पकिस्ताच्या पराभवानंतर सलमान अली आगाची भन्नाट इंग्रजी! (photo Credit- X)
Bro literally said “Yeah l think wevwevvevvbelieveover” 😂 pic.twitter.com/I8DjgOYLjv — ` (@OxygenKohlii18) February 16, 2026
भारताने दिलेल्या १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ पत्त्यासारखा कोसळला. पूर्ण संघ १८ षटकांत केवळ ११४ धावांवर गारद झाला. कर्णधार सलमान आगा स्वतः बॅटने काहीही कमाल करू शकला नाही, त्याने अवघ्या ४ धावा केल्या. मात्र, सामन्यानंतरच्या सादरीकरणात त्याने जे इंग्रजी उत्तर दिले, ते ऐकून क्रिकेट चाहते हसून हसून बेहाल झाले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, प्रेझेंटर सलमान आगाला सामन्याच्या आकडेवारीबद्दल प्रश्न विचारत आहे. यावर उत्तर देताना सलमान प्रचंड अडखळला. त्याचे ‘Broken English’ ऐकून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेक युजर्सनी “RIP English” अशा कमेंट्स केल्या आहेत, तर एकाने “मैदानावर अपमान झालाच होता, आता इथेही झाला!” असे म्हणत त्याची फिरकी घेतली.
भारताविरुद्धच्या सामन्यात शाहीन आफ्रिदीने फक्त दोन षटके टाकली, ३१ धावा दिल्या आणि फक्त एक बळी घेतला. शादाब खानने फक्त एक षटक टाकले, १७ धावा दिल्या. फलंदाजी विभागात तो फक्त १४ धावा करू शकला. शिवाय, पाकिस्तानी फलंदाजी रांगेतील एक महत्त्वाचा सदस्य बाबर आझम फक्त पाच धावा देऊन स्वस्तात बाद झाला.
टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने भारताविरुद्ध एकूण नऊ सामने खेळले आहेत, परंतु आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकला आहे. भारताने नऊपैकी आठ सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानला फक्त एकदाच विजयाची चव चाखता आली आहे. २०२१ पासून, भारतीय संघाने विश्वचषकात सातत्याने आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्याला पराभूत केले आहे.






