सोलापूर महानगरपालिकेत शिवसेना भाजप युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाल्यानंतर आता शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील युतीच्या हालचालींना वेग आला आहे. सोलापुरातील एका नामांकित हॉटेलमध्ये दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक सुरू असून, महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटपावर प्राथमिक एकमत झाले आहे.सोलापूर महानगरपालिकेतील एकूण १०२ जागांपैकी ५० टक्के जागांवर दोन्ही पक्षांनी समान वाटा घेण्यावर सहमती दर्शविले आहे. त्यानुसार शिवसेना (शिंदे गट) ५१ तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ५१ जागांवर निवडणूक लढवणार, अशा फॉर्म्युल्यावर चर्चा सकारात्मक झाली. या बैठकीदरम्यान दोन्ही पक्षांनी महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी संयुक्तपणे रणनीती आखण्यावर भर दिला. स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे, प्रभागनिहाय ताकद, तसेच उमेदवार निवडीबाबत सविस्तर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.या विषयावर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री व शिवसेना नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी युतीबाबत सकारात्मक संकेत दिले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी सोलापूरच्या विकासासाठी सक्षम व स्थिर महापालिका आवश्यक असल्याचे सांगितले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी दोन्ही पक्षांमध्ये चर्चा योग्य दिशेने सुरू असल्याचे स्पष्ट केले.शिवसेना राष्ट्रवादी युती अंतिम झाल्यास सोलापूर महानगरपालिकेच्या राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता असून, आगामी निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.