आजवर अनेक तृतीयपंथीयांनी त्यांच्या अस्तित्वासाठी आणि स्वातंत्र्यासाठी बंड पुकारलं. यातील एक नाव म्हणजे गौरी सावंत. एका पॉडकास्टमध्ये गौरी सावंत यांनी हिंदू धर्मातील संस्कृती आणि पंरपरांचा आधार घेत किन्नरांचं महत्व सांगितलं आहे. पॉडकास्टमध्ये सांगताना गौरी सावंत म्हणाल्या की, ब्रम्हदेवांना दोन मुलं होती आणि ही मुलं किन्नर होती. पौराणिक कथेनुसार पाहायचं झालं तर समुद्रमंथामध्ये विष्णूदेवांनी मोहिनी अवतार घेतला होता. अजून सविस्तर सांगायचं झालं तर ग्रहमालिकेतील बुध ग्रह हा नपुंसकलिंग मानला जातो. असं म्हटलं जातं की त्याला स्वत:चं अस्तित्व नाही. मात्र ज्योतिषशास्त्रानुसाल ज्याची आर्थिक बाजू कमकुवत आहे त्याला बुधाची उपासना करायाला सांगतात. पत्रिकेत बुध निचेचा असला की, त्या व्यक्तीला उजव्या करंगळीत पाचू धारण करायला सांगतात. किंवा किन्नरांना दान करा असं म्हटलं जातं. अनेकदा हिरवे मूग, हिरवी साडी किंवा हिरव्या बांगड्या किन्नरांना दान द्या हा सल्ला देखील दिला जातो. दान हे सुपात्र असायला लागतं.
पुराणानुसार किन्नरांचं मुळ पाहायला गेलं तर त्याची देखील वेगळी आख्यायिका आहे. गौैरी सावंत यांनी सांगितलं की, जेव्हा परशुरामाने क्षत्रियांचा नाश करायचं ठरवलं तेव्हा काही राजांनी जीव वाचवण्याकरिता साडी नेसली आणि ते रेणूका मातेला शरण गेले. जेव्हा एखादा पुरुष साडी नेसतो तेव्हा त्याच्यातला पुरुषार्थ संपलेला असतो. तेव्हा तो एखाद्या स्त्रीकडे पाहताना चुकीच्या नजरेने पाहत नाही. जेव्हा रेणूका मातेने परशुरामाला शह दिला त्यावेळी अक्कया आणि जोगया या दोन्ही राजांना तिने शिष्य करुन घेतलं. त्यानंर देवळातील पुजारी हे आधीच्या काळात किन्नर समाजाचे असायचे. देवळातील जे काही पौैरोहित्य असे ते किन्नर करत होते. विशेषत: महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील देवीच्या देवळातील पौरोहित्य करणारे पुजारी हे किन्नर होते. हा धार्मिकदृष्ट्या किन्नरांचं मूळ होतं.
कालांतराने ब्रिटीश आणि मुघलांच्या काळात जेव्हा देवळं पाडायला सुुुरुवात झाली त्यावेळी किन्ररांचं अस्तित्व लयाला येत गेलं. ब्रिटीश राजवटीच्या काळात किन्नरांवर अस्तित्वावर कायदा लादण्यात आला त्यावेळी अस्तित्व टिकवण्यासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी हे पौरोहित्य करणारे सिग्नलवर भिक मागून, टाळ्या वाजवून स्वत:चं पोट भरायला लागले आणि मग पुढच्या पिढ्यांमध्ये किन्नरांविषयीते गैरसमज दृढ होत गेले. मूळ किन्नर समाज हा पुर्वीच्या काळी देवीचं पौरोहित्य करणारे असतं असं गौरा सावंत यांनी सांगितलं.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






