Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आदित्य बिर्ला ग्रुपची नवी झेप; १,८०० कोटींच्या गुंतवणुकीसह ‘अल्ट्राव्होल्ट’सह वायर्स अँड केबल्स व्यवसायात दमदार एन्ट्री

आदित्य बिर्ला ग्रुपने ‘अल्ट्राव्होल्ट’ या ब्रँडसह वायर्स अँड केबल्स व्यवसायात प्रवेश केला आहे. तब्बल १,८०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह कंपनीने पुढील पाच वर्षांत या क्षेत्रातील अव्वल दोन कंपन्यांमध्ये स्थान मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 08, 2026 | 01:39 PM
आदित्य बिर्ला ग्रुपने ‘अल्ट्राव्होल्ट’ या ब्रँडसह वायर्स अँड केबल्स व्यवसायात प्रवेश केला आहे. तब्बल १,८०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह कंपनीने पुढील पाच वर्षांत या क्षेत्रातील अव्वल दोन कंपन्यांमध्ये स्थान मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

आदित्य बिर्ला ग्रुपने ‘अल्ट्राव्होल्ट’ या ब्रँडसह वायर्स अँड केबल्स व्यवसायात प्रवेश केला आहे. तब्बल १,८०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह कंपनीने पुढील पाच वर्षांत या क्षेत्रातील अव्वल दोन कंपन्यांमध्ये स्थान मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Follow Us
Follow Us:
  • १,८०० कोटींच्या गुंतवणुकीसह ‘अल्ट्राव्होल्ट’ची लाँचिंग
  • ५ वर्षांत वायर्स-कॅबल्स क्षेत्रात टॉप-२ मध्ये येण्याचे लक्ष्य
  • ५००+ जिल्हे आणि ६,००० पिनकोडमध्ये विस्ताराची योजना
आदित्य बिर्ला ग्रुपने आज अल्ट्राव्होल्ट या वायर्स अँड केबल्स व्यवसायाच्या लाँचची घोषणा केली, जो ग्रुपचा तीन वर्षांतील चौथा नवीन व्यवसाय ठरला आहे. १,८०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे पाठबळ असणारी अल्ट्राव्होल्ट क्षमतेनुसार अल्ट्राव्होल्ट वायर्स विभागामध्ये दुसरी सर्वात मोठी कंपनी असेल. अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड अंतर्गत असलेला हा व्यवसाय पुढील ५ वर्षांत एक मोठा राष्ट्रीय ब्रँड बनून अव्वल दोन कंपन्यांमध्ये स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवतो. वायर्स आणि केबल्सच्या बाजारपेठेत अल्ट्राटेकचा प्रवेश हा त्याच्या बिल्डिंग सोल्यूशन्स धोरणानुसार ग्रे सिमेंट, रेडी-मिक्स काँक्रीट, बिल्डिंग प्रॉडक्ट्स आणि व्हाईट सिमेंटच्या पwiलीकडे जाऊन बांधकाम व्हॅल्यू चेनमध्ये आपला सहभाग वाढवतो. यामुळे अल्ट्राटेकला गृहनिर्माण, पायाभूत सुविधाआणि विद्युतीकरण (इलेक्ट्रिफिकेशन) या क्षेत्रांमधील वाढत्या संधींमध्ये अधिक सखोलतेने सहभागी होणे शक्य होणार आहे.

Blinkit ला मागे टाकणार Flipkart Minutes? 10 मिनिटांत डिलिव्हरी रेससाठी आता मोठा गेमप्लॅन, काय आहे खास?

आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष श्री. कुमार मंगलम बिर्ला म्हणाले, “वायर्स आणि केबल्स भारताच्या विकासाच्या पुढील टप्प्याचा केंद्रबिंदू बनत आहेत. ते भारतीय अर्थव्यवस्थेतील तीन मोठ्या ट्रेंड्सच्या संगमस्थळावर आहेत – नागरीकरण, विद्युतीकरण आणि डिजिटायझेशन. पुढील दशकात १०० दशलक्षांपेक्षा नवीन घरे, वाढत्या ऊर्जा पायाभूत सुविधा आणि डेटा सेंटर्सची वेगाने होणारी वाढ या श्रेणीमध्ये मोठी वाढ घडवून आणण्यासाठी तयार आहेत. आमचा विशिष्ट फायदा हा उत्पादन, त्याचे मूलभूत घटक आणि संबंधित परिसंस्थेच्या सखोल आकलनातून येतो.” ते पुढे म्हणाले, “अलीकडच्या वर्षांत, नवीन यशस्वी व्यवसाय निर्माण करणे हा स्वतःच ग्रुपच्या डीएनएचा मुख्य भाग आणि ग्रुपसाठी एक महत्त्वाचा वेगळेपणा बनला आहे. मी आदित्य बिर्ला ग्रुपकडे नवीन संधींसाठी प्लॅटफॉर्म आणि इंजिन प्रदान करणारा घटक म्हणून पाहतो.”

अल्ट्राव्होल्टचे डायरेक्टर श्री. दिलीप गौड म्हणाले, “आम्ही प्रदेशानुसार बाजारपेठेची चाचणी घेण्याऐवजी संपूर्ण भारत स्तरावर प्रवेश करत आहोत. आमची योजना एक लाखांहून अधिक रिटेलर्सपर्यंत पोहोचण्याची आणि ५,००० पेक्षा जास्त अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्यूशन्स (यूबीएस) आउटलेट्सद्वारे उपलब्धता अधिक सक्षम करण्याची आहे. ५०० हून अधिक जिल्हे आणि ६,००० पिन कोडमध्ये सुरुवातीला करण्यात येणारा हा महत्त्वाकांक्षी विस्तार आमच्या वाढीसाठी आणि नवोन्मेषासाठीच्या कटिबद्धतेला बळकटी देतो. आमची अत्याधुनिक उत्पादन सुविधा, २० पेक्षा जास्त गोदामांचे जाळे, विस्तृत चॅनेल संपर्क यासोबतच वैयक्तिक घरबांधणी करणारे, कंत्राटदार, रिअल-इस्टेट डेव्हलपर्स आणि ईपीसी कंपन्यांशी अल्ट्राटेकचे असलेले सखोल संबंध आणि ऑल-इंडिया वितरण नेटवर्क आम्हाला व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी एक भक्कम प्लॅटफॉर्म प्रदान करते. आमचे उद्दिष्ट गुणवत्ता, तंत्रज्ञान, सेवा आणि चॅनेल भागीदारीद्वारे महत्त्वाकांक्षी पद्धतीने व्यवसाय उभारणे हे आहे.”

हा व्यवसाय गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील झगडिया येथील नवीन उत्पादन सुविधेवर आधारित आहे. गुजरात राज्यातील हे धोरणात्मक स्थान कार्यक्षम वितरण आणि लॉजिस्टिक ऑपरेशन्स सुलभ करेल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे भारतातील बाजारपेठांना सेवा देण्याची कंपनीची क्षमता अधिक दृढ होईल. अल्ट्राव्होल्टचे सीईओ श्री. श्रीराम रंगराजन म्हणाले, “वायर्स ही घराची जीवनरेखा असते, पण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष होते. आम्हाला घरगुती ग्राहकांबद्दलच्या आमच्या आकलनाचा वापर करून त्यांच्या वाढत्या गरजांनुसार उत्पादने विकसित करायची आहेत. उत्पादन विकासाच्या केंद्रस्थानी सुरक्षितता, कामगिरी आणि भविष्यासाठी सज्जता ठेवून आम्हाला या श्रेणीत अधिक ग्राहक-प्रथम दृष्टिकोन आणायचा आहे. या विचाराने, आम्ही निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आणि पायाभूत सुविधांच्या वापरासाठी डिझाइन केलेल्या होम वायर्स, फ्लेक्सिबल वायर्स आणि केबल्सच्या पोर्टफोलिओसह लाँच करत आहोत. कालावधीनुसार, इलेक्ट्रिक अॅक्सेसरीजच्या विस्तृत श्रेणीमध्ये विस्तार करण्याची आमची योजना आहे.”

Share Market Today: भारतीय शेअर बाजारात घसरणीची शक्यता; तज्ज्ञांनी खरेदीसाठी सुचवले ‘हे’ स्टॉक्स

हा व्यवसाय उत्पादनाचे ज्ञान, सुरक्षितता आणि इन्स्टॉलेशन मानकांवर लक्ष केंद्रित करणारा एक सर्वोत्कृष्ट आणि नाविन्यपूर्ण इलेक्ट्रिशियन-एंगेजमेंट प्रोग्राम देखील तयार करत आहे. या प्रोग्रामने लाँच होण्यापूर्वीच १,६०० पेक्षा जास्त इलेक्ट्रिशियन्सना जोडले आहे आणि ईएसएससीआयसह स्किल इंडिया प्रोग्राम अंतर्गत येत्या वर्षात ४०,००० हून अधिक इलेक्ट्रिशियन्सना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

Web Title: Aditya birla group ultravolt wires cables business 1800 crore investment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • Aditya Birla
  • Business
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Pimpri Chinchwad : देहूच्या भंडारा डोंगरावर सापडले अवघ्या दीड वर्षाचे गोंडस बाळ! नाव ना पत्ता… आई-वडिलांचा शोध सुरू
1

Pimpri Chinchwad : देहूच्या भंडारा डोंगरावर सापडले अवघ्या दीड वर्षाचे गोंडस बाळ! नाव ना पत्ता… आई-वडिलांचा शोध सुरू

हरियाणा कर्जबाजारी; व्याज फेडण्यासाठीही सरकारला घ्यावे लागले नवे कर्ज
2

हरियाणा कर्जबाजारी; व्याज फेडण्यासाठीही सरकारला घ्यावे लागले नवे कर्ज

Raigad News: शार्लोट लेकचा गाळ नदीत सोडल्याने खळबळ! मोरबे धरणाच्या जलसाठ्याला धोका? नवी मुंबई महापालिका संतापली
3

Raigad News: शार्लोट लेकचा गाळ नदीत सोडल्याने खळबळ! मोरबे धरणाच्या जलसाठ्याला धोका? नवी मुंबई महापालिका संतापली

Raigad News: तुकडेबंदीच्या कचाट्यात अडकलेल्या जमीनधारकांना मोठा दिलासा! जुन्या व्यवहारांना आता मिळणार कायदेशीर मान्यता
4

Raigad News: तुकडेबंदीच्या कचाट्यात अडकलेल्या जमीनधारकांना मोठा दिलासा! जुन्या व्यवहारांना आता मिळणार कायदेशीर मान्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.