फोटो सौजन्य - Social Media
भारतीय दागिने उद्योगात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि पारंपरिक कौशल्य यांचा सुंदर मेळ घालणारा ‘डायमॉन्टे’ हा नवा लक्झरी ज्वेलरी ब्रँड बाजारात दाखल झाला आहे. कॅरेटेक्स जोवेला प्रायव्हेट लिमिटेडच्या या ब्रँडने ‘ग्रीन लक्झरी’ची संकल्पना साकारत एआयच्या मदतीने डिझाइन केलेल्या दागिन्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
ब्रँडने आपल्या प्रवासाची सुरुवात ‘टॅलिस्मन’ या खास पेंडंट कलेक्शनद्वारे केली आहे. संरक्षण, सामर्थ्य आणि सकारात्मकतेचे प्रतीक असलेल्या संकल्पनांवर आधारित हे कलेक्शन आधुनिक जीवनशैली आणि फॅशनचा विचार करून तयार करण्यात आले आहे. १४ ते १८ कॅरेट सोन्यात घडवलेल्या या दागिन्यांमध्ये आयजीआय-प्रमाणित लॅब-ग्रोन हिऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
‘टॅलिस्मन’ कलेक्शनची किंमत ३० हजार रुपयांपासून सुरू होते. पर्यावरणाची जाणीव ठेवून लक्झरीचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या नव्या पिढीच्या ग्राहकांना लक्षात घेऊन हे कलेक्शन बाजारात आणण्यात आले आहे. ब्रँडच्या दृष्टीने प्रत्येक दागिना हा केवळ सौंदर्यवर्धक वस्तू नसून वैयक्तिक ओळख आणि भावनांचा अविभाज्य भाग आहे.
डायमॉन्टेची आणखी एक खासियत म्हणजे सीव्हीडी तंत्रज्ञानातून तयार करण्यात आलेले ‘टाईप २-ए’ दर्जाचे हिरे. लॅब-ग्रोन हिऱ्यांच्या श्रेणीत हे हिरे अत्यंत उच्च दर्जाचे मानले जातात आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून त्यांना मोठी पसंती मिळत आहे.
ब्रँडचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सनी कुमार सिंह यांच्या मते, एआयमुळे सर्जनशील आणि अनोख्या डिझाइन्स साकारता येतात, मात्र प्रत्येक दागिन्यामागील खरी कलाकुसर आणि भावनिक स्पर्श कारागिरांच्या हातातूनच येतो. अधिक जबाबदार आणि शाश्वत लक्झरीचा पर्याय ग्राहकांसमोर ठेवणे हेच कंपनीचे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या डायमॉन्टे हा डिजिटल-फर्स्ट मॉडेलवर कार्यरत असून, सर्व दागिने आयजीआय प्रमाणित आणि बीआयएस हॉलमार्कयुक्त आहेत. ग्राहकांना अधिक विश्वास आणि सुविधा देण्यासाठी एक्सचेंज तसेच बायबॅकची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.






