Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gen Z Financial Crisis : दिखाव्यासाठी कर्ज अन् EMI चा डोंगर! ‘उधाराच्या श्रीमंतीत’ जगतेय जेन झी; ‘या’ चुका पडतील महागात

Gen Z Financial Crisis : महागडे स्मार्टफोन्स, ब्रँडेड कपडे, फिरणे आणि सोशल मीडियावरील 'दिखाव्यासाठी' सध्याची Gen Z पिढी धडाधड पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्डचा वापर करत आहे. 'उधाराच्या श्रीमंतीत' जगण्याच्या या प्रवृत्तीमुळे तरुण वयातच EMI चा डोंगर आणि कर्जाचा मोठा तणाव निर्माण होत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 17, 2026 | 05:54 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • दिखाव्यासाठी कर्ज अन् EMI चा डोंगर!
  • ‘उधाराच्या श्रीमंतीत’ जगतेय जेन झी
  • ‘या’ चुका पडतील महागात
Gen Z Financial Crisis : झुरळ या एका शब्दावरुन उभं राहिलेलं आंदोलनाने जंतरमंतर गाजवलं. पण हीच ती जेन झी ( Gen Z Financial Crisis ) आहे का? जिच्या समोर आलेल्या सवयी त्यांना महागाता पडू शकता. आजकाल महागडा फोन, ब्रँडेड कपडे, गॅजेट्स किंवा सहलीसाठी बँक बॅलन्सची वाट पाहण्याची गरज नसते. ‘आता खरेदी करा, नंतर पैसे द्या’, क्रेडिट कार्ड आणि लहान वैयक्तिक कर्जांमुळे तरुणांसाठी खरेदी करणे सोपे झालं आहे. एकेकाळी कर्ज ही अत्यंत गरजेची बाब मानली जात होती, पण आता जीवनशैली आणि दैनंदिन खर्चांसाठी कर्जाचा वापर वाढत आहे. विशेषतः Gen Z कमी वयातच क्रेडिट प्रणालीचा भाग बनत आहे.

Sony Vizha चा नवा प्लॅन, जागतिक पातळीवरील फॉरमॅट तमिळमध्ये! समंथा रुथ प्रभू होस्ट करणार ‘Celebrity MasterChef Tamil’

कर्ज घेण्याचे वय कमी झाले आहे का?

पैसा बाजारने १० दशलक्षाहून अधिक ग्राहकांच्या क्रेडिट वर्तणुकीचे विश्लेषण करून दिलेल्या अहवालानुसार, विविध पिढ्यांमध्ये पहिल्यांदा कर्ज घेणाऱ्यांचे सरासरी वय कमी झाले आहे. ‘जनरेशन झेड’ आता क्रेडिट कार्ड, ‘आता खरेदी करा, नंतर पैसे द्या’ (Buy Now Pay Later) आणि वैयक्तिक कर्जे मोठ्या प्रमाणावर वापरत आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे कर्ज मिळवण्याची सुलभता. शॉपिंग किंवा पेमेंट ॲप्सवर EMI आणि ‘नंतर पैसे द्या’ या सुविधा उपलब्ध आहेत. याचा अर्थ असा की, अनेकदा प्रश्न हा नसतो की तुमच्याकडे पैसे आहेत की नाही; तुम्हाला फक्त ईएमआयची रक्कम तपासावी लागते.

तरुण लोक इतके कर्ज का घेत आहेत?

कर्ज फक्त घर, शिक्षण किंवा वैद्यकीय गरजांसाठीच नसते. प्रवास, गॅझेट्स, फॅशन, अन्न आणि मनोरंजन यांसारखे खर्चदेखील क्रेडिट कार्डने भरले जात आहेत. Buy Now Pay Later या सुविधेमुळे ग्राहकांना वस्तू किंवा सेवांसाठी नंतर पैसे देण्याची सोय मिळते. आपल्याला कमी हप्त्यांमध्ये पटकन खरेदी करण्याचा मोह होतो, पण कधीकधी अनेक खरेदींचे एकत्रित हप्ते मिळून एक मोठे आर्थिक ओझे तयार होते. जर कोणी ₹४०,००० कमवत असेल आणि फोन, कपडे किंवा सहलीसाठी क्रेडिट कार्ड वापरत असेल, तर प्रत्येक खर्च लहान वाटू शकतो, पण महिन्याच्या शेवटी एकाच वेळी अनेक हप्ते भरावे लागतात.

मग काय केलं पाहिजे?

क्रेडिट कार्ड किंवा ‘आता खरेदी करा, नंतर पैसे द्या’ वापरण्यात काहीच गैर नाही, पण क्रेडिट मर्यादा म्हणजे तुमचे उत्पन्न नव्हे. बँकेने तुम्हाला ₹१ लाखांची मर्यादा दिली आहे, याचा अर्थ असा नाही की तुम्ही आणखी ₹१ लाख खर्च करू शकता. शिवाय, जर तुम्ही वेळेवर पैसे भरले नाहीत, तर व्याज आणि विलंब शुल्क लागू शकते. त्यामुळे, केवळ ईएमआय पाहून खरेदी करण्याऐवजी, एकूण परतफेड रक्कम आणि सर्व शुल्क नक्की तपासा.

Varanasi Airport Firing Case : वाराणसी विमानतळावर अचानक गोळीबार! विमानात शस्त्रे नेण्याचा नियम नक्की काय आहेत?

Web Title: Gen z financial crisis taking personal loans for lifestyle needs debt trap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 05:54 PM

Topics:  

  • Business News
  • Credit Card Rules
  • emi
  • EMI Option
  • finance
  • Gen Z
  • Marathi News

संबंधित बातम्या

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात
1

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात

World News : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; जॉन कोएल यांची बंधक प्रकरणांसाठी विशेष दूत म्हणून निवड
2

World News : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; जॉन कोएल यांची बंधक प्रकरणांसाठी विशेष दूत म्हणून निवड

Aarti Solanki On Balancing Devi: बॅलन्सिंग देवीच्या मूर्तीवर आरती सोळंकीचा संताप; ‘कला’च्या नावाखालील प्रकारावर भडकली
3

Aarti Solanki On Balancing Devi: बॅलन्सिंग देवीच्या मूर्तीवर आरती सोळंकीचा संताप; ‘कला’च्या नावाखालील प्रकारावर भडकली

Onkar Bhojane On Milind Kawde:  दिग्दर्शकांच्या आरोपांवर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया; ‘त्या’ कारणामुळे प्रमोशनला नव्हता हजर
4

Onkar Bhojane On Milind Kawde: दिग्दर्शकांच्या आरोपांवर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया; ‘त्या’ कारणामुळे प्रमोशनला नव्हता हजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.