केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी २०१८ मध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये इतकी आर्थिक मदत प्रत्येक तीन महिन्याला २००० रुपये याप्रमाणे वितरित केली जाते. आतापर्यंत केंद्र सरकारकडून या योजनेचे एकूण १६ हप्ते जारी करण्यात आले आहेत. योजनेचा १७ वा हप्ता १८ जून रोजी जारी केला जाणार आहे. मात्र, केंद्र सरकारकडून अशाच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ दिला जाणार आहे. ज्यांनी या योजनेसाठीची ई-केवायसी पूर्ण केलेली असेल. त्यामुळे तुम्ही आतापर्यंत पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी पूर्ण केलेली नसेल तर तात्काळ पूर्ण घ्या. अन्यथा तुम्हाला योजनेचा १७ वा हप्ता मिळणार नाही.
काय आहे संपूर्ण प्रक्रिया?
दरम्यान, देशातील 9.26 कोटी शेतकऱ्यांना लवकरच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता वितरित केला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही या योजनेचा अर्ज करताना एक जरी चूक केली तरीही तुम्हाला केंद्र सरकारच्या पीएम किसान योज़नेच्या १७ व्या हप्त्यापासून वंचित ठेवले जाऊ शकते. याच पार्श्वभूमीवर या योजनेसाठी ई-केवायसी कशी करायची? याबाबत जाणून घेणार आहोत.
(फोटो सौजन्य : Freepik)
तुम्ही लाभार्थी आहात की नाही? असे करा चेक?
1. या योजनेत तुम्ही लाभार्थी आहात की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला अगोदर pmkisan.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
2. या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला ‘फार्मर कॉर्नर’ या सेक्शनमध्ये जाऊन बेनिफिशियरी स्टेटसवर क्लिक करावे लागेलच
3. त्यानंतर तुम्हाला आधार नंबर किंवा रजिस्टर्ड बँक अकाऊँट डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल
4. त्यानंतर तुम्हाला ‘गेट डेटा’ या ऑप्शनवर क्लीक करावे लागेल.
5. त्यानंत पुढच्या काही सेकंदांत तुम्ही या योजनेचे लाभार्थी आहात की नाही हे स्क्रीनवर दिसेल.
अशी करा ई-केवायसी?
– जर शेतकऱ्यांना ओटीपी-आधारित ई-केवायसी करायची असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योनजेच्या (https://pmkisan.gov.in/) अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
– त्यानंतर शेतकऱ्यांना ‘फार्मर कॉर्नर’ सेक्शनवर क्लिक करायचे आहे. आणि ई-केवायसी या पर्यायावर केली क्लिक करायचे आहे.
– त्यानंतर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपला आधार क्रमांक आन मोबाईल नंबर टाकायचा आहे.
– त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी (वन टाइम पासवर्ड) प्राप्त होईल.
– त्यानंतर ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ओटीपी टाकायचा आहे.
बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी ई-केवायसी?
– बायोमेट्रिक प्रमाणीकरण प्रक्रियेद्वारे ई-केवायसी करण्यासाठी जवळच्या सीएससी (डिजिटल सेवा केंद्र) मध्ये जा.
– डिजिटल सेवा केंद्र चालकाला पीएम-किसान योजनेची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी माहिती सांगा.
– यामध्ये तुमचा आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक यांची गरज असणार आहे.
– डिजिटल सेवा केंद्र चालक तुमच्या बोटाचे ठसे किंवा डोळ्याचे स्कॅन करून बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण करेल.
– त्यानंतर पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी पूर्ण झाल्याचा संदेश मोबाईलवर प्राप्त होईल.