
महागड्या ट्रिटमेंटपेक्षा केसांच्या वाढीसाठी 'या' पद्धतीने करा कांद्याचा वापर, केसांची होईल झपाट्याने वाढ
Hair Care Tips: केसांच्या वाढीसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी हेअर मास्क लावला जातो तर कधी हेअर केअर रुटीन फॉलो करून केसांची काळजी घेतली जाते. काहीवेळा केस खूप जास्त कोरडे झाल्यानंतर ते मऊ होण्यासाठी बाजारातील वेगवेगळ्या हेअर ट्रीटमेंट केल्या जातात. पण हेअर ट्रीटमेंट केल्यामुळे काही काळापुरतेच केस अतिशय सुंदर दिसतात. पण महिनाभरानंतर केस पुन्हा एकदा कोरडे आणि रुक्ष होतात. केसांच्या समस्या वाढल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी योग्य ते उपचार करून केसांची काळजी घ्यावी. महागड्या केअर ऑइल, केमिकलयुक्त सिरमचा वापर केल्यामुळे केस तात्पुरते सुंदर दिसतात. पण पुन्हा एकदा केस होते तसेच होऊन जातात.
केसांच्या वाढीसाठी कायमच महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे केसांची गुणवत्ता सुधारते आणि केस मजबूत होतात. आज आम्ही तुम्हाला केसांसाठी कांद्याच्या रसाचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. कांद्याचा वापर जेवणातील विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. चवीसाठी खाल्ला जाणारा कांदा केस, आरोग्य आणि त्वचेसाठी सुद्धा खूप जास्त गुणकारी ठरतो. कांद्याच्या वापरामुळे केस घनदाट आणि मजबूत होतात. चला तर जाणून घेऊया कांद्याचा वापर करण्याची सोपी पद्धत.
पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सर्वच महिलांसह पुरुष सुद्धा केसांना नियमित खोबरेल तेल लावतात. खोबरेल तेल लावल्यामुळे केसांना आवश्यक पोषण मिळते आणि केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारते. टाळूवर वाढलेला कोंडा, जळजळ आणि इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी कोरफड जेल केसांवर लावावे. केसांना कांद्याचा रस लावल्यानंतर हलक्या हाताने टाळूवर मसाज करावा.मसाज केल्यामुळे केसांचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते आणि टाळू स्वच्छ होते.