Federal Bank: फेडरल बँकेने विद्या बालनला पहिले ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून केले नियुक्त (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Federal Bank Marathi News: फेडरल बँक ही भारतातील खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक आहे. बँकेचा वर्षानुवर्षे प्रभावी वारसा राहिलेला आहे. अशा फेडरल बँकेने आज प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन यांची प्रथम ब्रँड ॲम्बेसेडर (प्रतिनिधी) म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली. मुंबईतील एका विशेष समारंभात ही घोषणा करण्यात आली. फेडरल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी के. व्ही. एस. मणियान यांच्या हस्ते बालन यांना स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. हा संबंध ब्रँडसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे कारण तो आपली बाजारातील स्थिती अधिक मजबूत आणि उत्कृष्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
विश्लेषकांसाठी अलीकडेच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये बँकेचे वरिष्ठ कर्मचारी सहभागी झाले होते. त्यांनी बैठकीत त्यांच्या योजना आणि दिशा स्पष्ट केल्या. या बैठकीत बँकेला कशाप्रकारे पुढे जायचे आहे याची योजना विश्लेषकांसमोर मांडण्यात आली आणि यामध्ये बँकेच्या ब्रँडला नवीन रूप देण्याचा मुद्दा विशेषकरून चर्चेत होता. बँकेचे मुख्य विपणन अधिकारी एम. व्ही. एस. मूर्ती म्हणाले की, सुश्री बालन ह्यांची निवड अत्यंत रणनीतिकरित्या, काळजीपूर्वक नियोजन करून केलेली आहे कारण त्या भौगोलिक क्षेत्रांच्या, लिंगवर्गांच्या आणि पिढ्यांच्या विविध श्रेणीत लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी उत्तम ठरू शकतात. त्या सर्वांवर आणि सर्व ठिकाणी प्रभाव टाकू शकतात.
ते म्हणाले, “विद्या बालन या फेडरल बँकेसाठी ब्रँड ॲम्बेसेडर किंवा प्रतिनिधी म्हणून असल्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद आणि उत्साह आहे. त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू आहे. त्या वेगवेगळ्या वयोगटातील, वेगवेगळ्या लिंगातील आणि विविध सामाजिक गटांतील लोकांना आवडतात. त्यांचा चाहतावर्ग संपूर्ण भारतात पसरलेला आहे. त्या अनेक प्रकारचे गुण किंवा पैलू असलेल्या असून त्या विविध गोष्टींमध्ये कुशल आहेत. अशा प्रकारे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक बाजू आहेत. त्या अत्यंत कुशल व समर्पित अभिनेत्री असून इतर कलाकारही त्यांच्या अभिनयाचे कौतुक करतात. त्या त्यांच्या भूमिकेत पूर्णपणे एकरूप होतात आणि जेव्हा कॅमेऱ्याच्या समोर असतात तेव्हा कितीही कठिन भूमिका का असेना ती अत्यंत प्रामाणिकपणे निभावतात. तसेच, त्यांचे ऑफ-स्क्रीन व्यक्तिमत्त्व देखील आकर्षक आहे आणि लोक त्यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होतात. त्या ज्या प्रत्येक भूमिकेत काम करतात त्या भूमिकेचा मुळातला आणि अतिशय महत्त्वाचा भाग किंवा भाव असते ती त्यांची तयारी, सूक्ष्म गोष्टी समजून घेण्याची इच्छा आणि विविध शक्यतांचा विचार करण्याची क्षमता. या सर्व गोष्टी त्यांच्या भूमिकेला एक प्रकारे सजीव करतात. त्यामुळे त्यांना त्या पात्राच्या गाभ्यापर्यंत पोहोचता येते, ज्यामुळे ती भूमिका त्या प्रभावीपणे सादर करू शकतात.
आम्ही त्यांना ऑन-बोर्ड आणण्याचा प्रयत्न करत असताना आम्ही हे अनुभवले आहे. फेडरल बँकेत, आम्ही आमच्या ग्राहकांसोबत संबंध अधिक चांगल्या पद्धतीने विकसित करण्यासाठी सहवेदनेचा वापर करतो. सहवेदना हा गुणधर्म भौगोलिक सीमा, पिढ्यांचे अंतर आणि विविध ग्राहकांच्या गटांवरील मर्यादेपलीकडे जातो. तो गुणधर्म इतका सार्वत्रिक आणि व्यापक आहे की तो ठिकाण, वय किंवा ग्राहकांचे प्रकार यांच्या सीमा ओलांडून सर्वत्र मान्य आणि उपस्थित असतो. आमचे NPS (नेट प्रमोटर स्कोअर) आणि Nielsen अभ्यासातील पिअर तुलना (इतर समकक्ष संस्थांच्या तुलनेत केलेली तुलना) दर्शवतात की आम्ही आमच्या कार्यपद्धतीत Human at The Core, Digital at The ForeTM (मानवी मूल्यांना प्राधान्य आणि तंत्रज्ञानाचा अत्याधिकार वापर करून उत्तम सेवा) फ्रँचायझीमध्ये या तत्त्वामुळे प्रगती केली आहे आणि उत्कृष्टता मिळवली आहे.
विद्या जशी त्यांच्या कामांना हलके बनवतात, तसेच आम्हीही आमच्या कामांना हलकेफुलके बनवतो. काम किंवा जबाबदारीची ताणमुक्त आणि आनंदी पद्धतीने हाताळणी करतो आणि आपल्या टीमच्या सामूहिक प्रयत्नातून मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करतो. मला विश्वास आहे की विद्या आपल्या कामाने फेडरल बँकेशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीला चालना देईल आणि त्यांचे स्तर उंचावेल. स्वतःचा व ब्रँडचा गौरव करण्याचा मार्ग हा आमचे व्यक्तिमत्व, संस्कृती आणि ग्राहक यांच्यामध्ये आहे.”
सुश्री. बालन यांनी त्यांच्या अभिनय कौशल्यामुळे ‘कहानी’, ‘परिणीता’, ‘शकुंतला देवी’ अशा चित्रपटांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि त्यांचे काम समीक्षकांनी खूप पसंत केले आहे. त्यांनी त्यांच्या बहुगुणी अभिनयामुळे आणि चित्रपटांमधील भूमिका साकारल्यामुळे एक विश्वासू आणि निष्ठावंत प्रेक्षकवर्ग मिळवला आहे. त्यांनी या सहयोगाबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे. भारतातील विविध ब्रँड्सचे प्रतिनिधित्व करताना भारताची कहाणी जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा हा एक मार्ग आहे, असे मी मानते. आणि फेडरल बँक, आपल्या अर्थव्यवस्थेला दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत समर्थ करण्याच्या बाबतीत उल्लेखनीय ठरते. बँकेने एक चांगली प्रतिमा निर्माण केली आहे. इथे ग्राहक त्यांच्या मूल्यांमध्ये निष्ठा दाखवतात. बँकेचा एक असा ग्राहक वर्ग आहे जो त्यांच्या उत्पादनांवर आणि सेवांवर दीर्घकाळासाठी विश्वास ठेवतो आणि त्यांच्याशी व ब्रँडशी जोडलेला राहतो.
बँक महिलांसाठी देशातील एक अग्रणी नियोक्ता आहे. बँकेची कार्यसंस्कृती अशी आहे की इथे कर्मचारी दीर्घकाळ टिकून राहतात आणि कंपनीच्या उद्दिष्टांसाठी त्यांचे उत्तम योगदान देतात. एक अत्यंत मजबूत व उत्कृष्ट व्यवसायाची उभारणी सुरू ठेवताना त्यांनी समाजासाठी आणि चांगल्या उद्देशांसाठी केलेले प्रयत्न आणि त्यासाठी दिलेले समर्थन याचे मला मनापासून खूप कौतुक करावसे वाटते. जेव्हा फेडरल बँकर्स मला सांगतात की ते Human at the Core, Digital to the Fore TM (मानवी मूल्यांना प्राधान्य आणि तंत्रज्ञानाचा अत्याधिकार वापर करून उत्तम सेवा) आहेत तेव्हा त्यांच्या या वक्तव्यामुळे मला खरोखरच एक वाईब (विशिष्ट भावना) निर्माण झाल्याचा अनुभव होतो. फेडरल बँकेबरोबर एक अतिशय रोमांचक ‘रिश्ता’ (नाते) जोडण्यास मी अत्यंत उत्सुक आहे.”
फेडरल बँकची ही भागीदारी अनेक वर्षे चालणार आहे. या भागीदारी अंतर्गत विविध मार्केटिंग उपक्रमांचा समावेश राहणार आहे. त्यामध्ये टीव्हीवर जाहिराती दाखवणे व डिजिटल मोहिमा सामील आहेत. फेडरल बँक यशस्वी प्रवासासाठी सज्ज होत असताना, पहिली ब्रँड अम्बेसेडर ब्रँडची कहाणी जगाला सांगण्यास आणि त्याच्या भागधारकांसह रिश्ता मजबूत करण्यास मदत करेल. विद्या बालनने भारतीय सिनेमा क्षेत्रामध्ये महिलांच्या नेतृत्वाला आपल्या दमदार अभिनयाने आणि विचारपूर्वक निवडींमधून नव्याने ओळख दिली आहे. त्याचप्रमाणे फेडरल बँक आपल्या उत्पादनांच्या प्रस्तावांमध्ये, सेवा क्षमतांमध्ये, तसेच भौगोलिक क्षेत्रात नवनिर्मिती करत आहे आणि सध्याच्या गोष्टींना नवीन दृष्टिकोनातून अधिक प्रभावशाली बनवत आहे.