Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Air India Salary Hike : अनुभवी वैमानिकांना टिकवण्यासाठी एअर इंडियाचा मोठा निर्णय! पगारात ८ ते १५ टक्क्यांची वाढ

Air India Salary Hike : विमान वाहतूक क्षेत्रातील वाढती स्पर्धा आणि अनुभवी वैमानिकांना कंपनीत टिकवून ठेवण्यासाठी एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या अनुभवी वैमानिकांच्या पगारात ८ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ जाहीर केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 09, 2026 | 04:04 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • एअर इंडियाचा मोठा निर्णय!
  • अनुभवी वैमानिकांना टिकवण्यासाठी निर्णय
  • पगारात ८ ते १५ टक्क्यांची वाढ
Air India Salary Hike : मध्य पूर्वेमधील तणावजन्य परिस्थिती आणि त्यामुळे बिघडलेले संबंध याचा परिणाम संपूर्ण जगातील देशांवर झाला आहे. कच्च्या तेलाचे वाढलेले दर पाहता या सगळ्याचा मोठा फटका बसला तो म्हणजे विमान वाहतुकीवर. ATF चे कडाडलेले दर पाहता विमानांची तिकीटंही वाढली आणि त्याचा परिणाम या उद्योगावर मोठ्या प्रमाणावर दिसून आला. ही परिस्थिती आटोक्यात ठेवणं कठीण असताना कंपनीचा चांगला स्टाफ सोडून जातो का? अशी भिती निर्माण झाली. अशीच काहीशी अवस्था एअर इंडियाची झाली आहे. पण यासाठी एअर इंडियाने आपलं शस्त्र वापरत. वैमानिकांचा पगार तब्बल ८ ते 15 टक्क्यांपर्यंत ( Air India Salary Hike ) वाढवण्याची घोषणा केली आहे. नेमकं काय घडतंय?

Teachers Retirement Age : सरकारी शिक्षकांसाठी मोठी बातमी! निवृत्तीचे वय 65 वर्षे होणार? जाणून घ्या नवीन अपडेट

फर्स्ट ऑफिसर्सना प्रथम कमांडर पदावर बढती

वैमानिकांना आकर्षित करण्याबरोबरच अनुभवी वैमानिकांना कंपनीत कायम ठेवण्यासाठी एअर इंडियाने वैमानिकांच्या वेतनात ८ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. एअर इंडियाच्या नव्या वेतनरचनेत बऱ्याच गोष्टींकडे लक्ष्य दिला जात आहे. त्यानुसार तसे बदलही करण्यात आले आहेत. एअर इंडिया एक्स्प्रेसमधील फर्स्ट ऑफिसर्सना प्रथम कमांडर पदावर बढती दिली जाणार आहे. त्यानंतर त्यांना एअर इंडियाच्या वाइड-बॉडी विमानांच्या ताफ्यात जाण्याची संधी मिळणार आहे. तसंच वाइड-बॉडी विमानांवर वैमानिकांना तुलनेने अधिक वेतन मिळते. त्यामुळे एअर इंडिया समूहात वैमानिकांना स्पष्ट करिअर मार्ग उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

बोइंग ७३७ ताफ्यांसाठी वैमानिकांची कमतरता

एअर इंडिया एक्स्प्रेसला वैमानिकांसाठी अधिक सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः बोइंग ७३७ विमानांच्या ताफ्यांसाठी वैमानिकांची कमतरता जाणवत असल्याने त्यावरही हा एक उत्तम उपाय ठरु शकतो. त्यामुळे वेतन आणि करिअरच्या संधी सुधारणे हा महत्त्वपूर्ण पर्याय आहे. त्याचबरोबर वैमानिकांचे राजीनामे रोखून अनुभवी कॉकपिट क्रू कायम ठेवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

४० तासांची हमी कायम

एअर इंडियाच्या वैमानिकांना सध्या महिन्याला ४० तासांच्या उड्डाणाची हमी वेतन व्यवस्था आहे. म्हणजे प्रत्यक्षात ४० तासांपेक्षा कमी उड्डाण झाले तरी या तासांचे किमान वेतन त्यांना मिळते. नव्या व्यवस्थेत ही ४० तासांची हमी कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, ४० तासांनंतरच्या उड्डाणासाठी फ्लाइंग अलाउन्सचे दर देखील वाढवण्याचा विचार सुरु आहे. त्यामुळे अधिक तास उड्डाण करणाऱ्या वैमानिकांना त्यांच्या कामानुसार अतिरिक्त मोबदला मिळणार आहे.

एअर इंडियाची इतर कंपन्यांशी स्पर्धा

एअर इंडिया इतर कंपन्यांशी स्पर्धा तर करत आहे. त्यात भारतात तिचा महत्त्वाचा स्पर्धेक इंडिगो आहे. त्यानंतर आखाती देशांतील विमान कंपन्यांकडूनही वैमानिकांना आकर्षक वेतनाच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. त्यामुळे वैमानिकांना टिकवून ठेवणं हे एअर इंडिया समोरचं मोठं आणि अधिक महत्त्वाचं आव्हानं आहे. हे आव्हान पेलण्यासाठी या पार्श्वभूमीवर एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने वेतनवाढीचा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.

US Russia Bill : अमेरिकेचा भारताला मोठा झटका? रशियाशी व्यापारावर 100 % टॅरिफची टांगती तलवार; काय होणार परिणाम?

Web Title: Air india salary hike pilot increment to retain experienced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • air india
  • Air India latest news
  • Business News
  • High salary Job
  • Loco Pilot
  • Marathi News
  • Salary
  • Salary Hike

संबंधित बातम्या

Ravi Prakash: मराठी शिकण्यासाठी रवि प्रकाशने लावली ‘ही’ मालिका; आता ‘दशमी’मधून मराठी प्रेक्षकांच्या भेटीला
1

Ravi Prakash: मराठी शिकण्यासाठी रवि प्रकाशने लावली ‘ही’ मालिका; आता ‘दशमी’मधून मराठी प्रेक्षकांच्या भेटीला

Job vs Business : नोकरी की व्यवसाय? कोणता पर्याय तुम्हाला वेगाने बनवू शकतो श्रीमंत; हे आहे फायद्या-तोट्याच गणित?
2

Job vs Business : नोकरी की व्यवसाय? कोणता पर्याय तुम्हाला वेगाने बनवू शकतो श्रीमंत; हे आहे फायद्या-तोट्याच गणित?

Chandrapur News: रेल्वेच्या धडकेत नर बिबट्याचा मृत्यू; बल्लारशाह-काजीपेठ मार्गावर वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
3

Chandrapur News: रेल्वेच्या धडकेत नर बिबट्याचा मृत्यू; बल्लारशाह-काजीपेठ मार्गावर वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Crime News: ऑनलाइन मैत्री… मग गुप्त माहितीचा खेळ! हवाई दलाच्या अधिकाऱ्याविरोधात गंभीर आरोप
4

Crime News: ऑनलाइन मैत्री… मग गुप्त माहितीचा खेळ! हवाई दलाच्या अधिकाऱ्याविरोधात गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.