ग्राहकांसाठी बँकिंग होणार आणखी सोपे! UPI Tap & Pay ते AI पेमेंट्स; Bank of India कडून 12 डिजिटल उपक्रम
बँकेने डिजिटल पेमेंट्सच्या क्षेत्रात सहा महत्त्वपूर्ण उपक्रम सादर केले आहेत. यातील UPI Help 2.0 द्वारे ग्राहकांना UPI व्यवहारांचा इतिहास पाहणे, तक्रार नोंदवणे आणि तिचा मागोवा घेणे तसेच बँक ऑफ इंडियाच्या खात्यांशी संबंधित UPI मँडेट्सचे व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे. ही सुविधा Omni Neo मोबाइल अॅपमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. याशिवाय Transaction Replay सुविधेमुळे ग्राहक पूर्वी केलेला UPI व्यवहार पुन्हा सुरू करू शकतात. बँकेने UPI Tap & Pay on PoS सुविधाही सुरू केली आहे. NFC-सक्षम स्मार्टफोन समर्थित PoS मशीनवर टॅप करून कॉन्टॅक्टलेस UPI पेमेंट करता येणार आहे.
DILRMP 3.0: जमीनाचाही आता ‘Aadhaar Number’, सरकारच्या ‘या’ निर्णयावर प्लॉट खरेदीदार होणार खुश
बँकेने UPI आणि RuPay कार्डसाठी AI-सक्षम पेमेंट सोल्यूशन्सही सादर केली आहेत. ग्राहकाने आवश्यक पडताळणी आणि अधिकृतता दिल्यानंतर AI एजंट बिल भरणे, सबस्क्रिप्शनचे नूतनीकरण किंवा लहान खरेदी यांसारखी कामे स्वयंचलितपणे करू शकतो. ग्राहकांना या परवानग्या बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार असेल. कॉर्पोरेट ग्राहकांसाठी NPCIच्या सहकार्याने IMPS Bulk Payment सुविधाही सुरू करण्यात आली आहे. याद्वारे मोठ्या संख्येने पेमेंट रिक्वेस्ट एकाचवेळी पाठवता येणार आहेत.
डिजिटल करन्सीच्या क्षेत्रात बँक ऑफ इंडियाने User-level Programmable Central Bank Digital Currency (CBDC) सुविधा सुरू केली आहे. डिजिटल टोकन्सचा वापर कोणत्या कारणासाठी, कोणत्या भौगोलिक क्षेत्रात किंवा किती कालावधीपर्यंत करता येईल, अशा विशिष्ट अटी त्यामध्ये निश्चित करता येतात. या तंत्रज्ञानाचा लक्ष्यित अनुदान, मदत निधी, उद्देश-आधारित लाभ आणि Direct Benefit Transfer योजनांसाठी वापर होऊ शकतो. निधी ज्या कारणासाठी देण्यात आला आहे, त्याच कारणासाठी त्याचा वापर होत असल्याची खात्री करण्यास हे तंत्रज्ञान मदत करू शकते.
GFF 2026 मध्ये बँकेने Terra Mastercard World Credit Card देखील सादर केले. हे कॉन्टॅक्टलेस इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड असून प्रवास, लाइफस्टाइल आणि जागतिक पेमेंट सुविधांवर भर देण्यात आला आहे. ATM, PoS आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर हे कार्ड वापरता येणार आहे. कार्डधारकांना विमानतळ लाउंज प्रवेशासह प्रवास, मनोरंजन, डायनिंग, मोबिलिटी, वेलनेस आणि डिजिटल सबस्क्रिप्शनशी संबंधित विविध लाभ मिळतील. कार्डसाठी इश्यूअन्स शुल्क नाही; मुख्य कार्डाचे वार्षिक सदस्यत्व शुल्क ₹990 आणि अॅड-ऑन कार्डासाठी ₹750 असल्याचे बँकेने म्हटले आहे.
Hitachiच्या सहकार्याने बँक ऑफ इंडियाने Android-based Cash Recycler Machineचा Proof of Concept सादर केला. पारंपरिक ATM सेवांबरोबर UPI आधारित कार्डलेस कॅश विथड्रॉवल, Green PIN निर्मिती आणि रिअल-टाइम डेबिट कार्ड जारी करण्यासारख्या सुविधा या मशीनमध्ये असतील. ग्राहक अर्ज आणि प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करून मशीनमधून वैयक्तिकृत फिजिकल डेबिट कार्ड तत्काळ मिळवू शकतील.
बँकेने E-Kosha 2.0 हे ToneTag-सक्षम Conversational Banking सोल्यूशनही सादर केले. यामुळे ग्राहकांना आवाजाच्या माध्यमातून बँकेशी संवाद साधता येईल. भविष्यात खातेविषयक सेवा, पेमेंट्स, निधी हस्तांतरण, कर्ज, विमा, गुंतवणूक आणि ग्राहक सेवांपर्यंत या प्रणालीचा विस्तार होऊ शकतो. यासोबत ALPHA PLUS, FinTech Connect Portal आणि Markytics यांसारखे प्लॅटफॉर्मही बँकेने सादर केले आहेत. FinTech Connect Portal द्वारे फिनटेक कंपन्यांना कोणतेही शुल्क न देता बँकेसमोर प्रस्ताव सादर करता येणार आहेत. बँक ऑफ इंडियाच्या मते, या सर्व उपक्रमांमागे भविष्यासाठी सज्ज, सुरक्षित आणि सर्वसमावेशक बँकिंग परिसंस्था विकसित करण्याचा उद्देश आहे.






