Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime : एमआयडीसीत दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश; १५ व्यक्ती व संस्थांविरुद्ध गुन्हा दाखल

नवी मुंबईतील महापे एमआयडीसीत एफडीएने दूध भेसळीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. टँकरमधील दुधात मिल्क पावडर आणि थंड पाणी मिसळून विक्री; ४,७१० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करत १५ जणांवर गुन्हा दाखल.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Aug 25, 2026 | 12:19 PM
एमआयडीसीत दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश; १५ व्यक्ती व संस्थांविरुद्ध गुन्हा दाखल

एमआयडीसीत दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश; १५ व्यक्ती व संस्थांविरुद्ध गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:
  •  एफडीएने केला दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश
  • ४,७१० लिटर भेसळयुक्त दूध जप्त
  • गुप्त माहीतीच्या अधारे एफडीएची कारवाई
नवी मुंबई FDA Action: नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरात दुधात भेसळ करणाऱ्या रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत टँकरमधील दुधात स्किम्ड मिल्क पावडर आणि थंड पाणी मिसळून भेसळ केली जात असल्याचे उघड झाले. या कारवाईत ४,७१० लिटर भेसळयुक्त दूध जप्त करून नष्ट करण्यात आले असून, त्याची किंमत सुमारे १ लाख ८५ हजार ७८० रुपये आहे. या प्रकरणी १५ व्यक्ती व संस्थांविरुद्ध तुर्भे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एफडीएच्या विशेष पथकाने १९ ऑगस्ट रोजी महापे एमआयडीसीतील ‘मेसर्स पी.के. डेअरी’वर छापा टाकला. या वेळी डेअरीचा मालक प्रदीप कमलेश यादव याच्या मदतीने टँकरमधील दुधात SMP आणि थंड पाण्याचे मिश्रण करणाऱ्या शिवेंद्र श्यामलाल जैस्वाल याला अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

हे सुध्दा वाचा – शिरूर हादरलं! नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार; हॉटेलमध्ये नेले अन्…

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्लंजरच्या साहाय्याने एक किलो स्किम्ड मिल्क पावडर आठ ते दहा लिटर थंड पाण्यात मिसळली जात होती. त्यानंतर हे मिश्रण दुधात मिसळून ते शुद्ध गायीचे किंवा म्हशीचे दूध असल्याचे भासवून विकले जात होते. हे भेसळयुक्त दूध ठाणे, ऐरोली, कोपरी, दिघा आणि घणसोली परिसरातील विविध डेअरींना पुरवले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
कारवाईदरम्यान एफडीएच्या पथकाने १२९.५ किलो पनीर, ४७३ किलो स्किम्ड मिल्क पावडर आणि ८८.४ किलो क्रीमही जप्त केले. संबंधित डेअरीकडे आवश्यक अन्न सुरक्षा परवाना नसल्याचे आढळून आल्याने ती तातडीने बंद करण्यात आली.

हे सुध्दा वाचा -ट्रेन-ट्रॅव्हल्सने यायचे अन् मोबाईल लांबवायचे; झारखंड- बिहारच्या दोघांना दीड तासात ठोकल्या बेड्या

दरम्यान, २२ ऑगस्ट रोजी तुर्भे पोलिस ठाण्यात या प्रकरणी १५ व्यक्ती व संस्थांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन डेअरी मालकांसह भेसळयुक्त दूध स्वीकारणाऱ्या विविध विक्रेत्यांचा समावेश आहे. संबंधित सर्व आस्थापनांचे अन्न सुरक्षा परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Web Title: Navi mumbai crime in midc milk adulteration racket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 12:19 PM

Topics:  

  • Adulterating Milk
  • crime news
  • FDA Action
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ डॉक्टर महिलेची फसवणूक; APK फाईल पाठवली अन्…
1

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ डॉक्टर महिलेची फसवणूक; APK फाईल पाठवली अन्…

शिक्षणाच्या प्रांगणात विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर? Pune University मध्ये ‘त्या’ रात्री नेमके काय घडले?
2

शिक्षणाच्या प्रांगणात विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर? Pune University मध्ये ‘त्या’ रात्री नेमके काय घडले?

दुचाकीवरून जाताना तरुणावर अचानक कत्तीने हल्ला, गेवराईत खळबळ; नेमकं काय घडलं?
3

दुचाकीवरून जाताना तरुणावर अचानक कत्तीने हल्ला, गेवराईत खळबळ; नेमकं काय घडलं?

Pune Murder : मध्यस्थी करायला गेला अन् जीव गमावला; पाषाणमध्ये तरुणाचा भोसकून खून
4

Pune Murder : मध्यस्थी करायला गेला अन् जीव गमावला; पाषाणमध्ये तरुणाचा भोसकून खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.