फोटो सौजन्य - Social Media
या आठवड्यात गुंतवणूकदारांसाठी IPO बाजारात चांगली चहलपहल दिसणार आहे. किमान पाच कंपन्यांचे शेअर्स लिस्टिंगसाठी येणार आहेत. Orkla India, Studds Accessories, Jayesh Logistics, Game Changers Texfab आणि Safecure Services JE. त्याचबरोबर काही नवीन IPO देखील सुरू होत आहेत. त्यात सर्वात चर्चेत असलेला आहे Groww (ग्रो) या ऑनलाइन स्टॉक ब्रोकिंग प्लॅटफॉर्मची पॅरेंट कंपनी Billionaires Garage Ventures Ltd चा IPO.
हा IPO ४ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत खुला राहणार आहे. कंपनी एकूण ₹6,632.30 कोटी उभारणार आहे. यात ₹1,060 कोटींचा फ्रेश इश्यू आणि ₹5,572.30 कोटींचा ऑफर फॉर सेल (OFS) समाविष्ट आहे. प्राइस बँड ₹95 ते ₹100 असून लॉट साइज 150 शेअर्स इतका आहे. या OFS अंतर्गत प्रमोटर्स ललित केशरे, नीरज सिंग, ईशान बंसल आणि हर्ष जैन तसेच Peak XV Partners, Ribbit Capital, YC Holdings II आणि इतर फंड्स आपली काही हिस्सेदारी विकणार आहेत. Groww ची स्थापना २०१६ मध्ये झाली असून ती आज भारतातील सर्वात विश्वासार्ह ऑनलाइन गुंतवणूक प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहे. ती शेअर्स, म्युच्युअल फंड्स, कमॉडिटीज, वेल्थ मॅनेजमेंट, मार्जिन ट्रेडिंग आणि लोन अगेंस्ट शेअर्स सेवा देते.
या सर्व IPOमुळे या आठवड्यात बाजारात गुंतवणूकदारांची मोठी हालचाल होण्याची शक्यता आहे. विशेषतः Groww IPOकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






