Tea Side Effects: उपाशी पोटी चहासोबत चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन, आतड्यांचे होईल गंभीर नुकसान
Tea Side Effects: सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचं चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. चहा कॉफीच्या सेवनाशिवाय दिवसाची सुरुवात चांगली झाल्यासारखे अजिबात वाटत नाही. याशिवाय चहासोबत बिस्किट, चिवडा किंवा स्नॅकस आणून खाल्ले जातात. पण उपाशी पोटी तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. कळत नकळत खाल्लेल्या पदार्थांमुळे आणि चुकीच्या फूड कॉम्बिनेशन्समुळे आतड्यांचे नुकसान होऊन आरोग्य बिघडते. अन्नपदार्थांचे चुकीच्या पद्धतीने सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि वारंवार ऍसिडिटी होते. त्यामुळे चहासोबत चुकूनही या पदार्थांचे सेवन अजिबात करू नये.(फोटो सौजन्य – istock)
एकदा वापरलेलं तेल पुन्हा तळण्यासाठी वापरताय? शरीराला होऊ शकतात हे धोके!
गरमागरम चहा प्यायल्यानंतर लगेच थंड पाणी किंवा कोणत्याही थंड पदार्थांचे अजिबात सेवन करू नका. थंड पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराच्या तापमानात अनेक बदल होतात. यामुळे गळा आणि दाढांमध्ये वेदना वाढू लागतात. गरम आणि थंड पदार्थांचे मिश्रण एकत्र खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि शरीरात अनेक बदल दिसून येतात.
चहासोबत चिवडा, चकली किंवा अतितिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे पोटात ॲसिडिटी आणि छातीत जळजळ होऊन अपचनाच्या समस्या वाढू लागतात. त्यामुळे रिकाम्या पोटी चहासोबत कोणत्याही पदार्थांचे सेवन करू नये. चहामध्ये कॅफिन असते, जे तिखट पदार्थ एकत्र खाल्ल्यामुळे पोटाचा समतोल बिघडण्यास कारणीभूत ठरते. चहासोबत हळद असलेल्या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. चहा आणि हळदीचे घटक पोटात एकत्र गेल्यामुळे गॅस, अपच आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या वाढू शकतात.
चहासोबत चुकूनही आंबट पदार्थांचे सेवन करू नये. आंबट पदार्थांच्या सेवनामुळे आम्ल्पित वाढते आणि अपचनाच्या समस्या वाढून शरीराला हानी पोहचते. दूध घालून बनवलेल्या चहासोबत लिंबू किंवा लिंबापासून बनवलेला कोणताही आंबट पदार्थ खाल्ल्यास पोटात जाऊन दूध फाटते आणि तीव्र ऍसिडिटी आणि अपचनाच्या समस्या वाढू लागतात.
Diwali Food Poisoning: सणाचा गोडवा पडू शकतो महागात! मिठाईपासून फराळापर्यंत, खाण्याच्या चुका टाळा
चहा आणि चॉकलेटचे कॉम्बिनेशन ऐकायला चांगले वाटत असेल तरीसुद्धा शरीरासाठी अजिबात चांगले नाही. या दोन्ही पदार्थांमध्ये कॅफिन असते. दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्यामुळे शरीरात कॅफिनची पातळी वाढते आणि अस्वस्थता, चिडचिड आणि रात्री झोप न लागणे इत्यादी समस्या वाढू लागतात. त्यामुळे चहा आणि चॉकलेट एकत्र अजिबात खाऊ नका.
Ans: उपाशी पोटी चहा प्यायल्याने काही लोकांना अॅसिडिटी, छातीत जळजळ, मळमळ आणि पोटात अस्वस्थता जाणवू शकते. चहामधील कॅफिन आणि टॅनिन्स यामुळे पचनावर परिणाम होऊ शकतो.
Ans: चहासोबत अतितेलकट, तिखट आणि खूप गोड पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवावे. तसेच चहासोबत लगेच लोहयुक्त आहार घेतल्यास त्यातील लोहाचे शोषण कमी होऊ शकते.
Ans: चहामध्ये लिंबाचा रस मिसळल्याने काही लोकांना अॅसिडिटी किंवा पोटात जळजळ होऊ शकते. ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे त्यांनी याबाबत विशेष काळजी घ्यावी.






