Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘रस्त्याच्या मध्येच…’ यूट्यूबर मनीष कश्यप यांच्यानंतर E20 पेट्रोलवर ‘या’ व्यावसायिकाने उपस्थित केला प्रश्न

युट्युबर मनीष कश्यपनंतर आता एका प्रसिद्ध व्यावसायिकाने E20 पेट्रोलच्या गुणवत्तेवर आणि त्यामुळे वाहनांच्या इंजिनमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर रस्त्यामध्येच व्हिडिओ बनवून प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 12, 2026 | 07:55 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • यूट्यूबर मनीष कश्यप यांचे आरोप
  • E20 पेट्रोलवर व्यावसायिकाने उपस्थित केला प्रश्न
  • मायलेज निम्मं झाल्याचे आरोप
ई२० पेट्रोल म्हणजे पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिसळून बनवलेले पेट्रोल यावरुन देशभरात सरकार आणि लोकांमध्ये चांगलाच वाद सुरू आहे. त्याच्या वापरामुळे वाहनांचे मायलेज कमी होत आहे आणि इंजिनचे नुकसान होत आहे, याबद्दल लोक संतप्त आहेत. अलीकडेच, बिहारस्थित यूट्यूबर मनीष कश्यपने या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. आता, चेन्नईतील एका व्यावसायिकाने असाच एक मुद्दा उपस्थित केला आहे.

पैसे वाचवण्याचा अनोखा पर्याय, तुमची लाइफस्टाइल बदलण्याची अजिबात गरज नाही; फक्त ‘या’ टिप्स आजमावून बघा

चेन्नईचे व्यावसायिक सचिन जॉर्ज गेल्या काही महिन्यांपासून वाहन मालक आणि मेकॅनिक यांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारी नोंदवत आहेत. ते सोशल मीडियावर एक जनजागृती मोहीमही चालवत आहेत. ‘साउथ फर्स्ट’ला दिलेल्या मुलाखतीत सचिन जॉर्ज यांनी स्पष्ट केले की, ई२० पेट्रोलमुळे त्यांची बाईक रस्त्यातच बंद पडते.

मायलेज निम्मे झाले

सचिन जॉर्ज म्हणाले की, त्यांच्याकडे दोन ॲक्टिव्हा स्कूटर, दोन मोटरसायकल आणि एक मारुती सियाझ कार आहे, ही सर्व वाहने २०२३ पूर्वी खरेदी केली आहेत. १ एप्रिल २०२६ रोजी ई२० पेट्रोल अनिवार्य झाल्यापासून त्यांच्या सर्व वाहनांचे मायलेज मोठ्या प्रमाणात घटले आहे. जी ॲक्टिव्हा पूर्वी ताशी ३५ ते ४० किमी मायलेज देत होती, ती आता जेमतेम ताशी २८ ते ३० किमी मायलेज देते. मोटरसायकलचे मायलेजदेखील ताशी ३५ किमीवरून केवळ २०-२३ किमीपर्यंत घसरले आहे. ते म्हणाले की, त्यांच्या बाईक्स अनेकदा रस्त्यातच बंद पडतात.

कार्बोरेटर आणि फ्यूल पंप खराब होतोय

तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील मेकॅनिक्सच्या मते, इथेनॉल असलेल्या पेट्रोलमुळे कार्बोरेटर, इंधन इंजेक्टर आणि वाहनांचे इंधन पंप लवकर खराब होत आहेत.
याचे कारण इथेनॉल हवेतील आर्द्रता शोषून घेते, ज्यामुळे इंधन प्रणालीमध्ये गंज आणि कचरा जमा होतो.
एकदा वाहन बिघडले की, दुरुस्तीचा खर्च 8,000 ते 10,000 रुपयांपर्यंत असतो, जो गरीब रोजंदारी करणाऱ्यांसाठी मोठा बोजा आहे.

सरकारच्या धोरणावर प्रश्न उपस्थित

सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सचिन म्हणाला, ‘मी इथेनॉलच्या विरोधात नाही, पण ज्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी केली जाते त्यावर माझा आक्षेप आहे.’ त्यांनी सांगितले की भारत कच्चे तेल नक्कीच आयात करतो, परंतु आम्ही रिफाइंड पेट्रोलचे मोठे निर्यातक देखील आहोत. भारत सिंगापूर, भूतान आणि आफ्रिकन देशांना भेसळविरहित पारंपरिक पेट्रोल निर्यात करतो. मग भारतीय ग्राहकांना E0 (भेसळ नसलेले), E5 किंवा E10 पेट्रोलचे पर्याय का दिले जात नाहीत?

EPFO Scheme : फक्त 6 महिन्यांसाठी असेल लागू, EPFO ची नवी एमनेस्टी स्कीम! पाहा कोणाला आणि कसा होणार फायदा?

Web Title: After manish kashyap businessman raises questions on e20 petrol see marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 07:55 PM

Topics:  

  • Business News
  • E20 Fuel
  • E20 Petrol
  • Marathi News

संबंधित बातम्या

World Energy Crisis : जगाची ८१% ऊर्जा अजूनही जीवाश्म इंधनांवर; युद्धामुळे पुरवठ्याची चिंता वाढली
1

World Energy Crisis : जगाची ८१% ऊर्जा अजूनही जीवाश्म इंधनांवर; युद्धामुळे पुरवठ्याची चिंता वाढली

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ
2

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ

Baramati News :सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!
3

Baramati News :सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!

India Business News : अंबानींच्या जिओला मस्क यांचे थेट आव्हान; भारतात स्वस्त स्टारलिंक आणण्याची तयारी!
4

India Business News : अंबानींच्या जिओला मस्क यांचे थेट आव्हान; भारतात स्वस्त स्टारलिंक आणण्याची तयारी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.