Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cheap Onion Scheme : सरकारची मोठी घोषणा! ‘या’ 5 शहरांत 35 रुपये किलोने मिळणार कांदा? लिस्टमध्ये तुमचं शहर आहे का?

Cheap Onion Scheme : बाजारात कांद्याचे भाव वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडलं आहे. यासगळ्या परिस्थितीत केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सरकारने ५ प्रमुख शहरांमध्ये ३५ रुपये प्रति किलो या दराने कांदा विक्री करण्याची घोषणा केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 25, 2026 | 01:50 PM
देशभरात कांद्याचे भाव वाढत असतानाच तब्बल 36 हजार टन कांदा सडला गोदामात; अनेक शहरांत तुटवड्याचे गंभीर संकट

देशभरात कांद्याचे भाव वाढत असतानाच तब्बल 36 हजार टन कांदा सडला गोदामात; अनेक शहरांत तुटवड्याचे गंभीर संकट

Follow Us
Follow Us:
  • सरकारची मोठी घोषणा!
  • 5 शहरांत 35 रुपये किलोने मिळणार कांदा?
  • लिस्टमध्ये तुमचं शहर आहे का?
Cheap Onion Scheme : भारतात सणासुदीचा काळ म्हणजे जल्लोषाचा काळ असतो. याकाळात सगळ्यांच्या घरी सोहळा साजरा केला जातो. पण सध्या महागाईने डोकं वर केलं आहे. साखरेसह रोजच्या जीवनातील जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहेत. त्यात स्वयंपाक घरातील कांद्याचा दर तर गगनाला भिडला आहे. असं असताना लाखो भारतीय कुटुंबासाठी कांद्याच्या वाढत्या किमतींकडे दुर्लक्ष करणं कठीणच नाही तर अशक्य आहे. ( Cheap Onion Scheme ) 

MakeMyTrip Axis Bank Offer : फिरण्याचा प्लॅन करताय? मेकमायट्रिप अन् ॲक्सिस बँक देतंय मोठं डिस्काउंट, मिळणार बंपर सूट

देशभरातील कांद्यांच्या भावावाढीला आळा घालण्यासाठी आता सरकार प्रयत्न करत आहे. देशभरातील कांद्याच्या भाववाढीला आळा घालण्यासाठी, सरकारने आपला राखीव साठा विशेष रेल्वे डब्यांद्वारे अशा शहरांना पाठवण्यास सुरुवात केली आहे जिथे ग्राहकांना जास्त किंमत मोजावी लागत आहेत. या मोहिमेला सरकारने कांदाएक्सप्रेस असं नाव दिलं आहे. 

कोणत्या शहरांमध्ये पाठवण्यात येतोय कांदा?

ग्राहक व्यवहारासंबंधित सचिव निधी खरे यांनी स्पष्ट केलं की, कांदा सुरुवातीला जास्त खप असलेल्या पाच प्रमुख शहरांमध्ये पाठवला जात आहे, जिथे तो ₹३५ प्रति किलो या सवलतीच्या दराने विकला जाईल. सध्या ‘कांदा एक्सप्रेस’मध्ये भरण्यात येत असलेला हा माल बुधवार, २६ ऑगस्टपर्यंत निश्चित केलेल्या बाजारपेठांमध्ये पोहोचण्याची अपेक्षा आहे.

‘कांदा एक्सप्रेस’च्या पहिल्या टप्प्यात ही ५ शहरं

दिल्ली / NCR
चेन्नई
मदुराई
एर्नाकुलम / कोची
गुवाहाटी

ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून आलेल्या माहितीनुसार, या शहरांमध्ये कांद्याचे दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या वाढले आहेत. विभागाच्या म्हणण्यानुसार, बुधवारपर्यंत रेल्वेगाड्या या शहरांमध्ये पोहोचतील, त्यानंतर बाजारपेठेच्या गरजेनुसार कोलकाता आणि लखनौसारख्या इतर शहरांचाही समावेश केला जाण्याची शक्यता आहे. यातून सरकारच्या कांदा एक्सप्रेसला सुरुवात होणार आहे.

तुम्हाला कुठे मिळणार 35 रुपये किलो कांदा?

बाजारातील किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी या कांद्याचा वापर केला जात आहे. यासाठी हा कांदा बफर स्टॉकमधून काढून प्रामुख्याने या दोन सहकारी संस्थांच्या मोबाईल व्हॅन आणि आउटलेटद्वारे किरकोळ स्तरावर ग्राहकांना विकला जाणार आहे.

NCCF (नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया)
NAFED (नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया)

सरकार ३५ रुपयांनी किलो कांदा का विकतंय?

देशभरात कांद्याच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीनंतर केंद्र सरकार ही परिस्थिती कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. सोमवार, २४ ऑगस्ट रोजी, देशभरात कांद्याचा सरासरी किरकोळ भाव गेल्या वर्षीच्या २७.३७ रुपयांच्या तुलनेत ४३.५३ रुपये प्रति किलोवर पोहोचला. ही वर्षभरात ५९% पेक्षा जास्त दरवाढ दर्शवते. सरासरी घाऊक भावातही वार्षिक ६८% वाढ होऊन तो ३५.५८ रुपये प्रति किलो इतका पोहोचला आहे.

दिल्ली आणि चेन्नईसारख्या काही प्रमुख शहरांतील किरकोळ बाजारांमध्ये कांदा ५५ ते 65 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. कोलकातामध्येही भाव ₹५३ प्रति किलो आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमधील सणासुदीची मागणी आणि हवामानामुळे होणारी भाववाढ रोखण्यासाठी, सरकारने १.२१ लाख टन कांद्याचा बफर साठा ठेवला आहे, जो टप्प्याटप्प्याने वितरित केला जात आहे.

Gold Price Hike : साडेतीन महिन्यांच्या उच्चांकावर सोनं! तेजी कायम राहण्याची शक्यता, ऐन सणासुदीच्या तोंडावर भाव आणखी वाढणार?

Web Title: Cheap onion scheme government announces sale at 35 rupees per kg in 5 cities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • onion
  • onion export
  • Price Hike

संबंधित बातम्या

Gold Silver दर आणखी कडाडणार? GST दरांबाबत होणार मोठा निर्णय;  काय नेमकं संपूर्ण प्रकरण?
1

Gold Silver दर आणखी कडाडणार? GST दरांबाबत होणार मोठा निर्णय; काय नेमकं संपूर्ण प्रकरण?

CNG PNG Price Hike : आता CNG, PNG देखील महागणार… सरकारने नैसर्गिक वायूचे दर वाढवले! खिशावर किती पडणार भार?
2

CNG PNG Price Hike : आता CNG, PNG देखील महागणार… सरकारने नैसर्गिक वायूचे दर वाढवले! खिशावर किती पडणार भार?

Hair Care Tips: महागड्या ट्रिटमेंटपेक्षा केसांच्या वाढीसाठी ‘या’ पद्धतीने करा कांद्याचा वापर, केसांची होईल झपाट्याने वाढ
3

Hair Care Tips: महागड्या ट्रिटमेंटपेक्षा केसांच्या वाढीसाठी ‘या’ पद्धतीने करा कांद्याचा वापर, केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.