
Delhi Mega Rally (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
रविवारी 1 नोव्हेंबरला दिल्लीच्या रामलीला मैदानावर इंडिया ब्लॉकची मोठी मेगा रॅली झाली. विरोधी पक्षांनी शक्तिप्रदर्शन केलं. या रॅलीसाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. आजूबाजूचे सगळे रस्ते बंद केले होते. त्याचा फटका थेट व्यापाऱ्यांना बसला. सणासुदीच्या तोंडावर बाजार बंद ठेवावे लागल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री म्हणजे CTI ने केला आहे.
CTI चं म्हणणं आहे की, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रॅलीमुळे दिल्लीतील व्यापारी, कारखानदार आणि दुकानदारांचे मिळून 11,000 कोटी रुपयांचे नुकसान झालंय. आता या नुकसानीची भरपाई कोण देणार असा सवाल त्यांनी विचारलाय. Delhi Mega Rally:
CTI ने सांगितलं की आम्ही राहुल गांधींना आधीच चारवेळा पत्र लिहिलं होतं. दिवाळी जवळ आली आहे, कृपया रॅली दिवाळीनंतर घ्या अशी विनंती केली होती. सोनिया गांधींना पण पत्र लिहिलं होतं. व्यवसायाचं नुकसान होईल असं सांगितलं होतं. पण राहुल गांधी म्हणाले होते की आम्ही व्यापाऱ्यांसोबत आहोत, या रॅलीचा कोणत्याही दुकानदारावर परिणाम होणार नाही. पण प्रत्यक्षात झालं उलटंच 11,000 कोटींचं नुकसान कसं झालं?
CTI चे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी सोमवारी 2 नोव्हेंबरला सांगितलं की, एका दिवसात 11,000 कोटींचा फटका बसलाय.त्यांनी हिशोब पण दिला. किरकोळ आणि घाऊक व्यापाराचं 8,800 कोटींचं नुकसान, वाहतूक आणि लॉजिस्टिक्सचं 1,500 कोटींचं नुकसान, हॉटेल, रेस्टॉरंट आणि पर्यटनाचं 500 कोटींचं नुकसान आणि असंघटित क्षेत्रात काम करणारे रोजंदारी मजूर, त्यांचं 200 कोटींचं नुकसान.
रामलीला मैदानाच्या 5 किलोमीटर परिसरात असलेली अडीच लाखांपेक्षा जास्त छोटी-मोठी दुकाने पूर्णपणे बंद होती. CTI च्या रिपोर्टनुसार कश्मिरी गेट, मोरी गेट, चांदनी चौक, चावडी बाजार, खारी बावली, नया बाजार, सदर बाजार, अजमेरी गेट, दर्यागंज, पहाडगंज, कमला मार्केट, जामा मशिद, भागीरथ पॅलेस, लाजपत राय मार्केट, किनारी बाजार या भागात मिळून जवळपास 3 लाख दुकाने आहेत. त्यातली अडीच लाख दुकाने बंद राहिली, 80% धंदा ठप्प झाला.
Reliance Share Price Jumps: निकालांचा धमाका अन् शेअरचा ठसका! रिलायन्सची बाजारात ८ टक्क्यांची भरारी
आता धनत्रयोदशी 6 नोव्हेंबरला आहे आणि दिवाळी 8 नोव्हेंबरला आहे. ऐन सीझन सुरू आहे. लोक खरेदीसाठी येणार होते, पण रॅलीमुळे ग्राहक बाजारात पोहोचूच शकले नाहीत. 10 किलोमीटरच्या परिसरात सगळी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे मालाची आवक-जावक पण थांबली.
कनॉट प्लेस, करोल बाग, पहाडगंज, चांदनी चौक, दर्यागंज इथली 2,000 पेक्षा जास्त हॉटेल्स, रेस्टॉरंट, गेस्ट हाऊस यांची बुकिंग रद्द झाली. रविवार असल्याने सहसा लाल किल्ला, जामा मशिद, चांदनी चौकला पर्यटक येतात, पण रॅलीमुळे कोणी आलंच नाही.या बाजारात काम करणाऱ्या 20 लाख कामगारांवर थेट परिणाम झालाय. दुकानं बंद असल्याने लोडर, ऑटो-रिक्षा वाले, फेरीवाले, हमाल, कुली यांची एक दिवसाची मजुरी बुडाली.आम्ही भाजपचे एजंट नाही, आम्ही व्यापारी आहोत या नुकसानीमुळे व्यापारी खूप संतापले आहेत.
Share Market Update: जागतिक बाजारात घसरणीचा हाहाकार, सेन्सेक्सची मात्र 1000 अंकांची भरारी
ब्रिजेश गोयल म्हणाले, “आम्हाला भाजपचे एजंट म्हणत आहेत. 100 मोठ्या बाजार संघटनांनी काँग्रेसला रॅली पुढे ढकला म्हणून सांगितलं होतं. हे कोणी पक्षाचे एजंट नाहीत, हे दिल्लीचे व्यापारी आहेत. आमचा धंदा हाच आमचा पक्ष आहे, राजकारण नाही. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही, पण सणाच्या तोंडावर असं करून आमचं नुकसान करू नका.”
Ans: रामलीला मैदानाच्या आसपासच्या परिसरातील अडीच लाखांहून अधिक दुकाने बंद होती.
Ans: दिल्लीतील रामलीला मैदानावर 1 नोव्हेंबरला इंडिया ब्लॉकची मेगा रॅली झाली.
Ans: किरकोळ आणि घाऊक व्यापाराचे सर्वाधिक 8,800 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा CTI चा दावा आहे.