Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Train Ticket Alert : रेल्वेच्या ‘या’ नव्या नियमामुळे लोकं नाराज; तुम्हालाही भरावा लागू शकतो दंड, ‘ही’ चूक करणं टाळा

रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने नुकताच एक अत्यंत महत्त्वाचा आणि कडक नियम लागू केला आहे. या नियमाची माहिती नसल्यास प्रवाशांना मोठा आर्थिक दंड भरावा लागू शकतो, ज्यामुळे सध्या प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 12, 2026 | 07:19 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रेल्वेच्या ‘या’ नव्या नियमामुळे लोकं नाराज
  • तुम्हालाही भरावा लागू शकतो दंड
  • ‘ही’ चूक करणं टाळा
Train Ticket Alert: भारतीय रेल्वेच्या नव्या नियमामुळे लोकं बरेच नाराज आहेत. या नियमामुळे तुम्हालाही बराच दंड भरावा लागू शकतो. जर तुम्ही ट्रेनच्या जनरल डब्यातून प्रवास करण्यासाठी व्हॉट्सॲपवरून मिळवलेले तिकीट किंवा त्याचा स्क्रीनशॉट वापरत असाल, तर काळजी घ्या. रेल्वेने स्पष्ट केले आहे की, तपासणीच्या वेळी फक्त ‘रेल वन’ ॲपवर दाखवलेले मूळ डिजिटल तिकीटच वैध मानले जाईल. कोणताही स्क्रीनशॉट, फोटो, पीडीएफ प्रत किंवा व्हॉट्सॲपवरून पाठवलेले तिकीट वैध मानले जाणार नाही आणि त्यासाठी दंड आकारला जाऊ शकतो. नेमका नियम काय?

EPFO Scheme : फक्त 6 महिन्यांसाठी असेल लागू, EPFO ची नवी एमनेस्टी स्कीम! पाहा कोणाला आणि कसा होणार फायदा?

नवीन नियम काय सांगतो?

रेल्वेच्या नवीन नियमांनुसार, डिजिटल अनारक्षित तिकीट फक्त बुकिंगसाठी वापरलेल्या मोबाईल फोनवरच उपलब्ध असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, प्रवाशांनी ट्रेन स्टेशनवरून सुटण्यापूर्वी हे डिजिटल तिकीट खरेदी करणे आवश्यक आहे. ट्रेन सुटल्यानंतर केलेले कोणतेही बुकिंग अवैध ठरेल. मूळ डिजिटल तिकिटाऐवजी व्हॉट्सॲपचा स्क्रीनशॉट दाखवल्याबद्दल एका प्रवाशाला नुकताच दंड आकारण्यात आल्यानंतर हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

व्हाट्सएप पर आया टिकट दिखाना पर्याप्त नहीं, रेलवे के नियम जानना है ज़रूरी! RailOne App से बुक किया गया अनारक्षित टिकट केवल उसी पंजीकृत मोबाइल पर वैध माना जाता है, जिससे टिकट जारी हुआ हो। यात्रा के दौरान उक्त मोबाइल के साथ एक फोटोयुक्त पहचान पत्र रखना भी अनिवार्य है। व्हाट्सएप,… pic.twitter.com/5n45Jgdq4c — South East Central Railway (@secrail) July 8, 2026

सोशल मीडियावर दिली माहिती

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने आपल्या अधिकृत खात्यावर एक व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, “रेल वन ॲपद्वारे बुक केलेली अनारक्षित तिकिटे केवळ त्याच नोंदणीकृत मोबाईल नंबरवर वैध आहेत, ज्यावरून तिकीट जारी केले गेले होते. प्रवासादरम्यान मोबाईल नंबरसोबत फोटो ओळखपत्र बाळगणे अनिवार्य आहे. व्हॉट्सॲप, स्क्रीनशॉट किंवा इतर माध्यमांद्वारे मिळालेली तिकिटे वैध प्रवास परवानगी मानली जाणार नाहीत.”

नवीन नियमांवर लोकांचा संताप

या नवीन रेल्वे आदेशामुळे सोशल मीडियावर प्रवाशांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, या नियमामुळे वृद्ध व्यक्तींना आणि ज्यांना स्वतः ॲप वापरता येत नाही व आपल्या कुटुंबीयांकडून तिकीट बुक करता येत नाही, त्यांना सर्वाधिक त्रास होईल. एका यूजरने लिहिले आहे की, ‘नियम असे बनवा की प्रत्येकजण त्यांचा वापर करू शकेल. वृद्धांना Rail One किंवा UTS ॲप कसे वापरायचे हे माहित नाही. तुम्ही त्यांचाही विचार करता का? ही व्यवस्था नाही तर समस्या आहे. एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, टीटीईने आयडी प्रूफ तपासले तर तिकीट वैध मानले जाईल का?

भन्नाट बिझनेस प्लॅन पण इथं अडलंय? Food Processing बिझनेस आणि Restaurants सुरु करण्यासाठी असं करा रजिस्ट्रेशन

Web Title: Whatsapp unreserved ticket screenshot not valid rail one app new rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 07:19 PM

Topics:  

  • Business News
  • Indian Railway
  • Local Trains
  • Marathi News
  • new rules
  • Online Ticket
  • Railway Ticket
  • Railway Tickets

संबंधित बातम्या

Suraj Chavan New Born Baby: सूरज चव्हाणचं जंगी स्वागत, लेकीनेही दिली खास झलक; व्हिडीओने वेधलं लक्ष
1

Suraj Chavan New Born Baby: सूरज चव्हाणचं जंगी स्वागत, लेकीनेही दिली खास झलक; व्हिडीओने वेधलं लक्ष

Sona Selection India Limited चा IPO 17 सप्टेंबरला होणार खुला; ₹94 ते ₹99 किंमत रुपये किंमत पट्टा जाहीर
2

Sona Selection India Limited चा IPO 17 सप्टेंबरला होणार खुला; ₹94 ते ₹99 किंमत रुपये किंमत पट्टा जाहीर

Jodi Marathi Movie: शेतकरी आणि बैलजोडीच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट पडद्यावर, पोळ्याच्या मुहूर्तावर ‘जोडी’ची घोषणा
3

Jodi Marathi Movie: शेतकरी आणि बैलजोडीच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट पडद्यावर, पोळ्याच्या मुहूर्तावर ‘जोडी’ची घोषणा

Success Story : शाळेत नापास, 30 इंटर्व्ह्यूमध्ये रिजेक्शन… तरीही बनला अब्जाधीश! Jack Ma कसे बनले अलिबाबाचे बॉस?
4

Success Story : शाळेत नापास, 30 इंटर्व्ह्यूमध्ये रिजेक्शन… तरीही बनला अब्जाधीश! Jack Ma कसे बनले अलिबाबाचे बॉस?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.