Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gold Jewellery Sales : लोकांनी बंद केली सोन्याच्या दागिन्यांची खरेदी? विक्रीत मोठी घट; काय आहेत नेमकी कारणं?

Gold Jewellery Sales : सोन्याच्या दरांमध्ये झालेली प्रचंड वाढ आणि बदलत्या गुंतवणुकीच्या सवयींमुळे भारतीय बाजारात सोन्याच्या दागिन्यांची मागणी कमालीची घटली आहे. ताज्या अहवालानुसार, देशात सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीत १५ टक्क्यांची मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 31, 2026 | 03:58 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सोन्याच्या दागिन्यांची खरेदी बंद?
  • विक्रीत झाली मोठी घट
  • काय आहेत नेमकी कारणं?
Gold Jewellery Sales : महागाईचा भडचा जसा उडतो तसा मग सोन्याचा भाव कधी महाग तर कधी स्वस्त होत असतं. आताही बाजारात अशीच परिस्थिती आहे. नुकताच सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीबाबत एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने प्रसिद्ध केलेल्या या अहवालानुसार, एप्रिल ते जून २०२६ या तीन महिन्यांत भारतातील सोन्याच्या दागिन्यांची खरेदी ( Gold Jewellery Sale ) गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी घटून ७५ टन वर आली. दरम्यान, जागतिक स्तरावर दागिन्यांची मागणी २७८ टन होती, जी कोरोना महामारीनंतरच्या दुसऱ्या तिमाहीतील सर्वात कमी पातळी आहे. पण नेमकी अचानक इतकी घट का झाली? का आहेत या मागची कारणं? सगळं सविस्तर जाणून घेऊयात.

Startup India: ‘स्टार्टअप इंडिया’ची १० वर्षे; ३३ हजारांहून अधिक स्टार्टअप्ससह महाराष्ट्र देशात नंबर वन!

सोन्याच्या मागणीतील घसरणीचे सर्वात मोठे कारण म्हणजे सोन्याच्या सतत वाढलेल्या किमती. सोन्याच्या वाढलेल्या किमतींमुळे अनेक लोकांनी दागिने खरेदी करण्याचं आपलं प्लॅनिंग पुढे ढकललं आहे. काहींनी तर रद्दच केलं आहे. ज्यांनी खरेदी केली, त्यांनी जड दागिन्यांऐवजी हलक्या वजनाच्या दागिन्यांना पसंती दिली. पण पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत भारतातील मागणी १४ टक्क्यांनी वाढली असली तरी, वार्षिक तुलनेत त्यात घट झाली आहे.

सोनं कमी खरेदी पण जास्त पैसे देऊन

२०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांत, भारतातील सोन्याच्या दागिन्यांची एकूण मागणी १४१ टन होती, जी मागील वर्षाच्या तुलनेत १७% नी कमी झाली होती. पण सोन्याच्या वाढलेल्या किमतींमुळे, या मागणीचे एकूण मूल्य २६% पेक्षा जास्त वाढून २१ अब्ज डॉलर्सवर पोहोचले. याचा अर्थ लोकांनी कमी सोनं खरेदी केलं, पण जास्त पैसे दिले गेले. याचा अर्थ सोन्याचे भाव बरेच वाढलेत.

एप्रिल-जून या तीन महिन्यांत सोन्याची जागतिक मागणी अंदाजे १,२६९ टन इतकी होती. जी गेल्या वर्षीच्या मागणी इतकीच बरोबरीची आहे. गोल्ड ईटीएफ, गोल्ड बार आणि नाण्यांमधील गुंतवणूक २६२ टनांपर्यंत कमी झाली. पहिल्या सहा महिन्यांत सोन्याच्या विटा आणि नाण्यांमधील गुंतवणूक गेल्या वर्षीच्या तुलनेत २१% जास्त होती.

वृत्तांत काय?

असेही वृत्त आहे की, मध्यवर्ती बँका सातत्याने सोन्याची खरेदी करत आहेत. एप्रिल-जून या तीन महिन्यांत, जगभरातील मध्यवर्ती बँकांनी त्यांच्या साठ्यात २८९ टन सोन्याची भर घातली, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत ६२% जास्त आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनेही याच कालावधीत २०० किलो सोन्याची खरेदी केली.

पुढील काळात काय असेल ट्रेंड?

WGC च्या मते, पुढील सहा महिन्यांत गुंतवणुकीच्या उद्देशाने सोन्याची मागणी वाढली आहे. जर सोन्याचे भाव जास्त राहिले, तर दागिन्यांच्या खरेदीवर दबाव येईल. त्यामुळे, लोक लहान किंवा हलके दागिने खरेदी करणे हा एक चांगला पर्याय मानू शकतात.

8th Pay Commission News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 8व्या वेतन आयोगात नव्या सूत्रामुळे वेतन भरघोस वाढीची शक्यता

Web Title: Gold jewellery sales drop by 15 percent reasons behind falling demand marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • Business News
  • Gold
  • Gold Jewellery
  • Gold mine
  • Gold Price gold
  • Gold Rate
  • Gold Rate Today
  • Gold-Silver Rate
  • Marathi News
  • Today's Gold Rate

संबंधित बातम्या

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?
1

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?

Global Economy : अमेरिकेच्या बॉन्ड बाजारात भूकंप! २००७ नंतर पहिल्यांदाच यिल्ड ५ टक्क्यांवर
2

Global Economy : अमेरिकेच्या बॉन्ड बाजारात भूकंप! २००७ नंतर पहिल्यांदाच यिल्ड ५ टक्क्यांवर

Israel Election : युद्धाच्या सावटात इस्रायलमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम; नेतन्याहूंची पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारी
3

Israel Election : युद्धाच्या सावटात इस्रायलमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम; नेतन्याहूंची पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारी

Yemen War : पळायचं कुठे? पुढे गोळ्या, मागे गोळ्या; १.२५ लाख येमेनी नागरिक संकटात
4

Yemen War : पळायचं कुठे? पुढे गोळ्या, मागे गोळ्या; १.२५ लाख येमेनी नागरिक संकटात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.