Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल ठरणार; ओबीसी नेते हेमंत पाटील यांचा विश्वास

आज सादर केलेला अर्थसंकल्प विकास, समावेशकता आणि सुशासन यांचा समतोल साधणारा ठरेल, असा विश्वास विश्वास हेमंत पाटील यांनी व्यक्त केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 01, 2026 | 02:28 PM
अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल ठरणार; ओबीसी नेते हेमंत पाटील यांचा विश्वास

अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल ठरणार; ओबीसी नेते हेमंत पाटील यांचा विश्वास

Follow Us
Follow Us:

पुणे : अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज अर्थसंकल्प 2026-27 सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प (२०२६-२७) हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे आणि सबळ, आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेचे प्रभावी प्रतिबिंब असल्याचे मत भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी व्यक्त केले. हा अर्थसंकल्प विकास, समावेशकता आणि सुशासन यांचा समतोल साधणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अर्थसंकल्पातून पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती, कृषी, शिक्षण आणि डिजिटल अर्थव्यवस्था यांवर दिलेला भर विशेष उल्लेखनीय आहे. रस्ते, रेल्वे, लॉजिस्टिक्स आणि शहरी पायाभूत सुविधांसाठी करण्यात आलेल्या मोठ्या तरतुदींमुळे देशाच्या आर्थिक वाढीला गती मिळेल. ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी वाढविणे, सिंचन आणि कृषी मूल्यसाखळी मजबूत करण्यासाठी जाहीर केलेल्या उपाययोजना शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी आशादायी आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

कृषि उत्पादन वाढविण्यासाठी ५०० जलसाठे व “अमृत सरोवर” प्रकल्पाचे समन्वित विकास, मत्स्यपालन आणि पशुधन क्षेत्रातील सुधारणा यांना वित्तीय पाठबळ देण्याची घोषणा केली आहे. देशातील कोट्यवधी शेतकर्यांसाठी ही घोषणा दिलासादायक ठरेल. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी कर्जसुलभता, स्टार्टअप्सना प्रोत्साहन आणि नवोन्मेषासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या घोषणा तरुणांना रोजगार व उद्योजकतेकडे आकर्षित करणाऱ्या आहेत.

शिक्षण, कौशल्य विकास आणि डिजिटल साक्षरतेवरील गुंतवणूक भविष्यातील भारत घडविण्यास मोलाची ठरणार आहे. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने ओबीसी, वंचित आणि दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांना अर्थसंकल्पीय पाठबळ स्वागतार्ह असल्याचे पाटील म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि परिणामकारक प्रशासनाची दिशा अधिक भक्कम होत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प (२०२६-२७) हा केवळ आर्थिक दस्तऐवज नसून, रोजगार, पायाभूत सुविधा,सामाजिक न्यायाचा समतोल साधणारा आणि विकसित भारताच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल आहे, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा : AI आणि नवीन तंत्रज्ञान बनणार भारताच्या विकासाचे इंजिन – निर्मला सीतारमण

Web Title: Obc leader hemant patil has reacted to the budget presented today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • budget 2026
  • Nirmala Sitaraman
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी
1

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी

हर्षवर्धन सपकाळांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल; ‘तिरंग्याचे प्रेम आता जागे झाले, देर आये दुरुस्त आये’
2

हर्षवर्धन सपकाळांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल; ‘तिरंग्याचे प्रेम आता जागे झाले, देर आये दुरुस्त आये’

शरद पवार गटाच्या खासदारांची प्रधानमंत्री मोदींसोबत २० मिनिटे चर्चा; अमोल कोल्हेंनी भेटीचा सगळा तपशीलच सांगितला…
3

शरद पवार गटाच्या खासदारांची प्रधानमंत्री मोदींसोबत २० मिनिटे चर्चा; अमोल कोल्हेंनी भेटीचा सगळा तपशीलच सांगितला…

Russia-India Railway corridor: रशिया ते भारत जमिनीवरून जोडला जाणार व्यापार; पाकिस्तानसह ‘या’ 5 देशांमधून धावणार रेल्वे
4

Russia-India Railway corridor: रशिया ते भारत जमिनीवरून जोडला जाणार व्यापार; पाकिस्तानसह ‘या’ 5 देशांमधून धावणार रेल्वे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.