महायुतीच्या नेत्यांचा निर्धार,कोल्हापूरात काँग्रेस नेत्यांना हुकूमशाहीने काम करण्याची सवय आहे. त्यांच्या हुकूमशाहीनेच महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरद पवार गट बाहेर पडला आहे.त्यांच्या टिकेला उत्तर देण्याची आता गरज नाही.. ते आता सैरभैर झालेत. त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. मात्र भविष्यात ते बोलतील त्याच पद्धतीने त्यांना उत्तर देण्यात येणार असल्याची टीका भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर केली.कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत विजयासाठी महायुतीने अक्षरशः कंबर कसली. एकीकडे राज्यात महायुतीतच वेगळ चित्र पाहायला मिळत असताना कोल्हापुरात मात्र भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आज महायुतीच्या सर्व 81 उमेदवारांची कार्यशाळा पार पडली. एका हॉटेलमध्ये घेतलेल्या कार्यशाळेला खासदार धनंजय महाडिक, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आणि आमदार राजेश क्षीरसागर हे उपस्थित होते. या तीनही नेत्यांनी उमेदवारांना आचारसंहितेचे पालन, खर्चाच्या मर्यादा , प्रचाराचे मुद्दे काय असावेत यासह विषयावर मार्गदर्शन करत उरलेल्या पंधरा दिवसात नियोजनबद्ध निवडणूक लढवून विजयाचा गुलाल कसा खेचून आणता येईल या बाबत मार्गदर्शन केलं. दरम्यान आगामी काळात मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभा या कोल्हापुरात निवडणुकीच्या अनुषंगाने होणार असल्यासही त्यांनी सांगितलं. तसेच या निवडणुकीत या तीनही नेत्यांनी कोल्हापूर महापालिकेतील महायुतीच्या 81 उमेदवारांना कानमंत्र दिलंय. या निवडणुकीत महायुतीचा झेंडा कोल्हापूर महानगरपालिकेवरती फडकेल असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार धनंजय महाडिक आणि मंत्री हसन मुश्रीफांनी सतेज पाटील यांच्यावर टीका केली.शिवाय महापालिका निवडणुकीसाठी कोल्हापूरात 12 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मिसळ कट्टा टाॅक शो होणार असल्याचं धनंजय महाडिक यांनी सांगितलं.