Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या तरुणांमध्ये वाढतोय मानसिक तणाव? 49.5% जण स्वतःच सामना करतात, फक्त 9.2% घेतात प्रोफेशनल मदत; ‘एमपॉवर 2026’ सर्वेक्षणातील

Aditya Birla unpack your emotional baggage: जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त (१० सप्टेंबर) प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनपॅक युअर इमोशनल बॅगेज सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे की, १८ ते २५ वयोगटातील तरुण ताणाच्या भावना स्वतःपुरत्याच ठेवतात आणि केवळ १३.६ टक्‍के प्रतिसादक त्यांना पूर्वग्रहविरहित पाठिंबा मिळाल्याचे सांगतात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 11, 2026 | 08:30 PM
Aditya Birla unpack your emotional baggage

Aditya Birla unpack your emotional baggage

Follow Us
Follow Us:
  • भारतातील 49.5% तरुण एकट्याने झेलतात तणाव
  • फक्त 9.2% जण प्रोफेशनल मदत घेतात
  • सर्वेक्षणातून समोर आली चिंताजनक आकडेवारी
आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत सामाजिक उपक्रम आणि मानसिक आरोग्य सेवा प्रदाता एमपॉवरच्या नवीन सर्वेक्षणानुसार, मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढत असली तरी भारतातील तरुण अजूनही भावनिक आव्हानांचा सामना करत आहेत. “अनपॅक युअर इमोशनल बॅगेज: अ कॉल टू अॅक्शन फॉर यंग इंडियन्स टू सीक हेल्प ड्युरिंग इमोशनल डिस्ट्रेस” या शीर्षकाच्या सर्वेक्षणात भारतातील मुंबई, पुणे, दिल्ली एनसीआर, बेंगळुरू, कोलकाता, अहमदाबाद, गोवा, हैदराबाद, चेन्नई आणि जयपूर या दहा प्रमुख भागांमधील १८ ते २५ वयोगटातील तरुणांकडून प्रतिसाद गोळा करण्यात आले. हे संशोधन तरुणांमधील भावनिक तणाव, त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची तंत्रे आणि त्रासाबाबतच्या सामाजिक प्रतिक्रियांचा शोध घेते. मानसिक आरोग्याविषयी जागरूकता आणि मदत घेण्याची त्यांची इच्छा किंवा क्षमता यांमधील एक व्यापक तफावत यातून स्पष्ट होते.

Crypto Market: क्रिप्टो मार्केटमध्ये मोठा बदल! Meme Coin सोडून आता ‘चांगल्या’ कॉईनकडे गुंतवणूकदारांचा कल

मानसिक स्वास्थ्याविषयी सार्वजनिक चर्चा वाढल्या असल्या तरी एमपॉवर सर्वेक्षणातील निष्कर्षांवरून दिसून आले आहे की, भारतातील ४९.५ टक्‍के तरुण अजूनही ताणाच्या भावना लपवून ठेवतात आणि त्यांचा पूर्णपणे स्वतःच्या बळावर सामना करण्याचा प्रयत्न करतात, तर केवळ ९.२ टक्‍के व्यक्तींनी प्रोफेशनलकडून मदत मागितली आहे.

मदत घेण्याबाबतची ही अनिच्छा तरुणांच्या स्वतःच्या त्रासाला सामोरे जाण्याच्या पद्धतीपर्यंत देखील विस्तारलेली दिसते, जिथे ते प्रामुख्याने भावना लपवण्याचा प्रयत्न करतात. ४०.९ टक्‍के प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की, ते ठीक नसतात तेव्हाही इतरांना ‘मी ठीक आहे’ असे सांगतात. अनेकांनी त्यांच्या भावनांबद्दलच्या चर्चा पूर्णपणे टाळल्याचे किंवा ते ज्या अनुभवातून जात आहेत त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी स्वतःला सतत व्यस्त ठेवल्याचे नमूद केले आहे.

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त मत व्यक्त करत आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट, एमपॉवरच्या संस्थापकीय अध्यक्षा श्रीमती नीरजा बिर्ला म्हणाल्या, “आम्ही संवाद साधलेल्या तरुणांपैकी चाळीस टक्‍के तरुणांना फक्त ‘प्रबळ राहा’ असे सांगण्यात आले आहे. केवळ नऊ टक्‍के तरुणांना प्रोफेशनलकडून मदत घेता आली. या दोन आकड्यांच्या दरम्यान कुठेतरी आपण त्यांना समजून घेण्यात अपयशी ठरत आहोत. आपण पाऊल उचलण्यापूर्वी एखादे संकट येण्याची वाट पाहत राहतो. यावरील उपाय म्हणजे अगदी सुरुवातीपासून शाळांमध्ये हे ओळखले पाहिजे, ज्यामुळे शांत राहणे हीच तरुणांना माहित असलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची एकमेव पद्धत ठरणार नाही.”

या सर्वेक्षणामधून निदर्शनास येते की, तरुण आपल्या भावना व्यक्त करतात, तेव्हा त्यांना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रतिक्रियांचा सामना करावा लागणे सामान्य आहे. ‘मजबूत राहा’ या प्रमुख प्रतिक्रियेव्यतिरिक्त (४०.४ टक्‍के), तरुणांना वारंवार सल्ला मिळतो की ते ‘अतिविचार करत आहेत’ किंवा त्यांना ‘कामावर अथवा अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास’ सांगितले जाते. याउलट, कोणीतरी कोणताही पूर्वग्रह न ठेवता त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि पाठिंबा दिला, असे सांगणारे केवळ १३.६ टक्‍के प्रतिसादक होते.

“मानसिक आरोग्य म्हणजे केवळ नैराश्य किंवा चिंतेसारखे क्लिनिकल निदान नव्हे, तर जगण्याची एक पद्धत आहे, जी आपण आपल्या अंतर्गत विचारांना कसे हाताळतो, नातेसंबंध कसे जपतो आणि भावनिक वेदनांना कशी वाट करून देतो यात दिसून येते,” असे बाल, किशोरवयीन आणि कौटुंबिक मानसोपचारतज्ज्ञ आणि एमपॉवरचे चीफ मेडिक अॅडवायजर डॉ. झिरक मार्कर म्हणाले. “तरुणांना सतत ‘मजबूत राहा’, ‘कामावर लक्ष द्या’ किंवा ‘अतिविचार करणे थांबवा’ असे सांगितले जाते, तेव्हा त्यांच्या वेदनेकडे दुर्लक्ष केले जाते. त्रास लपवून ठेवणे आणि भावना दाबून टाकल्याने मनात धोकादायक तणाव निर्माण होतो, जो गंभीर केसेसमध्ये तीव्र नैराश्याकडे आणि आत्महत्येकडेही घेऊन जाऊ शकतो. खरी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे वरवरचे सल्ले देण्यापलीकडे जाऊन सर्व इयत्तांसाठी शालेय अभ्यासक्रमात मानसिक आरोग्य शिक्षणाचा समावेश करणे होय. लहान वयात सहानुभूती आणि स्वीकारार्हता निर्माण करून आपण तरुणांना निरोगी राहण्यासाठी आवश्यक असलेली सुरक्षित जागा, प्रतिष्ठा आणि प्रोफेशनल केअर देऊ शकतो.”

मानसिक तणाव कसा निर्माण होतो यामधील तीव्र लिंगभेदही या सर्वेक्षणातून समोर

महिलांमध्ये अंतर्गत भावनिक तणाव अधिक प्रमाणात दिसून येतो, ज्यामध्ये सतत अतिविचार (महिलांचे प्रमाण ६० टक्‍के), स्वतःविषयी शंका (५६ टक्‍के), आणि बॉडी इमेजविषयी चिंता (६९ टक्‍के) अग्रस्थानी आहेत.पुरुषांमध्ये बाह्य ताणतणावांचे प्रमाण जास्त दिसून येते, ज्यामध्ये कामाशी संबंधित तणाव (पुरुषांचे प्रमाण ५७ टक्‍के) आणि आर्थिक असुरक्षितता (५४ टक्‍के) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, जोपर्यंत दुसरी व्यक्ती निदर्शनास आणून देत नाही तोपर्यंत काहीतरी बिनसले आहे याची जाणीव न होणाऱ्या प्रतिसादकर्त्यांपैकी ६० टक्‍के पुरुष होते, हे तरुण पुरुषांमध्ये भावनिक आत्मजागरूकतेची किती तीव्र गरज आहे हे अधोरेखित करते.

यासोबत, भावनिक त्रास दैनंदिन जीवनात कसा दिसून येतो हे देखील या सर्वेक्षणातून स्पष्ट होते. ४७ टक्‍के व्यक्तींनी अधिक सहजरित्या राग येणे किंवा चिडचिड होणे नमूद केले, त्यानंतर लक्ष केंद्रित करण्यात किंवा गोष्टींचा आनंद घेण्यात अडचण येणे (३६.७ टक्‍के) आणि दैनंदिन कामावर किंवा दिनचर्येवर परिणाम होणे (३१.३ टक्‍के) यांचा क्रमांक होता.

हे सर्वेक्षण एक गोष्ट स्पष्ट करते

केवळ जागरूकता वाढवणे आता पुरेसे नाही. या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनी, आपले लक्ष केवळ मानसिक आरोग्याविषयी चर्चा करण्यावरून बदलून तरुणांना पावले उचलण्यासाठी सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करण्यावर केंद्रित केले पाहिजे. आत्महत्या रोखण्याची सुरुवात संकट उद्भवण्याच्या खूप आधीच होते. याची सुरुवात त्या कलंक, पूर्वग्रह आणि दुर्लक्ष करणाऱ्या प्रतिक्रियांना नष्ट करण्यापासून होते, ज्या तरुणांना शांतपणे त्रास सहन करण्यास भाग पाडतात. वरवरच्या सल्ल्यांऐवजी सक्रिय, पूर्वग्रहविरहित पाठिंबा देऊन समाज जागरूकता आणि मदत मिळवणे यांमधील तफावत दूर करू शकतो, ज्यामुळे कोणत्याही तरुणाला आपला तणाव एकट्याने वाहणे हाच एकमेव पर्याय आहे, असे वाटणार नाही.

Bank of India: ग्राहकांसाठी बँकिंग होणार आणखी सोपे! UPI Tap & Pay ते AI पेमेंट्स; Bank of India कडून 12 डिजिटल उपक्रम

Web Title: Aditya birla unpack your emotional baggage empower survey youth emotional distress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • Aditya Birla
  • Business News
  • mental stress

संबंधित बातम्या

DILRMP 3.0: जमीनाचाही आता ‘Aadhaar Number’, सरकारच्या ‘या’ निर्णयावर प्लॉट खरेदीदार होणार खुश
1

DILRMP 3.0: जमीनाचाही आता ‘Aadhaar Number’, सरकारच्या ‘या’ निर्णयावर प्लॉट खरेदीदार होणार खुश

EPFO New PF Withdrawal Rules: PF मधून पैसे काढायचेत? आता नियम झाले सोपे; EPFO च्या नव्या नियमांमध्ये काय बदललं?
2

EPFO New PF Withdrawal Rules: PF मधून पैसे काढायचेत? आता नियम झाले सोपे; EPFO च्या नव्या नियमांमध्ये काय बदललं?

UPI Tap & Pay: QR कोड स्कॅनची कटकट संपली! UPIचं नवं फीचर, आता NO Scan, NO Tension
3

UPI Tap & Pay: QR कोड स्कॅनची कटकट संपली! UPIचं नवं फीचर, आता NO Scan, NO Tension

Trade Plan: BRICS मध्ये भारताचा तगडा ट्रेड प्लॅन, Trump च्या धमक्यांना घातली नाही भीक!
4

Trade Plan: BRICS मध्ये भारताचा तगडा ट्रेड प्लॅन, Trump च्या धमक्यांना घातली नाही भीक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.