फोटो सौजन्य: iStock
Nissan मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने सप्टेंबर 2025 मध्ये 10,500 युनिट्सची एकत्रित विक्री नोंदवली, जे सप्टेंबर 2024 च्या 9,629 युनिट्सच्या तुलनेत 9.3% वाढ दर्शवते. या महिन्यात देशांतर्गत विक्री 1,652 युनिट्स, तर निर्यात 8,872 युनिट्स होती. विशेष म्हणजे, दक्षिण आशियातील बाजारात 1,120 युनिट्सची विक्रमी मासिक विक्री नोंदवली गेली, जी त्या प्रदेशातील निसानसाठी आतापर्यंतची सर्वाधिक आहे. जीएसटी स्लॅबमध्ये सुधारणा झाल्याने विक्रीत वेग आला आणि ग्राहकांना न्यू मॅग्नाइटसाठी 1 लाख रूपयांपर्यंतचा लाभ मिळाला.
न्यू निस्सान मॅग्नाइटमध्ये 10 वर्षांची एक्सटेंडेड वॉरंटी दिल्याने ग्राहकांमध्ये मोठी मागणी निर्माण झाली. तसेच निस्सानने सप्टेंबरमध्ये कुरो स्पेशल एडिशन सादर करून ग्राहकांचा उत्साह वाढवला, ज्यामध्ये एक्सक्लुझिव्ह ब्लॅक एक्सटीरियर, रिफाइंड इंटिरिअर आणि विशिष्ट जपानी-प्रेरित डिझाइन वैशिष्ट्यांचा समावेश आहे. तसेच, टेक्ना, टेक्ना+ आणि एन-कनेक्टा प्रकारांमध्ये नवीन मेटॅलिक ग्रे रंग उपलब्ध करून ग्राहकांना वैयक्तिक स्टाइलशी जुळणारा प्रीमियम पर्याय मिळतो.
Hero च्या ‘या’ दमदार बाईकमध्ये मिळणार क्रूज कंट्रोल, मिळणार धमाकेदार फीचर्स
निस्सान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स म्हणाले, “सप्टेंबर महिना आमच्यासाठी रोमांचक ठरला. न्यू निस्सान मॅग्नाइटला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि GST लाभामुळे डिलिव्हरी गती वाढली. दक्षिण आशियातील विक्रमी निर्यात भारताची वाढती जागतिक भूमिका अधोरेखित करते. आम्ही आगामी 7-सीटर बी-एमपीव्ही, 5-सीटर सी-एसयूव्ही आणि 7-सीटर सी-एसयूव्ही सादर करून एक समृद्ध उत्पादन पोर्टफोलिओ वितरित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.”
सेफ्टी फीचर्समध्ये न्यू मॅग्नाइटला GN-CAP 5-स्टार रेटिंग मिळाले आहे, ज्यात प्रौढ प्रवाशांसाठी 5 स्टार आणि लहान प्रवाशांसाठी 3 स्टार समाविष्ट आहे. बोल्ड डिझाइन, 20+ प्रथम आणि सर्वोत्तम-इन-सेगमेंट वैशिष्ट्ये आणि 55+ सेफ्टी फीचर्समुळे ही बी-एसयूव्ही बाजारातील उत्कृष्ट निवड ठरली आहे.
Renault Kwid Facelift लवकरच होणार लॉन्च; कमी किमतीत स्टायलिश आणि आधुनिक कार
निस्सानने भारतातील डीलरशिप नेटवर्क वाढवले असून, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 180 आणि 2026-27 मध्ये 250 डीलरशिपचा उद्देश ठेवला आहे, ज्यामुळे ग्राहक सुलभता आणि नवीन उत्पादनांच्या अनावरणाची तयारी सुलभ होईल. मेड इन इंडिया असलेली न्यू निस्सान मॅग्नाइट आता 65+ देशांमध्ये विकली जाते, ज्यामध्ये उजव्या आणि डाव्या हाताने चालणाऱ्या बाजारपेठांचा समावेश आहे, आणि ती निसानच्या “वन कार, वन वर्ल्ड” स्ट्रॅटेजीचे प्रतीक आहे.