Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

8th Pay Commission: बेसिक सॅलरी ३४ हजारांच्या पार? ८ व्या वेतन आयोगातील ‘फिटमेंट फॅक्टर’ ठरणार गेम चेंजर

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या ८ व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) हालचालींना आता वेग आला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 14, 2026 | 10:19 AM
8th Pay Commission,Government Employees, Salary Hike,

8th Pay Commission,Government Employees, Salary Hike,

Follow Us
Close
Follow Us:
  • ८ व्या वेतन आयोगाची (8th Pay Commission) तयारी सुरू
  • आठव्या वेतन आयोगांतर्गत होणारी पगारवाढ ही प्रामुख्याने फिटमेंट फॅक्टरवर (Fitment Factor) अवलंबून असते
  • आठव्या वेतन आयोगाचा सर्वाधिक लाभ लेव्हल १ ते लेव्हल ६ च्या कर्मचाऱ्यांना मिळण्याची शक्यता
 

8th Pay Commission:   केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या ८ व्या वेतन आयोगाची (8th Pay Commission) तयारी सुरू झाली आहे. ७ व्या वेतन आयोगाच्या तुलनेत या वेळी पगारवाढीचा दर अधिक असण्याची शक्यता असून, तो १८ ते २४ टक्क्यांच्या दरम्यान राहू शकतो. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका ‘फिटमेंट फॅक्टर’ (Fitment Factor) बजावणार आहे.

सरकारी कर्मचारी सध्या आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहेत. अधिकृतपणे आठवा वेतन आयोग जानेवारी २०२६ पासून लागू झाला असला, तरी प्रत्यक्ष पगारवाढ हातात येण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. तज्ज्ञांच्या मते, जर फिटमेंट फॅक्टर १.९२ निश्चित झाला, तर कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन थेट १८,००० रुपयांवरून ३४,५६० रुपये होऊ शकते. तसेच पेन्शनधारकांसाठी देखील ही आनंदाची बातमी आहे, कारण किमान पेन्शनमध्येही मोठी वाढ अपेक्षित आहे.

प्रवासी वाहनांच्या विक्रीत झाली मोठी वाढ; उद्योग संघटना SIAM ची माहिती

पगारवाढ आणि फिटमेंट फॅक्टर

आठव्या वेतन आयोगांतर्गत होणारी पगारवाढ ही प्रामुख्याने फिटमेंट फॅक्टरवर (Fitment Factor) अवलंबून असते. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात पगार नक्की कितीने वाढणार आणि कोणत्या लेव्हलला किती फायदा होईल, याबाबत उत्सुकता आहे.

कोणाला होणार सर्वाधिक फायदा?

प्राथमिक अंदाजानुसार, आठव्या वेतन आयोगाचा सर्वाधिक लाभ लेव्हल १ ते लेव्हल ६ च्या कर्मचाऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर महागाई भत्ता (DA) किती टक्क्यांनी वाढणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

अंमलबजावणी आणि थकबाकी (Arrears)

जरी हा आयोग २०२६ पासून लागू झाला असला, तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी पूर्ण होण्यासाठी २०२७ पर्यंतचा वेळ लागू शकतो. मात्र, कर्मचाऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही, कारण जानेवारी २०२६ पासूनचा मधला कालावधी हा थकबाकी (Arrears) म्हणून दिला जाणार आहे.

वेतन आयोग म्हणजे काय?

केंद्र सरकार वेळोवेळी वेतन आयोग स्थापन करते. त्याचे काम सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेचा आढावा घेणे आहे. आयोग महागाई, आर्थिक परिस्थिती आणि सरकारची आर्थिक क्षमता लक्षात घेऊन वेतन आणि भत्त्यांमध्ये बदल करण्याची शिफारस करतो. भारतात पहिला वेतन आयोग १९४६ मध्ये स्थापन झाला. तेव्हापासून सात वेतन आयोग लागू करण्यात आले आहेत.

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरातील चढऊतार सुरुच, काय आहेत तुमच्या शहरातील दर? जाणून घ्या सविस्तर

सातव्या वेतन आयोगादरम्यान काय घडले?

सातवा वेतन आयोग २०१६ मध्ये लागू करण्यात आला. या अंतर्गत, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी किमान मूळ वेतन ₹१८,००० प्रति महिना निश्चित करण्यात आले, तर कमाल मूळ वेतन ₹२.५ लाख प्रति महिना निश्चित करण्यात आले.

काळानुसार अशी झाली पगारवाढ?

पगार आयोगांद्वारे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार सातत्याने वाढले आहेत.

पहिला वेतन आयोग (१९४६-४७): किमान वेतन ₹५५, कमाल ₹२,०००.

दुसरा वेतन आयोग (१९५७-५९): किमान ₹८०, कमाल ₹३,०००.

तिसरा वेतन आयोग (१९७२-७३): किमान ₹१९६, कमाल ₹३,५००.

चौथा वेतन आयोग (१९८६): किमान ₹७५०, कमाल ₹८,०००.

पाचवा वेतन आयोग (१९९६): किमान ₹२,५५०, कमाल ₹२६,०००.

सहावा वेतन आयोग (२००६): किमान ₹७,०००, कमाल ₹८०,०००.

सातवा वेतन आयोग (२०१६): किमान ₹१८,०००, कमाल ₹२.५ लाख.

 

 

Web Title: 8th pay commission update basic salary may jump from 18000 to 34560

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 10:08 AM

Topics:  

  • 8th pay commission
  • Government Employees
  • Salary Hike

संबंधित बातम्या

DA Hike Update: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 60 टक्क्यांपर्यंत वाढणार? मोदी सरकार मोठी घोषणा कधी करणार?
1

DA Hike Update: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 60 टक्क्यांपर्यंत वाढणार? मोदी सरकार मोठी घोषणा कधी करणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.