दोन बँकांमध्ये खाते असल्यास दंड ठोठावला जाणार? वाचा... आरबीआयचा नियम काय?
नवीन वर्षात बँकिंग क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसी बँक तीन बँकांमधील 9.5 टक्क्यांपर्यंत हिस्सा खरेदी करणार आहे. यासाठी त्यांना आरबीआयकडून हिरवा कंदील मिळाला आहे. यामध्ये कोटक महिंद्रा बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक आणि कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक यांचा समावेश आहे.
एक्सचेंज फाइलिंगला दिलीये माहिती
एयू स्मॉल फायनान्स बँकेने आज एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगितले की, त्यांना आरबीआयकडून एक पत्र प्राप्त झाले आहे. त्यात म्हटले आहे की, एचडीएफसी बँक आणि इतर समूह कंपन्यांना एचडीएफसी म्युच्युअल फंड, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स, एचडीएफसी पेन्शन मॅनेजमेंट, एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स आणि एचडीएफसी सिक्युरिटीज यांना एयू स्मॉल फायनान्समधील 9.50 टक्क्य़ां र्यंत हिस्सा खरेदी करण्यास मंजुरी मिळाली आहे.
पाणीपुरीवाल्याला मिळाली 40 लाखांच्या जीएसटीची नोटीस; सोशल माध्यमांवर उडालीये खळबळ!
एयु स्मॉल फायनान्स बँक ही बीएसई 100 निर्देशांकावर सूचीबद्ध केलेली अनुसूचित व्यावसायिक बँक आहे. त्याची मार्केट कॅप 42,678.04 कोटी रुपये आहे. एचडीएफसी बँकेचे मार्केट कॅप 13,37,919.84 कोटी रुपये आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टीसीएसनंतर मार्केट कॅपच्या बाबतीत ही देशातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. एचडीएफसी बँकेने एक्सचेंजला दिलेल्या फाइलिंगमध्ये असेही म्हटले आहे की, कोटक महिंद्रा बँक आणि कॅपिटल स्मॉल फायनान्स बँकेतील एकूण 9.5 टक्के होल्डिंग खरेदी करण्यासाठी आरबीआयची मंजुरी मिळाली आहे.
एक वर्षाची असेल वैधता
एचडीएफसी बँकेला या बँकांमधील ही हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी दिलेली मंजुरी एका वर्षासाठी वैध असणार आहे. तसेच एचडीएफसी बँकेला एकूण होल्डिंगची खात्री करावी लागणार आहे. म्हणजेच, या बँकांमधील एचडीएफसी बँक आणि इतर समूह कंपन्यांची होल्डिंग ही त्या बँकांच्या पेड-अप भाग भांडवलाच्या किंवा मतदानाच्या अधिकाराच्या ९.५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावी.
आरबीआयच्या 2023 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एकूण होल्डिंगमध्ये बँकेचे शेअर्स, तिच्या सहाय्यक कंपन्या, म्युच्युअल फंड, विश्वस्त आणि प्रवर्तक समूह घटकांचा समावेश होतो. एचडीएफसी बँक या बँकांमध्ये गुंतवणूक करण्याची योजना करत नाही. परंतु समूहाची एकूण होल्डिंग 5 टक्के मर्यादेपेक्षा जास्त असू शकते. त्यामुळे एचडीएफसी बँकेने गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्यासाठी आरबीआयकडे मंजुरी मागितली होती.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)