Panipuri vendors receive GST notice worth Rs 40 lakhs creates a stir on social media
देशभरातील मोठमोठ्या व्यावसायिकांना जीएसटीच्या रुपाने सरकारकडून नोटीसा प्राप्त होणे हे काही नवीन नाही. मात्र, आता एका पाणीपुरी विक्रेत्यालाच आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी तब्बल ४० लाख रुपयांचे पेमेंट मिळाल्याने जीएसटीची नोटीस मिळाली आहे. विशेष म्हणजे ही जीएसटीची नोटीस सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून, तिच्यावर समाजमाध्यमावर मोठी चर्चा होत आहे.
17 डिसेंबर 2024 रोजी तामिळनाडू वस्तू आणि सेवा कर कायदा आणि केंद्रीय जीएसटी कायद्याच्या कलम 70 अंतर्गत जारी ही नोटीस संबंधित पाणीपुरीवाल्या पाठवण्यात आली आहे. या नोटीसमध्ये पाणीपुरीवाल्याला स्वत हजर राहून, कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
एका नामांकित माध्यमाच्या माहितीनुसा, “Razorpay आणि PhonePe कडून प्राप्त झालेल्या अहवालांच्या आधारे, संबंधित पाणीपुरीवाल्याला वस्तू किंवा सेवांच्या बाह्य पुरवठ्यासाठी आणि 2021-22, 2022- या वर्षांसाठी युपीँआय पेमेंट मिळाले आहेत. 2023 आणि 2023-24 साठी पाणीपुरीवाल्याला 2023-24 मध्ये 40 लाख रुपये मिळाले आहेत. असे नोटीशीत नमुद करण्यात आले आहे.
गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरे बांधणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
सोशल मीडियावर एकच खळबळ
जीएसटीच्या या नोटिसीने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या पोस्टच्या कमेंट्स पाहून काही लोक विचार करत आहेत की, आता आपली करिअर बदलण्याची वेळ आली आहे का! नोटीसमध्ये असेही म्हटले आहे की, मर्यादा ओलांडल्यानंतरही जीएसटी नोंदणी न घेता वस्तू/सेवांचा पुरवठा करणे हा गुन्हा आहे. अनेक सोशल मीडिया यूजर्सनी नोटीसवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, याबाबत सध्या तरी कोणत्याही माध्यमाकडून या नोटीशीची सत्यता पडताळण्यात आलेली नाही.
एका सोशल मीडीया वापरकर्त्याने लिहिले आहे की, “त्याला 40 लाख रुपये मिळाले आहेत आणि हे त्याचे उत्पन्न असू शकते किंवा असू शकत नाही. तुम्हाला कच्च्या मालाची किंमत, मनुष्यबळ खर्च आणि निश्चित शुल्क इत्यादी वजा करावे लागतील. आणखी एका Reddit वापरकर्त्याने सांगितले आहे की, “त्याने स्वतःची जीएसटी अंतर्गत नोंदणी केली तर बरे होईल.”
एका वापरकर्त्याने जीएसटीला “गोलगप्पा शेवपुरी कर” म्हटले आहे
एका Reddit वापरकर्त्याने हे एक चांगले पाऊल असल्याचे म्हटले आहे. “हे त्या सर्व व्यवसाय मालकांसाठी केले पाहिजे जे कर भरत नाहीत आणि खूप कमावतात. त्यांच्यामुळे आम्ही करदात्यांना अधिक कर भरावा लागतो.” मात्र, काही युजर्सनी नोटीसवर शंकाही व्यक्त केली आहे. एका युजरने म्हटले आहे की, “होय, पाणीपुरी विकून एवढी कमाई करणे शक्य आहे, पण प्रत्यक्षात ती बनावट दिसते, जी सहज फोटोशॉप करता येते.”