web-stories/weekly-horoscope-21-may-to-27-may-2023-saptahik-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]
त्याच वेळी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी सांगितले की, 2000 रुपयांच्या बहुतांश नोटा 30 सप्टेंबरच्या अंतिम मुदतीपर्यंत परत येतील. चलनातील सर्वोच्च मूल्याचे चलन अचानक काढून घेण्याच्या आश्चर्यकारक घोषणेनंतर, दास यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले की, हा निर्णय मध्यवर्ती बँकेच्या चलन व्यवस्थापनाचा भाग होता. त्यांनी स्पष्ट केले की 2,000 रुपयांची नोट कायदेशीर चलनातच राहील. गव्हर्नर म्हणाले की युक्रेन युद्ध आणि पश्चिमेकडील काही बँकांचे अपयश असूनही, देशाची चलन व्यवस्थापन प्रणाली मजबूत आहे आणि विनिमय दर स्थिर आहे.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 22 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-22-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]