Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ड्रग्जविरोधी लढ्याला बळ! ‘कॅम्पस कनेक्ट’चा शुभारंभ; पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेंच्या कामगिरीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

Drug Free Navi Mumbai: नवी मुंबईला नशामुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत ‘कॅम्पस कनेक्ट’ उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 22, 2026 | 04:53 PM
ड्रग्जविरोधी लढ्याला बळ! ‘कॅम्पस कनेक्ट’चा शुभारंभ; पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेंच्या कामगिरीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

ड्रग्जविरोधी लढ्याला बळ! ‘कॅम्पस कनेक्ट’चा शुभारंभ; पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेंच्या कामगिरीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

Follow Us
Follow Us:
  • नशामुक्त नवी मुंबईच्या दिशेने निर्णायक पाऊल; ‘कॅम्पस कनेक्ट’चा शुभारंभ
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन
  • पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या कामगिरीचे कौतुक
 

सावन वैश्य | नवी मुंबई : युवा पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यात जाण्यापासून रोखण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी (Drug Free Navi Mumbai) सुरू केलेल्या ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाला आणखी बळ मिळाले आहे. नवी मुंबई पोलिसांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘कॅम्पस कनेक्ट’ उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डी. वाय. पाटील महाविद्यालयात करण्यात आला. यावेळी नवी मुंबई विमानतळ पोलीस ठाणे, एकात्मिक सीसीटीव्ही कमांड सेंटर तसेच व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचेही उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला वनमंत्री गणेश नाईक, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, आमदार मंदा म्हात्रे, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, प्राचार्य आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

अंमली पदार्थांविरोधात पोलिसांचा धडाका

‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाची सुरुवात जानेवारी २०२५ मध्ये करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणानुसार नवी मुंबई पोलिसांनी मागील तीन वर्षांत अंमली पदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. या कारवाईत २,९१९ आरोपींना अटक करण्यात आली असून १,०२७ किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. जप्त मालाची किंमत सुमारे १४२ कोटी रुपये असल्याची माहिती देण्यात आली.

Murder Case : गुन्हा दाखल केल्याच्या रागातून वृद्धाचा निर्घृण खून; पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात

याशिवाय अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या १,८२२ जणांवर कारवाई, तर ३०० सराईत आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांना अंमली पदार्थांची विक्री अथवा सेवनाबाबत माहिती देता यावी, यासाठी ८८२८ ११२ ११२ हा हेल्पलाइन क्रमांकही सुरू करण्यात आला आहे.

प्रत्येक पोलीस ठाण्यात अँटी नार्कोटिक्स सेल

अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या पुढाकारातून प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र ‘अँटी नार्कोटिक्स सेल’ स्थापन करण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर अंमली पदार्थांच्या विक्री-वितरणावर लक्ष ठेवून तातडीने कारवाई करण्यास या सेलची मदत होत आहे. नवी मुंबई पोलिसांच्या या प्रयोगाची दखल घेत राज्यातील इतर पोलीस ठाण्यांमध्येही अशा प्रकारचे सेल स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘कॅम्पस कनेक्ट’मधून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

‘कॅम्पस कनेक्ट’ उपक्रमाला नवी मुंबईतील जवळपास २५० महाविद्यालयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात विद्यार्थी व पोलीस प्रतिनिधींच्या सहभागातून ‘अँटी-नार्कोटिक्स कमिटी’ स्थापन करण्यात येणार आहे. पोस्टर मेकिंग आणि रील मेकिंग स्पर्धेतील विजेत्यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांनी नशामुक्त जीवन जगण्याची शपथ घेतली. त्यामुळे अंमली पदार्थांविरोधातील लढा केवळ पोलिसांपुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांपर्यंत आणि शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

व्यसनमुक्ती आणि पुनर्वसनालाही प्राधान्य

नवी मुंबई पोलीस आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त पुढाकारातून व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात वैद्यकीय तपासणी, मानसोपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन, औषधोपचार व समुपदेशनासह १० खाटांची निवासी उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. व्यसनाधीन व्यक्तींचा आत्मविश्वास पुन्हा निर्माण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यावर भर देण्यात येणार आहे.

४,०११ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर एकाच ठिकाणाहून नजर

नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका आणि तळोजा एमआयडीसी क्षेत्रातील ४,०११ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फीड पोलीस आयुक्त कार्यालयातील एकात्मिक सीसीटीव्ही कमांड सेंटरमध्ये पाहता येणार आहे. गुन्हेगारांचा माग काढणे, गुन्ह्यांचा तपास जलद करणे आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हे कमांड सेंटर महत्त्वाचे ठरणार आहे.

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या कामगिरीचे कौतुक

अंमली पदार्थांविरोधातील या कठोर आणि प्रभावी लढ्यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक होत आहे. दिवस-रात्र मेहनत घेत नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ पुरवठादारांवर धडक कारवाई करण्यासोबतच समाजात जनजागृती घडवून आणण्यावरही भर दिला आहे.

पोलीस, प्रशासन आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नांतून नवी मुंबई लवकरच पूर्णपणे नशामुक्त होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. ‘कॅम्पस कनेक्ट’, अँटी नार्कोटिक्स सेल, व्यसनमुक्ती केंद्र आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नशामुक्त नवी मुंबईच्या दिशेने पोलिसांनी निर्णायक पाऊल टाकले आहे.

अंमली पदार्थांची विक्री किंवा सेवनाबाबत माहिती असल्यास नागरिकांनी ८८२८ ११२ ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले आहे.

Odisha Crime : बायको मिळवण्यासाठी नरबळी! जेवणाच्या बहाण्याने मित्राला बोलावलं अन् झोपेतच केला शिरच्छेद

Web Title: Campus connect launched for drug free navi mumbai by cm devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • drug
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: कौशल्य विकासासाठी महाराष्ट्राचे महत्त्वाचे पाऊल; ‘टाटा स्ट्राइव्ह’ ठरणार तरुणांसाठी फायदेशीर
1

Devendra Fadnavis: कौशल्य विकासासाठी महाराष्ट्राचे महत्त्वाचे पाऊल; ‘टाटा स्ट्राइव्ह’ ठरणार तरुणांसाठी फायदेशीर

Drug Free Campaign: तरुणाईला नशेपासून दूर ठेवण्यासाठी ‘कॅम्पस कनेक्ट’; नवी मुंबई पोलिसांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम
2

Drug Free Campaign: तरुणाईला नशेपासून दूर ठेवण्यासाठी ‘कॅम्पस कनेक्ट’; नवी मुंबई पोलिसांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

Maharashtra Politics: फडणवीसांची सावध पाऊले; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार का घेतला स्वतःकडे?
3

Maharashtra Politics: फडणवीसांची सावध पाऊले; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार का घेतला स्वतःकडे?

Ashok Saraf: मराठी चित्रपटसृष्टीचे ‘मामा’ अशोक सराफ यांचा नागपुरात नागरी सत्कार; मुख्यमंत्र्यांनी केला गौरव
4

Ashok Saraf: मराठी चित्रपटसृष्टीचे ‘मामा’ अशोक सराफ यांचा नागपुरात नागरी सत्कार; मुख्यमंत्र्यांनी केला गौरव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.