Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cooperative Banks Role : आर्थिक मंदी असो वा जागतिक संकट, सहकारी बँकांवर विश्वास का? तन्वीर इनामदार यांनी स्पष्ट केली कारणे

Cooperative Banks Role : जागतिकीकरणामुळे जगभरात निर्माण होणाऱ्या आर्थिक, राजकीय किंवा सामाजिक संकटांचे पडसाद वित्तीय बाजारावर उमटतात. अशा अनिश्चिततेच्या काळात 'सहकारी बँका' या प्रत्येक हवामानात आधार देणारी 'ऑल-वेदर सेफ्टी नेट' ठरतात, असे प्रतिपादन एमबँकेचे अध्यक्ष तन्वीर इनामदार यांनी केले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 10, 2026 | 07:09 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आर्थिक मंदी असो वा जागतिक संकट
  • सहकारी बँकांवर विश्वास का?
  • तन्वीर इनामदार यांनी स्पष्ट केली कारणे
Cooperative Banks Role In Crisis :  जागतिकीकरणामुळे आज विविध देशांच्या अर्थव्यवस्था आणि बाजारपेठा एकमेकांशी घट्ट जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे जगाच्या एका भागात घडणाऱ्या महत्त्वपूर्ण राजकीय, आर्थिक किंवा सामाजिक घटनांचे परिणाम इतर देशांवरही दिसून येतात. फ्रान्ससारख्या देशात घडलेल्या एखाद्या मोठ्या घटनेचे पडसाद भारतासह जगातील इतर अर्थव्यवस्थांवर आणि विशेषतः वित्तीय बाजारपेठांवर उमटू शकतात. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. ( Cooperative Banks Role )

२००८ मधील जागतिक आर्थिक संकट, २०२३ मधील लाल समुद्रातील संघर्ष आणि सध्या सुरू असलेला इराणमधील संघर्ष यांचा आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा आर्थिक संकटाचा काळ येतो तेव्हा त्या काळात सहकारी बँकांची भूमिका  नेमकी कशी बदलत जाते, याबाबत एमबँकेचे अध्यक्ष तन्वीर इनामदार यांनी सविस्तर आणि विस्तृत माहिती दिली आहे.

Transrail Q1 Results : ट्रान्सरेल लाइटिंग कंपनीचा आर्थिक धमाका! पहिल्या तिमाहीत 1736 कोटींचा महसूल; नफ्यात 3 टक्क्यांची वाढ

सर्वाधिक परिणाम  बँकिंग आणि वित्तीय क्षेत्र

त्यांनी स्पष्ट केलं की ज्या पद्धती बदलत जाते त्यावेळी परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक म्हणजे बँकिंग आणि वित्तीय क्षेत्र. विशेषतः २००८ चे जागतिक आर्थिक संकट हे बँकिंग व्यवस्थेला थेट हादरा देणारे ठरले. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडल्यास आपला पैसा कितपत सुरक्षित राहील, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो.

सहकारी बँका या विश्वासार्ह वित्तीय भागीदाराच्या भूमिकेत

मात्र, २००८ च्या आर्थिक संकटाने एक महत्त्वाची बाब अधोरेखित केली – आर्थिक परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल, सहकारी बँका या विश्वासार्ह वित्तीय भागीदाराची भूमिका बजावू शकतात. २००८ च्या संकटादरम्यान जगभरातील सहकारी बँकांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) कर्जपुरवठा सुरू ठेवला आणि अर्थव्यवस्थेतील पतप्रवाह कायम ठेवण्यास मदत केली. त्याच काळात पारंपरिक बँकांनी कर्जपुरवठा कमी केला आणि अनेक पतमर्यादा आकुंचित केल्या. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (ILO) २०१३ मधील अहवालानुसार, २००८ च्या आर्थिक संकटादरम्यान आणि त्यानंतरही सहकारी बँकांची आर्थिक स्थिरता संकटापूर्वीच्या काळाइतकीच मजबूत राहिली.

रचना, उद्दिष्टे पारंपरिक नफाकेंद्री बँकिंग मॉडेलपेक्षा वेगळी

पण असे का घडते? सहकारी बँकांची कार्यपद्धती इतर बँकांपेक्षा वेगळी कशी आहे आणि आर्थिक परिस्थिती कितीही कठीण झाली तरी त्या आपली भूमिका कशी कायम ठेवतात? यातील पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नफा सहकारी बँकांच्या कार्यपद्धतीचा एकमेव केंद्रबिंदू नसतो. सहकारी बँका या त्यांच्या सदस्यांच्या मालकीच्या असतात. त्यामुळे त्यांची रचना आणि उद्दिष्टे पारंपरिक नफाकेंद्री बँकिंग मॉडेलपेक्षा वेगळी असतात. या सहकारी मालकीच्या रचनेमुळे भांडवली आधार मजबूत ठेवण्यास मदत होते आणि अत्याधिक जोखीम घेण्याची गरज कमी होते.

कर्जपुरवठ्याबाबत विशिष्ट नियामक चौकट निश्चित

आता भारतीय संदर्भाकडे पाहिले, तर सहकारी बँकांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) कर्जवाटप, कर्जदारांचे क्षेत्र आणि प्राधान्य क्षेत्रांना होणाऱ्या कर्जपुरवठ्याबाबत विशिष्ट नियामक चौकट निश्चित केली आहे. या नियमांमुळे सहकारी बँकांना अर्थव्यवस्थेतील तुलनेने अधिक असुरक्षित आणि पारंपरिक बँकिंग व्यवस्थेकडून कमी सेवा मिळणाऱ्या क्षेत्रांना कर्जपुरवठा करण्यावर भर द्यावा लागतो. यामध्ये शेती, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSMEs) यांसारख्या क्षेत्रांचा समावेश होतो.

स्थानिक अर्थव्यवस्थेशी असलेला जवळचा संबंध

भारतीय सहकारी बँकिंग व्यवस्थेची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे तिचा स्थानिक अर्थव्यवस्थेशी असलेला जवळचा संबंध. त्यामुळे आर्थिक मंदी किंवा अनिश्चिततेच्या काळातही स्थानिक व्यवसाय, उद्योजक आणि सामान्य ग्राहकांच्या आर्थिक गरजा समजून घेऊन त्यांना आवश्यक असलेला पतपुरवठा सुरू ठेवण्याची क्षमता या बँकांमध्ये असते. आणि म्हणूनच भारतीय संदर्भात सहकारी बँका ‘ऑल-वेदर सेफ्टी नेट’ अर्थात प्रत्येक आर्थिक परिस्थितीत आधार देणारी वित्तीय व्यवस्था म्हणून महत्त्वाची ठरतात.

सहकारी बँकिंग व्यवस्थेची खरी ताकद

अर्थव्यवस्थेवर कोणत्याही क्षेत्राचा परिणाम झाला, उद्योगांसमोर आव्हाने उभी राहिली किंवा सामान्य नागरिकांसाठी आर्थिक परिस्थिती कठीण झाली, तरी स्थानिक गरजा, विश्वास आणि वित्तीय समावेशन यांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या सहकारी बँका अर्थव्यवस्थेतील पतप्रवाह कायम ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. आर्थिक स्थैर्य केवळ मोठ्या वित्तीय संस्थांमधून निर्माण होत नाही; ते स्थानिक पातळीवर विश्वासाने उभ्या राहिलेल्या वित्तीय संस्थांमधूनही निर्माण होते. हीच सहकारी बँकिंग व्यवस्थेची खरी ताकद आहे.

Meesho Fraud Case : Meesho वरुन खरेदी करताय? आताच सावध व्हा! उच्च न्यायालयाचे कंपनीला कडक निर्देश, पाहा काय आहेत आदेश?

Web Title: Cooperative banks role during economic crisis tanveer inamdar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 07:09 PM

Topics:  

  • Bank
  • Business News
  • financial crisis
  • Marathi News

संबंधित बातम्या

Phulwara Marathi Movie: रवी जाधवांच्या दिग्दर्शनात खुलणार ‘फुलवरा’! ‘या’ तारखेपासून मराठी लावणीचा रंगणार जल्लोष
1

Phulwara Marathi Movie: रवी जाधवांच्या दिग्दर्शनात खुलणार ‘फुलवरा’! ‘या’ तारखेपासून मराठी लावणीचा रंगणार जल्लोष

Trump vs Media : ‘दरवाजा बंद केला? मग कोर्टात भेटू!’ CNN-MSNOW-Politicoचा ट्रम्प प्रशासनाला झटका
2

Trump vs Media : ‘दरवाजा बंद केला? मग कोर्टात भेटू!’ CNN-MSNOW-Politicoचा ट्रम्प प्रशासनाला झटका

Wi-Fi Not Working?  Wi-Fi कनेक्ट होत नाहीये? फक्त 5 मिनिटांत समस्या सोडवा, ‘या’ 10 ट्रिक्स नक्की करून पाहा
3

Wi-Fi Not Working? Wi-Fi कनेक्ट होत नाहीये? फक्त 5 मिनिटांत समस्या सोडवा, ‘या’ 10 ट्रिक्स नक्की करून पाहा

world News:आता फक्त वाट बघायची ,हल्ला झाला कि तिप्पट रिटर्न गिफ्ट मिळणार ;इराणची सूचना
4

world News:आता फक्त वाट बघायची ,हल्ला झाला कि तिप्पट रिटर्न गिफ्ट मिळणार ;इराणची सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.