श्रीलंकेचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय(फोटो-सोशल मीडिया)
AUS vs SL, T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज ३० व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात घामसामान होणार आहे. पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात श्रीलंका संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ऑस्ट्रेलिया संघ प्रथम गोलंदाजी फलंदाजीला उतरेल. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार मिचेल मार्श संघात परतला आहे. त्यामुळे संघाला अधिक बळकटी मिळणार आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा ऑस्ट्रेलिया सध्या कठीण काळातून जात आहे. त्यांना आजच्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलिया सध्या पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहेत आणि आजचा आणखी एक पराभव त्यांना बाद होण्याच्या उंबरठ्यावर ढकलू शकतो.
दुसरीकडे, सह-यजमान श्रीलंकेला आज सुपर ८ मध्ये आपले स्थान निश्चित करण्याची चांगली सुवर्णसंधी असणार आहे. त्यांच्या शक्यता स्पष्ट आहेत: जर त्यांनी आज विजय मिळवला तर ते सहा गुणांसह थेट सुपर ८ मध्ये पात्र ठरतील.
श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका टॉस जिंकल्यानंतर म्हणाला की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. स्पर्धेतील सर्वात महत्त्वाच्या सामन्यांपैकी हा एक सामना आहे. आमच्या संघात एक बदल करण्यात अल आहे तो म्हणजे मिश्राऐवजी कुसल परेरा या सामन्यात खेळणार आहे.
तसेच, टॉस गमावणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार मिचेल मार्शने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “ठीक आहे, आज रात्री जायला तयार आहे. हा एक मोठा सामना आहे, प्रत्येक सामना मोठी जबाबदारी घेऊन येत असतो. गेल्या सामन्यात आम्ही आमच्या सर्वोत्तम कामगिरीत नव्हतो. मी, कूपर कॉनोली आणि झेवियर बार्टलेट खेळत आहोत.”
हेही वाचा : AFG vs UAE, T20 World Cup 2026 : रशीद खान टी-20 क्रिकेटचा बॉस! ‘हा’ भीम पराक्रम करत रचला खास इतिहास
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन: पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (डब्ल्यू), पवन रथनायके, दासुन शनाका (क), कामिंदू मेंडिस, दुशन हेमंथा, दुनिथ वेललागे, दुष्मंथा चमीरा, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन: मिचेल मार्श (क), ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, टिम डेव्हिड, जोश इंग्लिस (डब्ल्यू), मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, कूपर कोनोली, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा






