Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Education Allowance : शिक्षणासाठी सरकार देतंय 33750 वार्षिक भत्ता! तुमचीही मुलं घेऊ शकता का लाभ? जाणून घ्या सविस्तर

केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी बाल शिक्षण भत्ता म्हणजेच Children Education Allowance देते. या भत्त्याच्या नियमांविषयी कर्मचाऱ्यांमध्ये बराच संभ्रम पहायला मिळतो.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 10, 2026 | 02:27 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Children Education Allowance हा सर्वात फायदेशीर भत्ता
  • बाल शिक्षण भत्त्याचा सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी
  • कोणते विद्यार्थी CEA साठी पात्र ठरु शकतात
Children Education Allowance  : केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी बाल शिक्षण भत्ता म्हणजेच Children Education Allowance (CEA) देते. या भत्त्याच्या नियमांविषयी कर्मचाऱ्यांमध्ये बराच संभ्रम पहायला मिळतो. त्यामुळे यावर सरकारने स्पष्टीकरण जारी केलं आहे. सरकारने प्रतिपूर्तीच्या दाव्यांसंदर्भात कर्मचाऱ्यांच्या मनात असलेल्या अनेक शंकांचे निरसन केले आहे. बाल शिक्षण भत्त्याचा मुख्य उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांच्या शालेय खर्चासाठी, ज्यामध्ये पुस्तके, गणवेश आणि वसतिगृहाचा खर्च समाविष्ट आहे, आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे. हा लाभ कुटुंबातील दोन ज्येष्ठ मुलांपुरता मर्यादित आहे. तथापि, दुसऱ्या जन्मात जुळे किंवा त्याहून अधिक मुले झाल्यास, सरकार हा लाभ त्या सर्व मुलांना देते. पण या योजनेचे नियम नेमके काय आहेत समजून घेऊयात

Stock Market Today: शेअर बाजारात घसरणीनंतर पुन्हा उसळीचे संकेत, जाणून घ्या कोणते शेअर्स ठरणार फायद्याचे

योजनेअंतर्गत किती पैसे मिळतात?

बाल शिक्षण भत्त्याअंतर्गत, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना प्रति बालक दरमहा ₹२,८१२.५ रुपये देतं. ही रक्कम प्रति बालक वार्षिक ₹३३,७५० इतकी होते. घरापासून दूर वसतिगृहांमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी, सरकार दरमहा ₹८,४३७.५ चे वसतिगृह अनुदान देखील देते. विशेष म्हणजे, ही रक्कम कर्मचाऱ्याने आपल्या मुलांच्या फीसाठी भरलेली प्रत्यक्ष रक्कम नाही आहे. रक्कम काहीही असली तरीही केंद्र सरकार केवळ ₹२,८१२.५० देईल .

कोणते विद्यार्थी CEA साठी पात्र ठरु शकतात

चिल्ड्रन एजुकेशन अलाउंसचा लाभ घेण्यासाठी, काही मूलभूत अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे
वयोमर्यादा: सर्वसाधारण मुलांसाठी कमाल वयोमर्यादा २१ वर्षांपेक्षा कमी असावी, तर दिव्यांग मुलांसाठी ही मर्यादा २२ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
शैक्षणिक स्तर: हा लाभ नर्सरी ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणार आहे. याव्यतिरिक्त, इयत्ता १२ वी नंतर केलेल्या कोणत्याही डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या पहिल्या दोन वर्षांसाठी देखील याचा दावा केला जाऊ शकतो.
शिक्षण पद्धत: जर मूल जर दूरस्थ शिक्षण पद्धतीने शिकत असेल, तर कर्मचारी देखील या भत्त्यासाठी पात्र आहे.

शाळा मान्यताप्राप्त असली पाहिजे

पैसे मिळवण्यासाठी, मुलाची पात्रता असणे पुरेसे नाही, तर शाळादेखील मान्यताप्राप्त असणे आवश्यक आहे. ही संस्था केंद्र किंवा राज्य सरकार, सीबीएसई, आयसीएसई किंवा इतर कोणत्याही अधिकृत मंडळाशी संलग्न असणं आवश्यक आहे.

या भत्त्यासाठी क्लेम कसा करावा?

बाल शिक्षण भत्ता आर्थिक वर्ष संपल्यानंतर दिला जातो. तुम्हाला शाळेच्या मुख्याध्यापकांनी किंवा प्रमुखांनी दिलेले एक साधे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. या प्रमाणपत्रात, तुमचे मूल त्या विशिष्ट शैक्षणिक वर्षात संस्थेचे नियमित विद्यार्थी होते, असे स्पष्टपणे नमूद केलेले असावे. त्यामुळे या साधारण अटींची पुर्तता होत असेल तर तुमचं मुलं या भत्ता योजनेसाठी पात्र ठरु शकतं. त्यामुळे तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आता क्लेम करा.

मोठी बातमी! मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा सर्वात मोठा अडथळा दूर, समुद्रात 7 किलोमीटर खोल बनणार बोगदा

Web Title: Children education allowance rules for central government employees marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • Business News
  • Central Government Employees
  • Government Employees
  • Govt Scheme
  • Marathi News

संबंधित बातम्या

Solapur News :सोलापुरात मोठा उद्योग आणणार; तरुणांचे स्थलांतर थांबविण्याचे उदय सामंत यांचे आश्वासन
1

Solapur News :सोलापुरात मोठा उद्योग आणणार; तरुणांचे स्थलांतर थांबविण्याचे उदय सामंत यांचे आश्वासन

Solapur News :१६० हरकतींवर मंगळवारी सुनावणी; तीन तालुक्यांतील संस्थांवर प्रशासनाची नजर
2

Solapur News :१६० हरकतींवर मंगळवारी सुनावणी; तीन तालुक्यांतील संस्थांवर प्रशासनाची नजर

Hollywood News :$81 अब्जचा सौदा; Paramount- Warner Bros. एकत्र, Skydanceचा दबदबा
3

Hollywood News :$81 अब्जचा सौदा; Paramount- Warner Bros. एकत्र, Skydanceचा दबदबा

Maharashtra News :भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश
4

Maharashtra News :भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.