Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तृतीयपंथीयांच्या स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना; २५ हजार ते २ लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य

अर्जदाराने पुढील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्याचा किमान १० वर्ष रहिवासी असावा. सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेले तृतीयपंथीय ओळखपत्र असावे. वय १८ ते ५० वर्षे असावे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 08, 2026 | 02:35 AM
तृतीयपंथीयांच्या स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना; २५ हजार ते २ लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य
Follow Us
Follow Us:

व्यवसायासाठी बीज भांडवल योजना राबविण्यास मंजुरी
२५ हजार रुपयांपासून ते २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य उपलब्ध
योजनेअंतर्गत तीन प्रकारच्या कर्ज योजनांचा समावेश

मुंबई: तृतीयपंथीय व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वयंरोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तृतीयपंथीयांच्या स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली असून या योजनेद्वारे २५ हजार रुपयांपासून ते २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या योजनेचा उद्देश तृतीयपंथीयांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे. कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षणाद्वारे शाश्वत रोजगार निर्माण करणे. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासास चालना देणे. लघुउद्योग व सूक्ष्म व्यवसाय सुरू करण्यासाठी बीज भांडवल उपलब्ध करून देणे.

योजनेअंतर्गत तीन प्रकारच्या कर्ज योजनांचा समावेश करण्यात आला आहे. लघु कर्ज योजनेत २५ हजार रुपयांपर्यंत, मध्यम कर्ज योजनेत ५० हजार रुपयांपर्यंत तर दीर्घ कर्ज योजनेत २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. प्रत्येक योजनेत लाभार्थ्याचा हिस्सा ५ टक्के, शासन अनुदान ४५ टक्के आणि बँक कर्ज ५० टक्के या प्रमाणात निधीची रचना करण्यात आली आहे. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना ३ टक्के व्याज सवलतीचाही विशेष लाभ मिळणार आहे.

आता थांबायचं नाय ! तृतीयपंथीय मुलांच्या पालकांसाठी सरकारचा मदतीचा हात, काय आहे ‘ही’ योजना ?

अर्जदाराने पुढील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्याचा किमान १० वर्ष रहिवासी असावा. सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेले तृतीयपंथीय ओळखपत्र असावे. वय १८ ते ५० वर्षे असावे. व्यवसाय करण्यास सक्षम असावा. यापूर्वी अन्य बीज भांडवल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. व्यवसायाचे कौशल्य असल्यास त्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे. या योजनेसाठी जामीनदार किंवा तारणाची आवश्यकता नाही.

या योजनेद्वारे भाजी स्टॉल, चहा व स्नॅक्स सेंटर, झेरॉक्स व लेमिनेशन सेंटर, फ्रुट स्टॉल, पिठाची गिरणी, कापडी पिशव्या निर्मिती, स्टेशनरी दुकान, मिनी मालवाहतूक टेम्पो, जनरल स्टोअर्स, आईस्क्रीम फॅक्टरी, ज्यूस सेंटर, बेकरी, बांगडी दुकान, बटाटा वेफर्स निर्मिती, ब्युटी पार्लर, सलून, चिकन व मासे विक्री केंद्र, मोबाईल शॉपी, मसाले निर्मिती, लॉन्ड्री व्यवसाय तसेच प्लंबर, इलेक्ट्रिशियन, एसी, मोबाईल व घरगुती उपकरणे दुरुस्ती यांसारख्या विविध व्यवसायांसाठी कर्ज उपलब्ध होणार आहे.

किन्नर शब्दाचा अर्थ काय ? ब्रम्हदेवांची मुलं किन्नर होती का ? पुराणात केला आहे याचा खुलासा

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे महाराष्ट्रातील १० वर्ष वास्तव्यासंदर्भातील अधिवास प्रमाणपत्र, तृतीयपंथीय ओळखपत्र, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, रेशन कार्ड, लाईट बिल इत्यादी, व्यवसायाच्या जागेचा पुरावा, यंत्रसामग्री किंवा साहित्याचे कोटेशन भाडेकरार (लागू असल्यास) जागामालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक आहेत. इच्छुक तृतीयपंथीयांनी शासनाने विहित केलेल्या नमुन्यात दिलेल्या https://tinyurl.com/22wpc5j2 संबंधित लिंकवरून अर्ज डाउनलोड करून आवश्यक कागदपत्रांसह भरलेला अर्ज जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयात सादर करावा, असे मुंबई उपनगरचे सहाय्यक आयुक्त यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Web Title: Beej capital scheme for self employment of transgender individuals financial assistance ranging from 25000 to 2 lakhs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Business News
  • Economic News
  • Transgenders

संबंधित बातम्या

GenZचा Homebuyingकडे कल! भारतात तरुण वयातच घर घेण्याचा ट्रेंड, कर्जदारांमध्ये ‘इतक्या’ टक्क्यांची  वाढ
1

GenZचा Homebuyingकडे कल! भारतात तरुण वयातच घर घेण्याचा ट्रेंड, कर्जदारांमध्ये ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO
2

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit
3

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit

8th Pay Commission 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर? फिटमेंट फॅक्टर अन् HRAवर महत्त्वाची अपडेट
4

8th Pay Commission 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर? फिटमेंट फॅक्टर अन् HRAवर महत्त्वाची अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.