लॅमॉसाईक इंडियाचा आयपीओ पुढील आठवड्यात खुला होणार; वाचा... कितीये किंमत पट्टा!
भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून आयपीओ मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळत आहे. 2024-25 या आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांचा टप्पा 30 सप्टेंबरला पार पडला. या कालावधीत 38 आयपीओ लिस्ट झाले. या आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना सरासरी 41.8 टक्के परतावा मिळाला आहे. एसएमई आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सहा महिन्यात 92 टक्के परतावा मिळाला आहे.
गुंतवणूकदारांना दमदार परतावा
आयपीओमधून गुंतवणूकदारांना मिळालेल्या परताव्यात 1 एप्रिल 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीच्या तुलनेत 1 एप्रिल 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या दरम्यान 34 टक्क्यांची वाढ झाली आहे. 38 आयपीओपैकी 30 आयपीओतून गुंतवणूकदारांना 10 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा मिळाला आहे.
काही दिवसांपूर्वी बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ लिस्ट झाला या आयपीओमध्ये एका शेअरची किंमत 70 रुपये निश्चित करण्यात आली होती. बजाजचा आयपीओ लिस्ट 150 रुपयांनी झाला. त्यामुळे गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा मिळाला. बजाज हाऊसिंगच्या गुंतवणूकदारांना लिस्टिंगच्या दिवशी तब्बल 136 टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला.
30 सप्टेंबरच्या आकडेवारी नुसार यूनिकॉमर्स ई सोल्यूशन्स, प्रिमियम एनर्जीज च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 87 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. प्राईम डाटाबेस ग्रुपच्या रिपोर्टनुसार 38 आयपीओमधून गुंतवणूकदारांना 48 टक्के परतावा मिळाला आहे. 38 आयपीओच्या आयपीओपैकी 35 आयपीओंना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. 35 आयपीओ 10 पटींहून अधिक सबस्क्राईब झाले. त्यापैकी 17 आयपीओ 50 पटींहून अधिक सबस्क्राईब झाले.
ह्युंदाई, स्वीगीसह बड्या कंपन्यांचे आयपीओ येणार
भारताच्या शेअर बाजारात आयपीओत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नुकत्याच लिस्ट झालेल्या केआरएन हीट एक्सेंजर कंपनीच्या आयपीओला 212 पट सबस्क्राईब करण्यात आले होते. या आयपीओत गुंतवणूक करणाऱ्यांना देखील दमदार परतावा मिळावा. सेबीने गेल्या काही दिवसांमध्ये विविध कंपन्यांना आयपीओ लिस्टींगसाठी मंजुरी दिली आहे.
ह्युंदाई या कार निर्मिती क्षेत्रातील दक्षिण कोरियातील कंपनीच्या भारतातील यूनिटचा आयपीओ लवकरच येणार आहे. ह्युंदाईचा आयपीओ तब्बल 25 हजार कोटी रुपयांचा असणार आहे. ह्युंदाई कंपनीसह स्विगी, ओयो, एनटीपीसी ग्रीन या कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. या कंपन्यांच्या लिस्टिंगच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. बजाज हायऊसिंग फायनान्स, पीएनजी ज्वेलर्स, प्रीमियम एनर्जीज, यूनिकॉमर्स ई सोल्यूशन्स, केआरएन हीट एक्सेंजर्सच्या आयपीओला मिळालेला दमदार प्रतिसाद पाहता गुंतवणूकदार आगामी आयपीओमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करु शकतात.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)