Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon Great Indian Festival 2026 चा धमाका! दर मिनिटाला विकले गेले शेकडो आयफोन अन् कुर्ते; पाहा खरेदीचे भन्नाट ट्रेंड्स

Amazon Great Indian Festival Record :अमेझॉनच्या 'अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२६' ची ऐतिहासिक आणि विक्रमी सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पहिल्याच दिवशी खरेदीच्या प्रमाणात तब्बल १०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून देशातील प्रत्येक पिनकोडवरून ऑर्डर्स नोंदवल्या गेल्या आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 09, 2026 | 07:42 PM
अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2026 ची ऐतिहासिक सुरुवात ( सौजन्य - सोशल मीडिया )

अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2026 ची ऐतिहासिक सुरुवात ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2026 ची ऐतिहासिक सुरुवात
  • खरेदीच्या प्रमाणात वर्षभरात 100 टक्के वाढ
  • देशातील प्रत्येक पिनकोडवरून ग्राहकांच्या ऑर्डर
Amazon Great Indian Festival Record : अमेझॉनने आज जाहीर केले की, अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2026 ची ऐतिहासिक सुरुवात झाली असून, या शॉपिंग फेस्टिव्हलच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी सुरुवात ठरली आहे. भारतातील ग्राहक Amazon.in वर अभूतपूर्व प्रमाणात खरेदी करत असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ग्राहकांनी 100टक्क्यांहून अधिक उत्पादने ऑर्डर केली आहेत. देशातील प्रत्येक पिनकोडवरून ग्राहकांनी स्मार्टफोन, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, सौंदर्यप्रसाधने, गृहपयोगी वस्तू, किचन उत्पादने, दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि इतर अनेक श्रेणींमधील उत्पादनांची ऑर्डर दिली आहे. त्यामुळे हा शॉपिंग फेस्टिव्हलच्या इतिहासातील सर्वाधिक खरेदी झालेला पहिला दिवस ठरला आहे. ( Amazon Great Indian Festival Record ) 

एका क्लिकवर गमावू शकता कष्टाची कमाई! Digital Assets मध्ये गुंतवणूक करताना भामट्यांपासून सावध राहण्यासाठी या टिप्स फॉलो करा

विक्रेते आणि ब्रँड्सकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या लाखो उत्पादनांवर वर्षातील सर्वात कमी किमतींचा लाभ ग्राहकांना मिळत आहे. प्रत्येक दोनपैकी एका ग्राहकाने ईएमआयच्या माध्यमातून खरेदी केली, तर खरेदी केलेल्या प्रत्येक तीनपैकी एका उत्पादनावर ग्राहकांना कॅशबॅक मिळाला. प्राइम सदस्यांनी गेल्या वर्षाच्या तुलनेत 100टक्क्यांहून अधिक बचत केली आहे. मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या विविध उत्पादनांवरील केवळ प्राइम सदस्यांसाठीच्या विशेष ऑफर्सचा त्यांना लाभ मिळत आहे.

अवघ्या काही मिनिटांत ग्राहकांना वितरित

भारतभरातील ग्राहकांनी दिवसाची सुरुवात करताच लाखो ऑफर्समधील उत्पादनांची ऑर्डर दिली आणि त्यापैकी लाखो ऑर्डर्स अवघ्या काही तासांत ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. अमेझॉन नाऊ सेवा उपलब्ध असलेल्या 120 हून अधिक शहरांमध्ये प्रत्येक दोनपैकी एक उत्पादन अवघ्या काही मिनिटांत ग्राहकांना वितरित करण्यात आले.

उत्पादनांच्या संख्येत तब्बल 100 टक्के वाढ

अमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष सौरभ श्रीवास्तव म्हणाले, “अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2026 मधील सुरुवातीच्या ट्रेंडने आमच्या सर्वात आशावादी अपेक्षांनाही मागे टाकले आहे. मध्यरात्रीपासून सर्व ग्राहकांसाठी फेस्टिव्हल सुरू केल्यानंतर ग्राहकांचा सहभाग, ऑर्डर्सचे प्रमाण आणि डिलिव्हरीचा वेग या सर्व बाबतींत नवे विक्रम प्रस्थापित झाले आहेत.ऑर्डर केलेल्या उत्पादनांच्या संख्येत तब्बल 100 टक्के वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. प्राइम सदस्यांसाठी अतिरिक्त बचत, तात्काळ बँक डिस्काउंट, एक्सचेंज, नो-कॉस्ट ईएमआय, अमेझॉन पे लॅटर आणि त्यांच्या आकांक्षा आता अधिक परवडणाऱ्या होत आहेत, याचा आम्हाला आनंद आहे”.

“महानगरांपासून देशातील छोट्या शहरांपर्यंत भारतातील ग्राहक सर्वोत्तम ऑफर्स, उत्पादनांची सर्वाधिक विविधता आणि जलद डिलिव्हरीसाठी Amazon.in वर खरेदीला पसंती देत आहेत. सणासुदीचा हंगाम नुकताच सुरू झाला आहे आणि देशभरातील प्रत्येक ग्राहकाला सर्वोत्तम खरेदीचा अनुभव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

विविध श्रेणींमध्ये विक्रमी मागणी:

स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स: यंदाच्या सणासुदीच्या हंगामात ग्राहकांनी स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या अपग्रेडला मोठी पसंती दिली. प्रीमियम अँड्रॉइड स्मार्टफोनच्या विक्रीत गेल्या वर्षाच्या तुलनेत 70 टक्क्यांची वाढ झाली आहे. ॲपल आयफोन 16, सॅमसंग गॅलेक्सी एस 25 अल्ट्रा, वनप्लस नॉर्ड 6, शाओमी 17 आणि आयक्यूओओ 15आर हे ग्राहकांच्या पसंतीचे प्रमुख स्मार्टफोन ठरले.

ग्राहकांनी अधिक प्रगत कॅमेरे, वेगवान प्रोसेसर आणि मोठ्या डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोनला पसंती दिली. लॅपटॉपच्या श्रेणीत मॅकबुक निओची विक्री नियमित दिवसाच्या तुलनेत तब्बल 65 पट अधिक झाली. प्रीमियम वेअरेबल्सची विक्रीही नियमित दिवसाच्या तुलनेत 80 पट वाढली असून, गार्मिन, ॲपल, सॅमसंग आणि अमेझफिट या ब्रँड्सच्या उत्पादनांना ग्राहकांनी मोठी पसंती दिली.

होम एंटरटेनमेंट आणि गृहउपयोगी उपकरणे: ग्राहकांनी मोठ्या स्क्रीन आणि उत्तम साउंड सिस्टिमला मोठी पसंती दिली असून, होम एंटरटेनमेंट उत्पादनांच्या विक्रीत नियमित दिवसाच्या तुलनेत तब्बल 77 पट वाढ झाली. विक्री झालेल्या एकूण टीव्हींपैकी 55 इंच आणि त्याहून मोठ्या स्क्रीनच्या टीव्हींचा वाटा 65 टक्के राहिला. सोनी, जेबीएल आणि सॅमसंगच्या प्रीमियम होम थिएटर सिस्टिमच्या विक्रीत आणखी मोठी वाढ झाली. पहिल्या 12 तासांत या उत्पादनांची विक्री नियमित दिवसाच्या तुलनेत 100 पट अधिक झाली. ग्राहकांनी घरातील उपकरणेही अपग्रेड केली असून, मोठ्या गृहउपयोगी उपकरणांच्या विक्रीत नियमित दिवसाच्या तुलनेत 50 पट वाढ झाली.

9 किलो आणि त्याहून अधिक क्षमतेच्या प्रीमियम फ्रंट-लोड वॉशिंग मशीनची विक्री 80 पट झाली, तर ड्रायर आणि डिशवॉशरच्या विक्रीने 60 पट वाढ नोंदवली. फ्रॉस्ट-फ्री आणि साइड-बाय-साइड मॉडेल्सना मिळालेल्या मोठ्या मागणीमुळे रेफ्रिजरेटरच्या विक्रीत नियमित दिवसाच्या तुलनेत 60 पट वाढ झाली. या श्रेणीत सॅमसंग, एलजी, हायर आणि बॉश आघाडीवर होते. तर एअर कंडिशनरच्या विक्रीत पॅनासोनिक, हिटाची आणि डायकिन या ब्रँड्सना ग्राहकांची पसंती मिळाली.

फॅशन: फॅशन उत्पादनांच्या विक्रीत नियमित दिवसाच्या तुलनेत 7 पट वाढ झाली. दर सेकंदाला सात जोड्या शूजची विक्री झाली, म्हणजेच नेहमीच्या दिवसाच्या तुलनेत विक्रीचा वेग 7 पट अधिक होता. नाइकीच्या विक्रीत नियमित दिवसाच्या तुलनेत 16 पट वाढ झाली. स्केचर्स आणि न्यू बॅलन्सची विक्री 15 पट, वुडलँडची 12 पट, हश पपीजची 11 पट, तर ॲडिडासची विक्री 10 पट झाली. डेनिम उत्पादनांनाही ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पुरुषांच्या बॉटमवेअरच्या विक्रीत नियमित दिवसाच्या तुलनेत 7 पट वाढ झाली. लेव्हायजच्या विक्रीत 30 पट, तर डब्लूआरओजीएनच्या विक्रीत 13 पट वाढ झाली.

दर तासाला 1500 हून अधिक जीन्सच्या जोड्यांची विक्री झाली. एथनिक वेअरला देखील सणासुदीच्या खरेदीत मोठी पसंती मिळाली. महिलांच्या एथनिक वेअरच्या विक्रीत नियमित दिवसाच्या तुलनेत 4 पट वाढ झाली. बिबाची विक्री 14 पट, लिबासची 11 पट झाली. दर मिनिटाला 100 हून अधिक कुर्त्यांची विक्री झाली. पुरुषांच्या शर्ट आणि टी-शर्टच्या विक्रीत नियमित दिवसाच्या तुलनेत 5 पट वाढ झाली. ॲलन सोलीच्या विक्रीत 12 पट, तर लुई फिलिप आणि पीटर इंग्लंडच्या विक्रीत 10 पट वाढ नोंदवण्यात आली.

ब्युटी: Amazon.in वर पहिल्या 12 तासांत खरेदी करण्यात आलेल्या प्रत्येक चार उत्पादनांपैकी एक उत्पादन ब्युटी श्रेणीतील होते. प्रीमियम स्किनकेअर आणि हेअरकेअर उत्पादनांची दर मिनिटाला 150 हून अधिक युनिट्सची विक्री झाली. नियमित दिवसाच्या तुलनेत ही विक्री 5 पट अधिक होती. क्लिनिक, ला रोश-पोझे, सेरावी, केरास्टास आणि फॉरेस्ट एसेन्शियल्स या ब्रँड्सच्या उत्पादनांना ग्राहकांची मोठी पसंती मिळाली. के-ब्युटी उत्पादनांच्या विक्रीत नियमित दिवसाच्या तुलनेत 4 पट वाढ झाली. दर तासाला 1000 हून अधिक उत्पादने विकली गेली.

या श्रेणीत सेलिमॅक्स, मेडिक्युब आणि बायोडान्स या ब्रँड्सची उत्पादने आघाडीवर होती.लक्झरी फ्रॅग्रन्सेसची दर मिनिटाला 12 उत्पादनांची विक्री झाली, म्हणजेच नियमित दिवसाच्या तुलनेत विक्री 4 पट अधिक होती. चोपार्ड, कॅरोलिना हेरेरा आणि राल्फ लॉरेन या ब्रँड्सच्या परफ्यूमना मोठी मागणी होती.दैनंदिन सेल्फ-केअर उत्पादनांनाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. साबण आणि शॉवर जेलच्या विक्रीत नेहमीच्या दिवसाच्या तुलनेत 19 पट वाढ झाली असून, दर मिनिटाला 800 हून अधिक उत्पादनांची विक्री झाली.

आरोग्याला केंद्रस्थानी ठेवत खरेदी: प्रीमियम वेअरेबल्सच्या विक्रीत नियमित दिवसाच्या तुलनेत 80 पट वाढ झाली असून, गार्मिन, ॲपल, सॅमसंग आणि अमेझफिट या ब्रँड्सच्या उत्पादनांना ग्राहकांची मोठी पसंती मिळाली. हीच मागणी किचन आणि होम कॅटेगरीमध्येही दिसून आली. एअर फ्रायर आणि एअर प्युरिफायरच्या विक्रीत नियमित दिवसाच्या तुलनेत 30 पट वाढ झाली, तर ज्यूसरची विक्री 23 पट आणि एस्प्रेसो मशीनची विक्री 16 पट वाढली. सोलारा या ब्रँडच्या विक्रीत नियमित दिवसाच्या तुलनेत 35 पट, डी’लॉन्गीच्या विक्रीत 20 पट आणि फिलिप्सच्या विक्रीत 9 पट वाढ नोंदवण्यात आली.

Kitchen Budget Inflation : महागाईच्या झळा आणखीनच तीव्र… कांदा, तेल LPG सगळंच कडाडलं! घरचा स्वयंपाक 10 टक्क्यांनी महागला

Web Title: Amazon great indian festival 2026 historic start 100 percent growth marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 07:42 PM

Topics:  

  • amazon
  • Amazon Great Indian Festival

संबंधित बातम्या

Amazon Sale: नवा फोन खरेदीचं स्वप्न आता होणार पूर्ण! ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये मिळणार जबरदस्त डील्स अन् भरघोस सूट…
1

Amazon Sale: नवा फोन खरेदीचं स्वप्न आता होणार पूर्ण! ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये मिळणार जबरदस्त डील्स अन् भरघोस सूट…

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी
2

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी

एक हात नाही, तरीही NIT च्या ‘या’ विद्यार्थ्याने जिद्दीच्या बळावर मिळवले यश; आज Amazon मध्ये कमवतोय बक्कळ पैसा!
3

एक हात नाही, तरीही NIT च्या ‘या’ विद्यार्थ्याने जिद्दीच्या बळावर मिळवले यश; आज Amazon मध्ये कमवतोय बक्कळ पैसा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.