आयकर कायद्यात सुधारणेसाठी समिती गठीत, तुम्हीही करु शकतात सुचना; वाचा... कशा कराल!
सध्याच्या घडीला आयकर कायद्यातील तरतुदी अनेकांना काहीशा गुंतागुंतीच्या वाटतात. त्यामुळे आता तुम्हांला आयकर कायद्यातील बदल करणे किंवा करदात्यांना कायदा अधिक सोपा आणि सुटसुटीत हवा असेल. तर तुम्हांला आपल्या सूचना केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या कर विभागाला पाठवता येणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने 1961 मध्ये सहा दशकांपूर्वी तयार केलेल्या प्राप्तिकर कायदा 1961 चे पुनरावलोकन करण्यासाठी कलम एक अंतर्गत समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने संबंधितांसह, तज्ञ आणि सामान्य लोकांकडून कायद्यातील बदलासाठी सूचना मागविल्या आहेत.
कर कायद्याचा आढावा
केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने एक परिपत्रक जारी करत त्यात म्हटले आहे की, 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर कायद्याचे पुनरावलोकन करण्याची घोषणा केली होती. अर्थमंत्र्यांच्या या घोषणेनुसार, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आयकर कायदा 1961 च्या संपूर्ण पुनरावलोकनासाठी अंतर्गत समिती स्थापन केली आहे. त्याचा उद्देश कर कायदा लहान, स्पष्ट आणि समजण्यास सोपा बनवणे, विवाद, कायदेशीर बाबी कमी करणे आणि करदात्यांना कर कायद्यामध्ये जास्तीत जास्त निश्चितता आणणे हा आहे.
(फोटो सौजन्य – istock)
हे देखील वाचा – 38 कंपन्या, तब्बल 41 टक्के रिटर्न्स; आयपीओत पैसे गुंतवणारे 6 महिन्यांत मालमाल!
The Hon’ble FM in Budget 2024-25 announced a comprehensive review of the Income-tax Act, 1961 to simplify it for taxpayers, reduce disputes, and ensure greater tax certainty.
CBDT has formed a committee to oversee this review and invites public inputs in following areas:
1️⃣… pic.twitter.com/aIQMQOFYW6— Income Tax India (@IncomeTaxIndia) October 7, 2024
सूचनांसाठी वेबपेज सुरू
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने चार श्रेणींमध्ये लोकांकडून इनपुट आणि सूचना आमंत्रित केल्या आहेत. ज्यात भाषा सुलभ करणे, कायदेशीर विवाद कमी करणे, गुंतागुंत कमी करणे आणि अनावश्यक बनलेल्या अशा तरतुदी दूर करणे समाविष्ट आहे. सूचना देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, प्राप्तिकर ई-फायलिंग पोर्टलवर एक वेबपृष्ठ सुरू करण्यात आले आहे. ज्यात https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/ या लिंकवर प्रवेश केला जाऊ शकतो. आयटीएमध्ये -व्यापक-पुनरावलोकनद्वारे प्रवेश केला जाऊ शकतो.
सर्वसामान्य नागरिकही देऊ शकतात सूचना
वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हितधारक, तज्ञ आणि सामान्य नागरिकांच्या सूचना देण्यासाठी ही लिंक 6 ऑक्टोबर 2024 पासून आयकर ई-फायलिंग पोर्टलवर सुरु असणार आहे. स्टेकहोल्डर्स, तज्ञ आणि सामान्य नागरिक त्यांचे नाव, मोबाईल नंबर आणि ओटीपीद्वारे प्रमाणीकरण देऊन पृष्ठावर प्रवेश करू शकतात.