Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पैसे वाचवण्याचा अनोखा पर्याय, तुमची लाइफस्टाइल बदलण्याची अजिबात गरज नाही; फक्त ‘या’ टिप्स आजमावून बघा

लाइफस्टाईलमध्ये कोणताही मोठा बदल न करता किंवा स्वतःच्या आवडीनिवडींना मुरड न घालता स्मार्ट पद्धतीने पैसे कसे वाचवावे, या अत्यंत उपयुक्त अशा पर्सनल फायनान्स टिप्स जाणून घेऊयात.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 12, 2026 | 06:58 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पैसे वाचवण्याचा अनोखा पर्याय
  • तुमची लाइफस्टाइल बदलण्याची अजिबात गरज नाही
  • फक्त ‘या’ टिप्स आजमावून बघा
Money Saving Tips : मोठ्या शहरांमध्ये राहणारे लोक अनेकदा तक्रार करतात की महिन्याच्या अखेरीस त्यांच्याकडे कोणतीही बचत शिल्लक राहत नाही. त्यांच्या पगारातील अर्ध्याहून अधिक रक्कम घराचे भाडे, वाहतूक आणि किराणा मालावर खर्च होते. त्यामुळे खर्चाला पैसेच शिल्लक नसायचे.

दररोज काढलं जाणार 5 लाख बॅरल तेल… अनिल अग्रवाल यांच्या Vedanta चा ‘मास्टरस्ट्रोक’! ऊर्जा क्षेत्रात भारत घेणार मोठी झेप…

खर्चाचे व्यवस्थापन करणे हे एक आव्हान बनले आहे, विशेषतः मुंबई आणि बंगळूरूसारख्या शहरांमध्ये राहणाऱ्या अनेक नोकरदार लोकांसाठी. या सगळ्यात, तुम्हाला असं सांगितलं तर तुमच्या आयुष्यात अशा गोष्टी करा ज्यामुळे तुमचे पैसे वाचतील. यासाठी तुम्हाला तुमच्या कोणत्याही सवयी बदलण्याची गरज भासणार नाही. बंगळूरूच्या एका रहिवाशाने काही सोप्या सवयी सांगितल्या आहेत, ज्या त्याला आपल्या दैनंदिन दिनचर्येत मोठी तडजोड न करता पैसे वाचविण्यात मदत करत आहेत.

अक्षय सीएन नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या @bangalore_viral या इंस्टाग्राम पेजवर काही टिप्स शेअर केल्या आहेत. व्हिडिओमध्ये, त्याने सांगितले आहे की, आपल्या जीवनशैलीत आणि खर्चाच्या सवयींमध्ये छोटे बदल करून, त्याने आपली जीवनशैली कायम ठेवत अनावश्यक खर्च कसा कमी केला. पोस्टच्या कॅप्शनमध्ये अक्षयने लिहिले आहे, “मी माझ्या जीवनशैलीशी तडजोड न करता बंगळूरुमध्ये माझा खर्च कसा कमी केला.”

मेट्रो जवळ राहणे सर्वात किफायतशीर

सर्वात आधी, अक्षयने आपल्या राहण्यासाठी महागडा किंवा आलिशान परिसर निवडला नाही, तर त्याऐवजी मेट्रो स्टेशनजवळ राहण्याला प्राधान्य दिले. अक्षयने लिहिले, “मी ‘आलिशान’ परिसरात जाण्याऐवजी मेट्रो जवळ राहण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला भाडे थोडे जास्त वाटले, पण माझे रोजच्या प्रवासावर, पेट्रोल आणि ऑटोच्या भाड्यावर खूप पैसे वाचले आणि त्यामुळे मानसिक ताणही कमी झाला.” त्याने स्पष्ट केले की प्रवासाचा कमी झालेला वेळ आणि वाहतुकीच्या खर्चामुळे त्याच्या मासिक खर्चात लक्षणीय फरक पडला.

सोयीस्कर खर्च कमी करणे

अक्षयने स्पष्ट केले की बंगळूरमध्ये राहत असताना, त्याने हळूहळू आपला सोयीस्कर खर्च कमी करण्यास सुरुवात केली. क्विक डिलिव्हरी, ऑटो सबस्क्रिप्शन आणि ऑनलाइन लहान खरेदीमुळे त्याचा मासिक खर्च हळूहळू वाढला. अक्षयने शेवटच्या क्षणी खरेदी करण्याऐवजी आपल्या संपूर्ण वीकेंडचे आगाऊ नियोजन करण्यास सुरुवात केली.
अक्षय म्हणतो की विचार न करता कॅफे किंवा पबमध्ये जाणे, मनात काहीतरी आले म्हणून खर्च करणे, या सर्व गोष्टी नकळतपणे तुमच्या बचतीवर परिणाम करतात. अक्षय पुढे म्हणाला, “फक्त ह्या एका गोष्टीसाठी खर्च करण्याऐवजी, मी माझ्या वीकेंडचे नियोजन करायला सुरुवात केली. केवळ ह्या अनियोजित सहलीसाठी कॅफे, पबला भेट देणे आणि खर्च करणे, बंगळूरमधील लोकांना वाटते त्यापेक्षाही लवकर बचत संपवू शकते.”

जीवनशैली टिकवून ठेवण्याचा दबाव

व्हिडिओमध्ये, अक्षयने बंगळूरुच्या कार्यसंस्कृतीमधील लोकांवर आपली जीवनशैली सतत सुधारण्यासाठी असलेल्या दबावाबद्दलही सांगितले. येथील अनेक लोक केवळ अद्ययावत दिसण्यासाठी किंवा आपल्या सभोवतालच्या ट्रेंड्ससोबत राहण्यासाठी पैसे खर्च करतात.
अक्षयने स्पष्ट केले की, इतरांप्रमाणे त्याने आपले गॅजेट्स अपग्रेड करणे थांबवले आहे. दररोज रेस्टॉरंट्स आणि ऑनलाइन फूड डिलिव्हरीवर अवलंबून राहण्याऐवजी घरी स्वयंपाक केल्याचा त्याच्या बचतीवर आणि आरोग्यावरही महत्त्वपूर्ण परिणाम झाला आहे. आपल्या पोस्टच्या शेवटी, अक्षयने लिहिले की केवळ जास्त पगाराने तुमच्या आर्थिक समस्या सुटत नाहीत. चांगल्या सवयी अधिक महत्त्वाच्या आहेत.

Sukanya Samriddhi Yojna: मुलीच्या लग्नाची चिंता मिटली! दरमहा ‘इतके’ रुपये जमा करा, योजनेतून मिळेल 70 लाखांचा फंड

Web Title: How to save money without changing lifestyle news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 06:58 PM

Topics:  

  • Business News
  • lifestlye
  • Marathi News
  • MONEY

संबंधित बातम्या

World Energy Crisis : जगाची ८१% ऊर्जा अजूनही जीवाश्म इंधनांवर; युद्धामुळे पुरवठ्याची चिंता वाढली
1

World Energy Crisis : जगाची ८१% ऊर्जा अजूनही जीवाश्म इंधनांवर; युद्धामुळे पुरवठ्याची चिंता वाढली

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ
2

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ

Baramati News :सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!
3

Baramati News :सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!

India Business News : अंबानींच्या जिओला मस्क यांचे थेट आव्हान; भारतात स्वस्त स्टारलिंक आणण्याची तयारी!
4

India Business News : अंबानींच्या जिओला मस्क यांचे थेट आव्हान; भारतात स्वस्त स्टारलिंक आणण्याची तयारी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.