Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेचा उत्साह शिगेला! कोळी बांधवांनी सजवल्या होड्या, कोळीवाड्यात सणाची लगबग

नारळी पौर्णिमा आता काही दिवसांवर येऊन ठेपला असून, मुंबई आणि नवी मुंबईतील कोळीवाड्यांमध्ये सणाची लगबग सुरू झाली आहे. समुद्राशी असलेले नाते आणि पिढ्यानपिढ्या जपलेली सागरी संस्कृती जपणाऱ्या या उत्सवासाठी कोळी बांधवांनी होड्यांना रंगरंगोटी, बंदरकिनारी सजावट आणि पारंपरिक कोळी गीतांच्या सरावाला सुरुवात केली आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 24, 2026 | 02:30 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधवांनी सजवल्या होड्या, कोळीवाड्यात सणाची लगबग
  • कोळीवाड्यात उत्सवाची रेलचेल सुरू
  • आठवडाभर आधीपासून कोळीवाडा नारळीपौर्णिमेच्या तयारीला सुरुवात
 

 

नारळी पौर्णिमेचा सण गुरुवार, 27 ऑगस्ट रोजी सर्वत्र उत्साहात साजरा केला जाणार आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील कोळीवाड्यांमध्ये सणाची लगबग सुरू झाली आहे. समुद्राशी असलेले नाते आणि पिढ्यानपिढ्या जपलेली सागरी संस्कृती जपणाऱ्या कोळी समाजासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे सणाच्या आठवडाभर आधीपासूनच कोळीवाड्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

कोळी समाजाच्या सागरी जीवनाशी आणि संस्कृतीशी अटूट नाते सांगणारा नारळी पौर्णिमा उत्सव अन्य काही दिवसांवर येऊन ठेपला असून, मुंबईसह नवी मुंबईतील कोळीवाड्यात या उत्सवाची लगबग आतापासूनच सुरू झाली आहे. सणाच्या आठवडाभर आधीपासूनच कोळी बांधवांच्या उत्साहाला उधाण आले असून, संपूर्ण कोळीवाडा सणाच्या तयारीत मग्न झाला आहे. नारळी पौर्णिमा हा कोळी समाजासाठी केवळ धार्मिक सण नाही, तर समुद्राशी असलेले नाते, पूर्वजांनी परंपरा आणि आपल्या सागरी संस्कृतीचा अभिमान व्यक्त करणारा भावनिक सोहळा आहे.

सणाच्या पार्श्वभूमीवर होड्यांना रंगरंगोटी

या सणाची चाहूल लागताच कोळी बांधवांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारतो. या सणांच्या पार्श्वभूमीवर कोळी बांधव आपल्या होड्‌यांना रंगरंगोटी करून त्यांना नवे रूप देत आहेत. कुठे होड्‌यांवर आकर्षक रंग चहकिले जात आहेत, तर कुठे त्यांच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

Thane News: दहीहंडीपूर्वी ‘ठाण्याचा राजा’चा दमदार सराव; ९ थरांची यशस्वी सलामी देत रचला इतिहास

बंदरकिनारी रंगीबेरंगी पताका, झेंडे आणि फुलांची सजावट

यावेळी बंदरकिनारी रंगीबेरंगी पताका, झेंडे आणि फुलांच्या सजावटीने होड्‌या सजवल्या जात असून, समुद्रकिनाऱ्यावर एक वेगळेच चैतन्य पाहायला मिळत आहे.

तर, कोळीवाड्‌यात अनेक ठिकाणी कोळी गीतांच्या नृत्याचे सराव सुरू असून, लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सणांचा एक वेगळा आनंद दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात समुद्रदेवतेप्रती कृतज्ञता आणि आपल्या पूर्वजांच्या आठवणी दाटून येतात.

Dombivli Joshi School Bridge: डोंबिवलीकरांची वाहतूक कोंडीतून सुटका कधी? जोशी स्कूल पुलाचा रखडलेला ‘आर्म’ महासभेत गाजला

‘नारळ सोन्याचा, दिवाळे गावाचा’ हा उत्सव

समुद्र आमचा सखा, होडी आमची सोबती आणि नारळी पौर्णिमा आमचा अभिमान या भावनेतून नारळ सोन्याचा, दिवाळे गावाचा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून, यंदाही सिद्धी मित्र मंडळ, दिवाळे कोळीवाडा व ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने नारळी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्सवाच्या निमित्ताने कोळी समाजाची पारंपरिक संस्कृती, सागरी जीवनशैली आणि पिढ्यानपिढ्या जपलेल्या परंपराचे दर्शन घडणार असल्याचे सिद्धी मित्र मंडळांच्या आयोजकांनी सांगितले.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Narali purnima 2026 koliwada festival celebration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Koli Community
  • Mumbai News
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: नागपुरच्या गोधनी जलशुद्धीकरण प्रकल्पात वायूगळती
1

Maharashtra Breaking News Today 2026: नागपुरच्या गोधनी जलशुद्धीकरण प्रकल्पात वायूगळती

मुंबईची मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात; फडणवीस सरकारला दाखवलं ‘रेड कार्ड’
2

मुंबईची मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात; फडणवीस सरकारला दाखवलं ‘रेड कार्ड’

गणेशोत्सवाच्या तयारीला गालबोट; भुलेश्वरमध्ये मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू, पाच जखमी
3

गणेशोत्सवाच्या तयारीला गालबोट; भुलेश्वरमध्ये मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू, पाच जखमी

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; ४२२ किमीच्या प्रवासात ३६० कंटेनरची विक्रमी वाहतूक
4

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; ४२२ किमीच्या प्रवासात ३६० कंटेनरची विक्रमी वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.