
EPFO New PF Withdrawal Rules: PF मधून पैसे काढायचेत? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
नवीन नियमानुसार तुम्ही कंपनीत 12 महिने म्हणजे एक वर्ष पूर्ण केलं की तुम्ही PF मधून अडव्हान्स काढू शकता. आधी यासाठी जास्त वाट पाहावी लागत होती.तुमच्या PF अकाउंटमध्ये दोन प्रकारचे पैसे जमा होतात, एक तुमचा वाटा आणि दुसरा कंपनीचा वाटा, त्यावर व्याज पण मिळतं. या सगळ्या मिळून जी रक्कम जमा झाली असेल त्याच्या 75% रक्कम तुम्ही अडव्हान्स म्हणून काढू शकता. म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये 4 लाख असतील तर तुम्ही 3 लाखापर्यंत पैसे काढू शकता. हा आकडा काही कमी नाही.
EPFO ने गरजांचे तीन चार प्रकार केले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजारपण. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातलं कोणी आजारी असेल तर तुम्ही उपचारासाठी PF मधून पैसे काढू शकता. याला काही लिमिट नाहीये. तुम्ही कितीही वेळा पैसे काढू शकता. कारण आजारपण कधीही सांगून येत नाही.
मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी दुसरा प्रकार आहे शिक्षण आणि लग्न. मुलांची फी, कॉलेजची फी भरायची असेल तर तुम्ही नोकरीत असताना जास्तीत जास्त 10 वेळा PF मधून पैसे काढू शकता. म्हणजे प्रत्येक वर्षी फी भरायला पैसे लागले तरी काढता येतील.घरात लग्न असेल तर 5 वेळा पैसे काढता येतात. तुमचं स्वतःचं लग्न असो किंवा मुलाचं किंवा भावाचं लग्न असो, या कारणासाठी पण PF मधून पैसे मिळतील.घरासाठी पण PF वापरता येणार येईल.
UPI Tap & Pay: QR कोड स्कॅनची कटकट संपली! UPIचं नवं फीचर, आता NO Scan, NO Tension
तुम्हाला घर घ्यायचं असेल, फ्लॅट घ्यायचा असेल, प्लॉट घ्यायचा असेल किंवा घर बांधायचं असेल तर पण PF मधून अडव्हान्स मिळतो. एवढंच नाही तर तुम्ही घेतलेल्या होम लोनची परतफेड करायला किंवा घराची डागडुजी करायला, नूतनीकरण करायला पण पैसे काढता येतात. घराच्या कामासाठी तुम्ही नोकरीच्या काळात 5 वेळा पैसे काढू शकता. याशिवाय EPFO ने सांगितलेल्या काही खास परिस्थितीत एका वर्षात 2 वेळा पण अडव्हान्स घेता येतो.
सगळी प्रोसेस आता ऑनलाईन झाली आहे. तुम्हाला कुठेही ऑफिसमध्ये जायची गरज नाही. EPFO च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.पण अर्ज करण्याआधी एक काम करून ठेवा. तुमच्या PF अकाउंटला आधार, पॅन आणि बँक अकाउंट लिंक असणं खूप गरजेचं आहे. KYC पूर्ण असेल तरच पैसे लवकर मिळतात. KYC नसेल तर आधी ते पूर्ण करून घ्या.पात्रता पूर्ण झाली की अर्ज केला की काही दिवसातच पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात. त्यामुळे अडचणीच्या वेळी PF चा पैसा आता लगेच हातात येणार आहे. हा नियम खूप लोकांसाठी दिलासा देणारा आहे.
Trade Plan: BRICS मध्ये भारताचा तगडा ट्रेड प्लॅन, Trump च्या धमक्यांना घातली नाही भीक!