Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

APMC Market Building : वापर शून्य, तरीही 5.94 कोटींचा दणका! एपीएमसी बाजार समिती पुढे मोठा आर्थिक पेच

APMC Market Building : नवी मुंबईतील फळ बाजारात ५५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेली बहुउद्देशीय इमारत गेल्या सहा वर्षांपासून धूळ खात पडून आहे. कोणतीही कमाई होत नसताना आता इमारतीचे ठेकेदार टॉस्कॅनो इन्फ्रास्ट्रक्चरच्या अंतिम देयकावरून उद्भवलेल्या वादात पालिकसमोर पेच उभार राहिला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 25, 2026 | 05:44 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • वापर शून्य, तरीही 5.94 कोटींचा दणका!
  • एपीएमसी बाजार समिती पुढे मोठा आर्थिक पेच
  • इमारतीचा वापर नसताना ५.९४ कोटींचा दंड
नवी मुंबई\सिद्धेश प्रधान : फळ बाजारातील बहुउद्देशीय इमारतीवरून एपीएमसी वर आत्ता आर्थिक संकट आले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारात ५५ कोटी खर्चून उभारण्यात आलेली बहुउद्देशीय इमारत सहा वर्षापासून धूळ खात विनावापर पडून आहे. इमारतीच्या उभारणीतून कोणतेही उत्पन्न नसताना आता या इमारतीच्या ठेकेदाराच्या अंतिम देयकावरून निर्माण झालेल्या वादात मुंबई उच्च न्यायालयाने, ठेकेदाराला ५ कोटी ९४ लाख ५८ हजार ४२९ रुपये देयक देण्याचे निर्देश दिले आहेत. ( APMC Market Building )  

High Court on Aashirvaad Atta : तुम्हीही ‘आशीर्वाद’ आटा वापरता? दिल्ली हायकोर्टाकडून मोठी बातमी; दिला मोठा निर्णय?

बाजार समोर नवा आर्थिक पेच

बाजार समोर नवा आर्थिक पेच निर्माण झाला आहे. पणन मंत्री तथा राष्ट्रीय बाजाराचे अध्यक्ष जयकुमार रावल, पणन सचिव आणि एपीएमसी प्रशासन या प्रकरणी काय निर्णय घेतात, याकडे आता बाजार घटकांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी फळ बाजाराचे उप सचिव राजीव कोंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या कडून प्रतिसाद मिळाला नाही.

महापालिकेचे भोगवटा प्रमाणपत्र मिळाले नाही.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजार आवारात उघड्यावर मोकळ्या जागेत फळांचा व्यापार करणाऱ्या ओपनशेडमधील व्यापाऱ्यांसाठी व्यापारी गाळे आणि कार्यालयीन संकुल उभारण्यासाठी या मध्यवर्ती सुविधा इमारतीची उभारणी ची सुरुवात २०१२ साली करण्यात आली. २०२२ पर्यंत ही इमारत उभी राहिली . मात्र अद्याप पर्यंत या इमारतीला महापालिकेचे भोगवटा प्रमाणपत्र मिळाले नाही.

व्यापाऱ्यांचा गाळे घेण्यास नकार

इमारतीच्या उभारणीची मूळ रचना बदलून ही इमारत उभारण्यात आल्याने महापालिकेने या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र दिलेले नाही. त्यामुळे या इमारतीचा बाजार समितीला काहीच वापर करता येत नाही. या मध्यवर्ती सुविधा इमारतीत तळमजल्यावर ३४ गाळे आणि वरच्या मजल्यांवर ९४ कार्यालये आहेत. मात्र अद्याप व्यापारी व बाजार घटकांना त्याचा वापर करता आलेला नाही. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या गाळ्याची रचना चुकीच्या पद्धतीने केल्याने ओपन शेड मधील व्यापाऱ्यांनी हे गाळे घेण्यास नकार दिला आहे.

सुमारे २.४० कोटी वसूल करण्याची भूमिका

या इमारत उभारणी प्रकल्पाची कामे आणि बिले तपासल्यानंतर बाजार समितीच्या आर्किटेक्टकडून ठेकेदाराकडून सुमारे २.४० कोटी वसूल करण्याची भूमिका घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर टॉस्कॅनो इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.या ठेकेदाराने या संदर्भात उच्च न्यायालयात धाव घेतली. आणि त्यानुसार या प्रकरणाची माहिती घेत विषय समजून घेत न्यायालयाने बाजार समितीला ठेकेदाराला ५ कोटी ९४ लाख ५८ हजार ४२९ रुपये देयक देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे बाजार समिती पुढे आत्ता आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

बाजार समिती आधीच आर्थिक तोट्यात

आधीच सुविधा इमारत उभारण्यासाठी बाजार समितीचे ५५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र अद्याप ओसी न मिळाल्याने सहा वर्ष पासून इमारत धूळ खात पडून आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या उभारणीत बाजार समिती आधीच आर्थिक तोट्यात आहे. आणि त्यातच आता हा नवीन आर्थिक संकट बाजार समिती पुढे उभा राहिला आहे. या इमारत उभारणी प्रकल्पातील आर्थिक व तांत्रिक बाबींच्या चौकशीसाठी जुलै २०२०मध्ये चौकशी अधिकारी नेमून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती. मात्र या चौकशीचा अहवाल आणि त्यातील निष्कर्ष अद्याप समोर आले नसल्याचे बाजार घटकांचे म्हणणे आहे.

संबंधितांकडून नियमानुसार वसुली करावी

या बाजार समिती समोर उभ्या राहिलेल्या या आर्थिक संकटाबाबत ,इमारत आराखडा, बांधकाम, मोजमाप, अंतिम बिल, ताबा आणि भोगवटा प्रमाणपत्र पर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करून संबंधित अधिकारी, अभियंते, आर्किटेक्ट आणि ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी या निमित्ताने होत आहे. तसेच एपीएमसी चे आर्थिक नुकसान झाल्यास संबंधितांकडून नियमानुसार वसुली करावी, अशी मागणी बाजार घटकांनी केली आहे.

Tomato Price Drop : शेतकऱ्यांची नामुष्की! लागवडीचा खर्चही पाण्यात, दरात मोठी घसरण; 20 किलोच्या क्रेटला अवघा 100 ते 125 रुपयांत

Web Title: Apmc market building faces 5 94 crore financial crisis over unused 55 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • Agricultural Produce Market Committee
  • APMC Market
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : एमआयडीसीत दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश; १५ व्यक्ती व संस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
1

Navi Mumbai Crime : एमआयडीसीत दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश; १५ व्यक्ती व संस्थांविरुद्ध गुन्हा दाखल

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेचा उत्साह शिगेला! कोळी बांधवांनी सजवल्या होड्या, कोळीवाड्यात सणाची लगबग
2

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेचा उत्साह शिगेला! कोळी बांधवांनी सजवल्या होड्या, कोळीवाड्यात सणाची लगबग

Navi Mumbai News: महापे एमआयडीसीतील 3 डेअरींवर FDAचा छापा; 12 लाखांहून अधिक किमतीचे दूध-दुग्धजन्य पदार्थ जप्त
3

Navi Mumbai News: महापे एमआयडीसीतील 3 डेअरींवर FDAचा छापा; 12 लाखांहून अधिक किमतीचे दूध-दुग्धजन्य पदार्थ जप्त

ड्रग्जविरोधी लढ्याला बळ! ‘कॅम्पस कनेक्ट’चा शुभारंभ; पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेंच्या कामगिरीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
4

ड्रग्जविरोधी लढ्याला बळ! ‘कॅम्पस कनेक्ट’चा शुभारंभ; पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेंच्या कामगिरीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.