काय घडलं नेमकं?
रवींद्र गायकवाड आणि सत्यजित कांबळे हे एकमेकांच्या ओळखीचे होते. बुधवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास दोघांमध्ये २० रुपयांवरून वाद झाला. ‘माझे तुझ्याकडे 20 रुपये उधार आहेत’,असं म्हणत सत्यजितने रवींद्रच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात रवींद्र गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती गंभीर आहे.
Kalyan crime: ‘आमच्याकडे काय बघतोस?’ म्हणत विद्यार्थ्यावर प्राणघातक चाकूहल्ला; परिसरात दहशत
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली. या हल्ल्यानंतर आरोपी सत्यजित हा फरार झाला होता. फरार झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक लातूर येथे रवाना झाले आणि अवघ्या काही तासांत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. केवळ २० रुपयांवरून झालेल्या या हत्येच्या प्रयत्नांच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्यात खळबळ! दोन लाखांसाठी तरुणानेच रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव
आपण आता पर्यंत अनेक घटना पाहिल्या आहेत. ज्यामधे अपहरण करून पैसे मागितले जातात. घरातील लहान मुलांच किवा पैसे थकीत असतील तर घरातील कोणाच तरी अपहरण झाल्याच्या आपण तक्रारी पाहिल्या आहेत. मात्र पुण्यात अशी घटना वाढली आहे. ज्याने तुम्ही सुद्धा चक्रावून जाल कारण त्याने दोन लाख रुपयांसाठी चक्क स्वतःच अपहरण झाल्याच सांगितल आणि थेट भावाला आणि बापाला मेल केला आणि अपहरण केल्याची तक्रार केली. तुमचा मुलगा जर तुम्हाला जिवंत हवा असेल तर तुम्हाला दोन लाख रुपय द्यावे लागतील. असा धमकीचा मेल त्याने केला आणि त्या नंतर तो उत्तर प्रदेशला निघून गेला. बापाला आलेला मेल पाहता त्यांनी थेट बाणेर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दिली मात्र जे बाहेर सत्य आल ते मात्र धक्कादायक होत.
Ans: पिंपरी-चिंचवड परिसरात ही घटना घडली.
Ans: 20 रुपयांच्या उधारीवरून दोघांमध्ये वाद झाला आणि हल्ला झाला.
Ans: हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला होता; पोलिसांनी लातूरमध्ये जाऊन त्याला अटक केली.






