Gondiya Farmers Financial Assistance Scheme (फोटो सौजन्य-AI एआय)
यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असताना शासनाच्या विविध आर्थिक मदतीमुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी मिळालेले प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अग्रीम, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २४ वा हप्ता आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील वितरणातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांत कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत. या तीन योजनांमधून आतापर्यंत १११ कोटी रुपयांहून अधिक निधी वितरित झाला आहे. त्यातच खरीप पणन हंगाम २०२६-२७ साठी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू झाल्याने शेतकऱ्यांना धान विक्रीचा पर्यायही उपलब्ध झाला आहे.
यंदा पावसातील खंड, पाण्याची कमतरता तसेच कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील धान पिकाला फटका बसला. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दुष्काळी परिस्थितीच्या निकषांनुसार गोंदिया जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांचा मदतीसाठी समावेश केला. त्यात गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, आमगाव, सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी या तालुक्यांचा समावेश आहे. पीक नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना अग्रीम मदतीचे वितरण सुरू करण्यात आले.
५ नोव्हेंबरअखेर जिल्ह्यातील ७४ हजार ९१० शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ३७ कोटी ४६ लाख रुपये जमा झाले आहेत. ३० ऑक्टोबर २०२६ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता वितरित करण्यात आला. जिल्ह्यातील २ लाख १६ हजार ४७४ पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे एकूण ४३ कोटी २९ लाख ४८ हजार रुपये मिळाले.
दुसऱ्या यादीतील ३० कोटी खात्यांत जमा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात २५ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्ह्यातील पाच हजार १६९ शेतकऱ्यांच्या खात्यांत ३० कोटी ३० लाख ३८ हजार रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली. यापैकी चार हजार ३५५ शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खातेदार असून त्यांच्या खात्यांत २४ कोटी ५९ लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली.
दुसरीकडे, खरीप पणन हंगाम २०२६-२७ साठी ५ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत धान विक्री करता येणार आहे. केंद्र शासनाने सामान्य दर्जाच्या धानासाठी प्रतिक्विंटल दोन हजार ४४१ रुपये, तर अ दर्जाच्या धानासाठी दोन हजार ४६१ रुपये आधारभूत किंमत निश्चित केली आहे.
यात गोंदिया तालुक्यातील ४८ हजार ३७६, तिरोडा ३६ हजार ४५८, अर्जुनी मोरगाव २६ हजार ४१३, सडक अर्जुनी २३ हजार ८०८, आमगाव २३ हजार ६७२, गोरेगाव २३ हजार २४१, देवरी १८ हजार १०४ शेतकऱ्यांचा समावेश होता.
Ans: दुष्काळी अग्रीम मदत, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 24 वा हप्ता आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून ही मदत वितरित झाली आहे.
Ans: जिल्ह्यातील 2,16,474 पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपये मिळाले. एकूण 43 कोटी 29 लाख 48 हजार रुपये वितरित करण्यात आले.
Ans: खरीप हंगाम 2026-27 साठी सामान्य धानाला प्रतिक्विंटल 2,441 रुपये आणि अ दर्जाच्या धानाला 2,461 रुपये आधारभूत किंमत निश्चित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना 31 मार्च 2027 पर्यंत धान विकता येणार आहे.






