Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ayushman Bharat Mahatma Phule Scheme: दर्जेदार उपचार! आयुष्मान भारत आणि महात्मा फुले योजना एकत्रित; आरोग्यसेवेची गुणवत्ता सुधारली

Maharashtra Health Scheme: जानेवारी २०२५ पासून आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना एकत्रित लागू. उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढली; रुग्णालयांना कॅशलेस उपचार देणे बंधनकारक.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 09, 2025 | 08:27 PM
आयुष्मान भारत आणि महात्मा फुले योजना एकत्रित; आरोग्यसेवेची गुणवत्ता सुधारली (Photo Credit - X)

आयुष्मान भारत आणि महात्मा फुले योजना एकत्रित; आरोग्यसेवेची गुणवत्ता सुधारली (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

  • उपचारांची संख्या वाढली
  • राज्याच्या आरोग्य हमी योजनांमध्ये क्रांतिकारी बदल
  • आरोग्यसेवेची गुणवत्ता सुधारली
Ayushman Bharat Mahatma Phule Scheme Marathi News: राज्यातील नागरिकांना अधिक दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) या दोन्ही योजनांचे एकत्रीकरण करून जानेवारी २०२५ पासून महत्त्वपूर्ण सुधारणा लागू करण्यात आल्या आहेत. या सुधारणांची माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दिली.

उपचारांची संख्या आणि गुणवत्तेत वाढ

या एकत्रित योजनेत रुग्णांना मिळणाऱ्या उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढविण्यात आली आहे. उपचारांच्या दरात वाढ करण्यात आली असून पेमेंट प्रक्रियेतही आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. उपचारांची गुणवत्ता वाढविण्यासाठी NABH आणि NQAS प्रमाणित रुग्णालयांना दावा रकमेतून प्रति उपचार १० ते १५ टक्के प्रोत्साहन रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तक्रार निवारण आणि मार्गदर्शन व्यवस्था

योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि तक्रार निवारणासाठी राज्य स्तरावर यंत्रणा उभारण्यात आली आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि तक्रार निवारणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली “जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समिती” तसेच पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली “जन आरोग्य संरक्षण कार्यकारिणी” गठीत करण्यात आली आहे.

  • टोल-फ्री कॉल सेंटर: नागरिकांना माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी २४ तास कार्यरत टोल-फ्री कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. नागरिक खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकतात:
    • १५५३८८ / १८००२३३२२००
    • १४५५५ / १८००१११५६५

हे देखील वाचा : Ayushman Bharat Yojana: आजारी पडला तर घर विकावे लागणार नाही..; आयुष्मान भारत योजना कशी मिळवायची? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर

प्रत्येक अंगीकृत रुग्णालयात दर्शनी भागात योजना कक्ष (किऑस्क) स्थापन करणे बंधनकारक असून या कक्षात नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी “आरोग्यमित्र” नियुक्त करण्यात आले आहेत. उपचार व सुविधा मिळण्यात अडचण आल्यास तक्रारींचे तात्काळ निवारण करण्याची जबाबदारी जिल्हा समन्वयक, क्षेत्रीय व्यवस्थापक, अंमलबजावणी सहाय्य संस्था आणि जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे. त्यांच्या संपर्क क्रमांकांची माहिती प्रत्येक रुग्णालयात स्पष्टपणे प्रदर्शित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कॅशलेस उपचार बंधनकारक; उल्लंघन केल्यास कारवाई

राज्य शासनाचे हे पाऊल नागरिकांना दर्जेदार, वेळेवर आणि पूर्णपणे कॅशलेस (Cashless) आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.  शस्त्रक्रिया, तपासण्या, प्रत्यारोपण, औषधे, जेवण आणि एक वेळचा प्रवास खर्च यांचा समावेश असलेल्या पॅकेजमध्ये रुग्णांकडून कोणतेही शुल्क आकारता कामा नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. योजनेत समाविष्ट उपचार नाकारणे किंवा रुग्णांकडून रक्कम मागणे अशा तक्रारी आल्यास चौकशीनंतर संबंधित रुग्णालयावर दंड, निलंबन किंवा अंगीकरण रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल.

राज्यातील सर्व नागरिक या एकत्रित योजनेतर्गत उपचारांसाठी पात्र आहेत. नागरिकांनी योजनांबाबत जागरूक राहून आपले हक्क बजावावेत आणि कोणत्याही अडचणीसाठी आरोग्यमित्र, जिल्हास्तरीय अधिकारी किंवा राज्य आरोग्य हमी सोसायटीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे देखील वाचा: …आता 10 लाखांपर्यंतचा उपचार मोफत मिळणार; केंद्राकडून अर्थसंकल्पात मोठ्या घोषणेची शक्यता!

Web Title: Ayushman bharat and mahatma phule scheme combined quality of healthcare improved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 08:27 PM

Topics:  

  • Ayushman Bharat Yojana
  • Governement Scheme
  • health
  • mahatma phule
  • Mumbai

संबंधित बातम्या

RYIM 2025: वैज्ञानिक उत्सुकता आणि सहकार्याचा जयघोष! मुंबईत ‘रिजनल यंग इन्व्हेस्टिगेटर्स मीटिंग २०२५’ चा उत्साहपूर्ण समारोप
1

RYIM 2025: वैज्ञानिक उत्सुकता आणि सहकार्याचा जयघोष! मुंबईत ‘रिजनल यंग इन्व्हेस्टिगेटर्स मीटिंग २०२५’ चा उत्साहपूर्ण समारोप

Health Care : शांत झोप काळोखातच का लागते ? काय आहे यामागील शास्त्रीय कारण
2

Health Care : शांत झोप काळोखातच का लागते ? काय आहे यामागील शास्त्रीय कारण

डॉक्टरांचा कोट पांढराच का असतो? काय आहे यामागील नेमकं कारण?
3

डॉक्टरांचा कोट पांढराच का असतो? काय आहे यामागील नेमकं कारण?

Mumbai Cyber Fraud: मुंबई बनले आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीचे केंद्र! एका वर्षात इतक्या कॉल सेंटर्सचा पर्दाफाश, अब्जावधींची लूट
4

Mumbai Cyber Fraud: मुंबई बनले आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीचे केंद्र! एका वर्षात इतक्या कॉल सेंटर्सचा पर्दाफाश, अब्जावधींची लूट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.