Chess Tournament : महापौर चषक बुद्धिबळ स्पर्धेत अर्ह वाघमारेचा डबल धमाका!
एलआयसी-मुंबई महापौर चषक शालेय बुद्धिबळ स्पर्धेत (Chess Tournament) आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित अर्ह वाघमारेने दुहेरी विजेतेपद पटकावत लक्षवेधी कामगिरी केली. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आणि आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने, भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) सहप्रायोजकत्वाने आयोजित या स्पर्धेत अर्हने १३ आणि १४ वर्षांखालील अशा दोन्ही गटांत अव्वल स्थान मिळवले.
१३ वर्षांखालील गटात अर्हने सर्व सामने जिंकत निर्विवाद वर्चस्व गाजवले. मात्र, १४ वर्षांखालील गटाचे विजेतेपद मिळवताना त्याला कडव्या आव्हानाचा सामना करावा लागला. निर्णायक पाचव्या फेरीत एकमेव आघाडीवर असलेल्या फिडे गुणांकित प्रणव जैनला अर्हने ३२व्या चालीत पराभूत केले. या विजयासह ४.५ गुणांची कमाई करत त्याने प्रथम स्थान पटकावले.
दुहेरी विजेतेपद मिळवणाऱ्या अर्ह वाघमारेचा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेत विविध जिल्ह्यांतील फिडे गुणांकित सब-ज्युनियर बुद्धिबळपटूंसह एकूण २१५ शालेय खेळाडूंनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे, महानगरपालिका शाळांतील २८ खेळाडूंनी प्रथमच या स्पर्धेत सहभागी होत चांगली कामगिरी केली.
१० वर्षांखालील गटात अनन्या चव्हाणने फिडे गुणांकित अंश शर्मा आणि ग्रीवा जैन यांचे आव्हान परतवून लावले. तिने साखळीतील पाचही सामने जिंकत विजेतेपदावर नाव कोरले. अंश शर्मा (४ गुण) याने दुसरे, ग्रीवा जैन (४ गुण) हिने तिसरे, साधना खुमार (३ गुण) हिने चौथे, तर माहीर वडांबे (३ गुण) याने पाचवे स्थान मिळवले.
सहा वर्षांखालील गटात एरिक पिकार्डोने पाच गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. आरीन शुक्ला (४ गुण) दुसऱ्या, विहान अहुजा (४ गुण) तिसऱ्या, झेउस वाडिया (४ गुण) चौथ्या, तर सोहम कांबळी (४ गुण) पाचव्या स्थानावर राहिला.
१४ वर्षांखालील गटात अर्ह वाघमारेने ४.५ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. प्रणव जैन (४ गुण) दुसऱ्या, अर्हम गाडा (४ गुण) तिसऱ्या, आर्यन उपरकर (३.५ गुण) चौथ्या, तर मयुरेश पाटील (३.५ गुण) पाचव्या स्थानावर राहिला.
Youth Olympics 2026 साठी भारताचा 17 खेळाडूंचा संघ जाहीर; 11 खेळांत दाखवणार दम
मुंबई महापौर, सिबीईयुएम, आरएमएमएस आणि मुंबई शहर बुद्धिबळ संघटना यांच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडली. पारितोषिक वितरण समारंभाला माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ, क्रीडापटू गोविंदराव मोहिते, क्रीडाप्रेमी सुनील साळवी, विष्णू तांडेल, जनार्दन मोरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आणि सिबीईयुएमचे पदाधिकारी उपस्थित होते.
Ans: अर्ह वाघमारेने १३ आणि १४ वर्षांखालील गटांत विजेतेपद पटकावले.
Ans: या स्पर्धेत विविध जिल्ह्यांतील बुद्धिबळपटूंसह एकूण २१५ शालेय खेळाडूंनी सहभाग घेतला.
Ans: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अर्ह वाघमारेचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.






