नवीन वर्षाच्या मंगलमय सुरुवातीसाठी स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याच्या श्रद्धेने आज अक्कलकोट नगरी स्वामीभक्तांनी फुलून गेली. “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” हा आधार देणारा संदेश देणाऱ्या स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटे पासूनच मंदिर परिसरात गर्दी केली होती. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी तब्बल चार ते पाच किलोमीटर लांबीची रांग लागली होती. शिस्तबद्ध पद्धतीने भाविक दर्शनासाठी उभे राहिले असून, प्रशासन व स्वयंसेवकांकडून उत्तम नियोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक अक्कलकोट येथे दाखल झाले होते. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी स्वामी समर्थांचे दर्शन झाल्याने अनेक भाविक भावनिक झाले होते. काहींच्या डोळ्यांत अश्रू तर काहींच्या चेहऱ्यावर समाधान आणि श्रद्धेचा भाव दिसून येत होता.