रशिया-युक्रेन युद्धाची (Russia Ukraine War) कमी झालेली धग आणि गुंतवणूकदारांनी इतरत्र वळवलेला मोर्चा पाहता पुन्हा एकदा सोन्याचे (Gold) दर कमी आणि स्थिर होताना दिसत आहेत. नाशिकमध्ये (Nashik) बुधवारी २४ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅममागे ५१६०० रुपये नोंदवले गेले. २२ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅममागे ४९४०० रुपये नोंदवले गेले, तर चांदीचे (Silver) दर किलोमागे ६८५०० रुपये नोंदवले गेले. यावर तीन टक्के जीएसटी अतिरिक्त असेल, अशी माहिती मिळाली आहे.
[read_also content=”पुष्कर सिंह धामी बनले उत्तराखंडचे १२वे मुख्यमंत्री, शपथ घेताच केला हा विक्रम https://www.navarashtra.com/india/pushkar-singh-dhami-became-the-12th-cm-of-uttarakhand-made-this-record-as-soon-as-he-took-oath-258780.html”]
अजून लगीनसराई सुरू झालेली नाही. गुढीपाडवाही लांब आहे. त्यामुळे तूर्तास बाजारात सोन्याला म्हणावी तशी मागणी नाही. येणाऱ्या काळात सराफातील गर्दी वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या साधारणतः दोनशे ते पाचशे रुपयांच्या दरम्यान सोन्याच्या भावात चढ-उतार होत असल्याचे दिसत आहे. येणाऱ्या काळात हे भाव पुन्हा वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
मुंबईत बुधवारी २४ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅममागे ५१६७० रुपये नोंदवले गेले. कालच्या तुलनेत आजच्या भावात आज ४३० रुपयांची घसरण पाहायला मिळाली. २२ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅममागे ४७३५० रुपये नोंदवले गेले. कालच्या तुलनेत आजच्या भावात ४० रुपयांची घसरण पाहायला मिळाली. पुण्यात बुधवारी २४ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅममागे ५१७४० रुपये नोंदवले गेले. २२ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅममागे ४७७२० रुपये नोंदवले गेले. नागपूरमध्ये बुधवारी २४ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅममागे ५१७२० रुपये नोंदवले गेले. कालच्या तुलनेत आजच्या भावात आज ४३० रुपयांची घसरण पाहायला मिळाली. २२ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅममागे ४७४०० रुपये नोंदवले गेले.
देशाची राजधानी नवी दिल्लीतही सोन्या आणि चांदीचे भाव स्वस्त झालेले दिसले. २४ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅममागे ५१३१५ रुपये नोंदवले गेले. २२ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅममागे ४७००५ रुपये नोंदवले गेले. या दरात कालच्या तुलनेत आज १७२ रुपयांची घट झाल्याचे दिसले. तर चांदीचे दर किलोमागे ६७००४ रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर कालच्या तुलनेत आज १८९ रुपयांनी घसरल्याचे दिसले.