Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री

Ambani: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील Reliance Consumer Products (RCPL) ने आईस्क्रीम बाजारात प्रवेश करत ‘Bombay Creamery’ हा नवा ब्रँड लॉन्च केल्याची माहिती आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 03, 2026 | 06:42 PM
Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Reliance Consumer Productsने ‘Bombay Creamery’ ब्रँड लॉन्च केला
  • कप, कोन आणि स्टिक आईस्क्रीमची सुरुवातीची किंमत ₹10
  • महाराष्ट्र आणि गुजरातनंतर देशभर विस्तार करण्याची योजना
रिलायन्स म्हटलं की धमाका आलाच. जिओने जसं टेलिकॉम मार्केट हलवून टाकलं होतं, तसंच आता आईस्क्रीमच्या मार्केटमध्ये पण होणार आहे. मुकेश अंबानी आता थेट तुमच्या घरातल्या फ्रीजपर्यंत पोहोचणार आहेत.रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स म्हणजे RCPL ने आपला नवीन ब्रँड लॉन्च केला आहे. ‘बॉम्बे क्रीमरी’. आणि याची सुरुवातीला10 रुपयात कप, कोन आणि स्टिक आईस्क्रीम मिळणार आहे.

सगळ्यात आधी पश्चिम भारतात लॉन्च

सध्या हा ब्रँड पश्चिम भारतात म्हणजे महाराष्ट्र, गुजरातमध्ये लॉन्च केला असूननंतर हळूहळू पूर्ण देशभरात हा मिळणार आहे. रिलायन्सचा प्लॅन एकदम क्लिअर आहे, आधी कमी किमतीत लोकांना टेस्ट करायला लावा आणि मग पूर्ण मार्केट काबीज करा. Ambani:

10 रुपयाच्या आईस्क्रीमने शेअर मार्केट हललं

तुम्हाला वाटेल 10 रुपयाच्या आईस्क्रीमचा आणि शेअर मार्केटचा काय संबंध? पण आहे. या आईस्क्रीमची बातमी येताच Kwality Walls चा शेअर पडायला लागले आहे.बुधवारी BSE वर त्याचा शेअर 3% ने पडून 43 रुपयांवर आला. हा सलग सातवा दिवस होता जेव्हा तो शेअर पडत होता. सात दिवसात जवळपास 11% शेअर खाली आला आहे. यावरूनच कळतं की मोठ्या कंपन्यांना पण अंबानीच्या या एंट्रीची भीती वाटायला लागली आहे.

अमूल, क्वालिटी वॉल्स पेक्षा निम्मी किंमत

Zepto, Blinkit किंवा Swiggy वर अमूलची मँगो स्टिक किंवा कुल्फी बघितली तर ती 20 रुपये किंवा त्यापेक्षा जास्तला मिळते. क्वालिटी वॉल्सची पण तीच गोष्ट. आणि रिलायन्स देत आहे फक्त 10 रुपयात. म्हणजे थेट निम्म्या किमतीत. त्यामुळे गरीबातल्या गरीब माणसाला पण चांगली आईस्क्रीम खाता येणार आहे. यामुळेच जुन्या कंपन्यांचं टेन्शन वाढलं आहे.

स्वस्त आहे म्हणजे हलकी आहे का? तर अजिबात नाही

अनेकांना वाटेल 10 रुपयात काय मिळणार, पाणीवाली आईस्क्रीम असेल. पण कंपनीने सांगितलं आहे की क्वालिटीशी अजिबात तडजोड केली नाही आहे. बॉम्बे क्रीमरीमध्ये खऱ्या दुधाची क्रीम वापरली आहे. पाणीवाला माल नाहीये. RCPL चे डायरेक्टर टी. कृष्णकुमार यांनी सांगितलं की आम्हाला भारतीय कुटुंबांच्या बजेटमध्ये चांगल्या क्वालिटीची आईस्क्रीम द्यायची आहे.

फ्लेवर पण एकदम भारी आहेत. साधे व्हॅनिला, चॉकलेट तर आहेतच पण त्याचबरोबर Salted Caramel, Matcha आणि Tiramisu सारखे प्रीमियम फ्लेवर पण आहेत, जे आजकाल मोठ्या शहरातल्या लोकांना खूप आवडतात.

कॅम्पा कोलानंतर आता आईस्क्रीममध्ये तोच गेम

रिलायन्सने हे आधी पण करून दाखवलं आहे. आठवतंय कॅम्पा कोला? जेव्हा रिलायन्सने कॅम्पा परत आणली तेव्हा 200 ml ची बाटली फक्त 10 रुपयात दिली होती. त्यामुळे कोका कोला, पेप्सीलाही आपली किंमत कमी करावी लागली होती. आणि तो प्लॅन सक्सेस झाला. 2026 या वर्षात कॅम्पाचा बिझनेस 4700 कोटींच्या वर गेला आहे. ता तोच फॉर्म्युला आईस्क्रीममध्ये वापरत आहेत. कमी किंमत, जास्त खप.

भारतात आईस्क्रीमचा बिझनेस किती मोठा आहे?

तुम्हाला वाटेल आईस्क्रीमचा कितीसा बिझनेस असणार? पण आकडे खूप मोठे आहेत. एक्सपर्ट मार्केट रिसर्चनुसार भारतात आईस्क्रीमचा मार्केट दरवर्षी 15% ने वाढत आहे. 2035 पर्यंत हा मार्केट 16.10 बिलियन डॉलरचा होईल असा अंदाज आहे. म्हणजे जवळपास 1 लाख 35 हजार कोटी रुपये.

याचं कारण पण आहे, गर्मी वाढत चालली आहे, लोकांकडे पैसा जास्त आला आहे आणि लहान शहर, खेड्यांमध्ये पण आता लोक आईस्क्रीम खायला लागले आहेत.

रिलायन्सने यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यांनी दुकानांमध्ये आपले खास फ्रीजर ठेवायला सुरुवात केली आहे जेणेकरून लोकांना बॉम्बे क्रीमरी सहज दिसेल. जर कॅम्पा सारखाच हा पण हिट झाला तर अमूल आणि क्वालिटी वॉल्स सारख्या जुन्या कंपन्यांना खूप मोठा फटका बसणार हे नक्की.

Web Title: Ambanis masterstroke reliance makes a new market entry with 10 ice cream

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 06:42 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

I Phone 16 Price Drop: नवा iPhone येण्याआधी मोठी ऑफर! iPhone 16 वर थेट 15,000 पर्यंत बचत
1

I Phone 16 Price Drop: नवा iPhone येण्याआधी मोठी ऑफर! iPhone 16 वर थेट 15,000 पर्यंत बचत

Belkin New Earbuds 2026: छोटा पॅकेट बडा धमाका!! Belkinच्या नव्या Earbuds-Headphonesची जोरदार एन्ट्री
2

Belkin New Earbuds 2026: छोटा पॅकेट बडा धमाका!! Belkinच्या नव्या Earbuds-Headphonesची जोरदार एन्ट्री

Ambani House Antilia: अंबानींच्या अँटिलियालाही टक्कर! ‘या’ उद्योगपतीच्या घराची किंमत ऐकून व्हाल थक्क
3

Ambani House Antilia: अंबानींच्या अँटिलियालाही टक्कर! ‘या’ उद्योगपतीच्या घराची किंमत ऐकून व्हाल थक्क

PayPal Layoffs in India: PayPalचा भारताला मोठा धक्का! तब्बल 25% कर्मचाऱ्यांवर नोकरीवर टांगती तलवार
4

PayPal Layoffs in India: PayPalचा भारताला मोठा धक्का! तब्बल 25% कर्मचाऱ्यांवर नोकरीवर टांगती तलवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.