Punch The Monkey
आता पंचच्या व्हायरल कहाणीला बघताच लोकप्रिय सर्च इंजिन गुगलने “पंच द मंकी” नावाच्या नव्या किवर्डवर काही खास काम केले आहे. म्हणजेच आता जेव्हाही तुम्ही गुगलला हा किवर्ड सर्च कराल तेव्हा स्क्रिनवर तुम्हाला हार्ट शेपमध्ये पंच म्हणजेच त्या छोट्या माकडाचा फोटो स्क्रिनवर दिसून येईल. पंचच्या व्हिडिओनेच नाही तर गुगलच्या या नव्या किवर्डनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा एक किवर्ड गुगल सर्च इंजिनवर सर्च करताचा तुम्हाला तुमच्या स्क्रिनवर डिजिटल जादूचे दर्शन घडेल जे नक्कीच पाहण्याजोगे ठरते.
संतापजनक! पैशांसाठी इज्जतीचा सौदा… बायकोलाच भाड्यावर देत आहे पती, Viral Video पाहताच नेटकरी संतापले
इचिकावा सिटी प्राणीसंग्रहालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आम्हाला पंचची वाढ समुदायासोबत शेअर करायची होती. आम्हाला कधीच वाटले नव्हते की तो समुद्रापलीकडील इतक्या लोकांचा जागतिक मित्र होईल.” पंचच्या वाढत्या क्रेझमुळे इचिकावा सिटी प्राणीसंग्रहालयात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. माकडाची एक झलक पाहण्यासाठी लोक दूरदूरवरुन या संग्रहालयला भेट देत आहेत. फक्त जपानच नाही तर परदेशी पर्यटक देखील माकडाला पाहण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






