Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon चा भारतात तब्बल $ 48,000,000,000 गुंतवणुकीचा मेगा प्लॅन, 38 लाख नोकऱ्या; 1.5 कोटी व्यवसाय अन्…

ॲमेझॉनने २०२६ ते २०३० दरम्यान भारतात ४८ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर सीईओ अँडी जॅसी यांनी ही घोषणा केली. कोणाला कसा मिळणार फायदा?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 25, 2026 | 09:02 PM
ॲमेझॉनची भारतात मोठ्या गुंतवणुकीची योजना (फोटो सौजन्य - X.com)

ॲमेझॉनची भारतात मोठ्या गुंतवणुकीची योजना (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • भारतातील रोजगार, शाळा आणि नोकऱ्यांना मिळणार लाभ
  • ॲमेझॉनची भारतात मेगा गुंतवणूक 
  • ॲमेझॉनचा नक्की काय आहे मेगा प्लान 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर, ॲमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांनी भारतात तब्बल ४८ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली. IT आणि ई-कॉमर्स क्षेत्रातील ही मोठी कंपनी २०२६ ते २०३० दरम्यान ही गुंतवणूक करणार आहे. कंपनीच्या या महत्त्वाकांक्षी योजनेत निर्यातीला चालना देणे, रोजगाराला पाठिंबा देणे आणि लहान व्यवसाय व शालेय विद्यार्थ्यांना एआयचे फायदे उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे. भारतीय पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर, अँडी जॅसी यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या घोषणा केल्या आहेत. यामुळे भारतातील नोकरदार माणसांना नक्कीच फायदा होणार आहे. तसंच यामुळे अनेक उद्योगांनाही चालना मिळणार आहे. 
Really enjoyed my meeting with Prime Minister @narendramodi about what’s ahead for Amazon in India. We’ve been serving customers, sellers, developers, startups, and enterprises in India for more than a decade and just getting started. Shared that we’re investing $48 billion… pic.twitter.com/CSiwPTiEBh — Andy Jassy (@ajassy) June 25, 2026

Amazon India : अ‍ॅमेझॉन इंडियाचा मोठा निर्णय; लघुउद्योजकांसाठी सुरु केली ‘ही’ नवी सुविधा

भारतातील गुंतवणुकीसाठी ॲमेझॉनच्या काय योजना आहेत?

  • ॲमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये सांगितले की, त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत भारतातील ॲमेझॉनच्या भविष्याबद्दल चर्चा केली.
  • ॲमेझॉन पुढील पाच वर्षांत भारतात एकूण ४८ अब्ज डॉलर्स खर्च करणार असून, त्यापैकी अंदाजे २१ अब्ज डॉलर्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केले जातील.
  • जॅसी यांनी सांगितले की, ॲमेझॉनने २०१० पासून भारतात ४० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
  • यापूर्वी, कंपनीने २०२६ ते २०३० दरम्यान भारतात ३५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखली होती.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर ही रक्कम वाढवून ४८ अब्ज डॉलर्स करण्यात आली आहे.
  • ॲमेझॉनच्या या गुंतवणूक योजनेचा उद्देश २०३० पर्यंत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अंदाजे ३८ लाख नोकऱ्यांना आधार देणे हा देखील आहे.
  • भारतातील ॲमेझॉनच्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांसाठी एक सन्मान कार्यक्रम देखील सुरू केला जाईल
  • टियर-३ आणि टियर-४ शहरांमधील ग्राहकांना जलद डिलिव्हरी देण्यासाठी, १०० हून अधिक नवीन लास्ट-माईल डिलिव्हरी स्टेशन्स स्थापन करण्याची योजना देखील सुरू आहे
  • कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या विस्तारावर लक्ष केंद्रित करेल
Amazon Now चा विस्तार होणार दुप्पट! अवघ्या काही मिनिटांत डिलिव्हरी देण्यासाठी सज्ज; तब्ब्ल 2800 कोटींची गुंतवणूक

ॲमेझॉनकडून AI ला देखील प्रोत्साहन 

ॲमेझॉन भारतात AI वापराला प्रोत्साहन देण्यासाठी देखील काम करेल. यामध्ये ४० लाख सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना एआय शिक्षण देण्याचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, अंदाजे १.५ कोटी लहान दुकानदारांनाही आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित माहिती दिली जाईल. अमेझॉनची भारतातील गुंतवणुकीची ही महायोजना केवळ भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेलाच चालना देणार नाही, तर भारतातील कोट्यवधी लोकांना रोजगारही उपलब्ध करून देईल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) लोकांमध्ये जागरूकतादेखील वाढवेल.

Web Title: Amazon mega plan to invest 48 billion dollars in india with ai benefits for 15 million small businesses 4 million schools and 3 8 million jobs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 09:01 PM

Topics:  

  • amazon
  • Business News
  • PM Modi

संबंधित बातम्या

Amazon: नो स्पॅम कॉल्स, नो एजंट! अमेझॉन पेवर आता स्वतःच निवडा अन् खरेदी करा हेल्थ इन्शुरन्स
1

Amazon: नो स्पॅम कॉल्स, नो एजंट! अमेझॉन पेवर आता स्वतःच निवडा अन् खरेदी करा हेल्थ इन्शुरन्स

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा
2

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ
3

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा
4

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.