सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे निवडणूक येत्या 15 जानेवारीला पार पडत असून यासाठी भाजपकडून उमेदवारी देताना गोंधळ निर्माण होत असून, निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आज पर्यंत भाजप वाढवण्यासाठी काम करूनही त्यांना दावल्य जात असल्याचा प्रकार समोर येताना दिसतोय.प्रभाग क्रमांक 11 मध्ये दीपक माने यांनी अनेक वर्षांपासून भाजपसाठी काम केले असून अनेक योजना आणि भाजपाचे कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये त्यांचा पुढाकार होता. आता महापालिका निवडणुकीमध्ये त्यांनी आपल्या पत्नीसाठी ओबीसी महिला गटातून उमेदवारीची मागणी केली आहे. परंतु याकडे दुर्लक्ष करून भाजपा श्रेष्ठींनी नव्याने आलेल्या एका उमेदवाराला उमेदवारी दिल्याची माहिती समोर येताच आज दीपक माने यांनी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात ठिय्या मांडला. या प्रकारामुळे त्यांना या भावना आवरता आल्या नाहीत. बोलता बोलता त्यांना कंठ दाटून आल्याने हुंदका फुटला. जोपर्यंत आमदारांशी भेट होत नाही तोपर्यंत आपण उठणार नसल्याचा त्यांनी निर्णय घेतला.या प्रकारामुळे भाजपामधील अंतर्गत वाद आणि उमेदवारी देण्याबाबतचा गोंधळ समोर आला आहे..
.